निर्णयशक्ती (४)… निर्णयावर त्वरित कृती हवी


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

त्वरित निर्णय घेणे माणसाला शिकावे लागते आणि नुसते निर्णय घेऊन न थांबता त्याची अंमलबजावणी करावी लागते.

जो ताबडतोब कृती करतो तो नेहमी धरसोड करणाऱ्या माणसावर मात करतो. त्वरित कृतीचा त्याला खूप फायदा मिळतो. त्यामुळे त्याचा वेळ आणि कार्यशक्ती वाचते. जो निश्चित न ठरवतात पुन्हा:पुन्हा विचार करीत बसतो त्याची शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जाते. तो त्या समस्येचे पैलू निरनिराळ्या दृष्टिकोनातून तपासत बसतो आणि मग निश्चित निर्णय घेण्याऐवजी अर्धवट निर्णय घेतो. त्यामुळे समस्या सुटत नाही आणि हा मनुष्य टांगून राहतो

सर्वच प्रश्‍न लोंबकळत ठेवण्यापेक्षा आजच्या आज काहीतरी ठरवायला महत्त्व असते. जो ताबडतोब निर्णय घेतो त्याला माहीत असते की या निर्णयामुळे एखादेवेळी चूक होईलही; पण उगीच फालतू चर्चा करीत बसणे, उलट-सुलट बाजू मांडणे, पुन्हा सर्व विचार नव्याने करणे, यापेक्षा चुका झालेल्या परवडतात, पण त्वरित कृती हवी असते. कारण चुका दुरुस्त करता येतात व त्यातून शिकताही येते.

जो ताबडतोब निर्णय घेतो त्याला परिस्थितीचे अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. निश्चयी माणूस एकदा एखाद्या गोष्टी संबंधी अंतिम निर्णय घेतो त्यानंतर तो विषय मनातून पार काढून फेकून देतो आणि आपले सर्व लक्ष पुढच्या विषयाकडे वळतो. जे लोक अनेक गोष्टी मिळवतात ते याप्रमाणे एकेक विषय हातावेगळा करीत जातात. ते आपल्या मनामध्ये फालतू विचारांचा व योजनांचा फालतू कचरा साठू देत नाहीत. ते आपले मन नेहमी आरशासारखे लख्ख ठेवतात, त्यामुळे त्यांच्या निर्णयात गुंतागुंत कधीच नसते

निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश…)

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!