निर्णयशक्ती (५)… भिजत घोंगडे ठेवणारे कुंपणावरचे असतात.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

जो नेहमी निर्णय घ्यायला करत असतो त्याचा इतर लोकांवर प्रभाव पडत नाही. त्याच्या सहवासातील इतर लोकांवर त्याच्या धरसोड वृत्तीचा परिणाम होतो व त्याच्या संसर्गाने त्यांनाही भिजत घोंगडे ठेवण्याचा हा दुर्गुण जडतो. हा गुण साथीच्या रोगासारखा संसर्गजन्य आहे.

भिजत घोंगडे ठेवणाऱ्याला आपल्याला नक्की काय हवे आहे ते समजतच नाही. तो नेहमी कुंपणावर बसलेला असतो. तो उद्योजक असेल तर तो आपल्या व्यवस्थापकाला ही काही ठरवू देत नाही. मग व्यवसायाचे सर्व गाडे या अनिश्चयाच्या चिखलात अडकून बसते. तो ज्या संघटनेचा प्रमुख असतो ती सर्व संघटना रखडू लागते. निर्णय घेण्याचा परिणाम सर्व वातावरणावर होतो. मालाच्या ऑर्डर अर्ध्या राहतात. दुरुस्त्या आणि व्यवहार थांबून राहतात. अशा उद्योजकाकडील कामगार वर्गाचीही चलबिचल होते व ते दुसरीकडे जायचा विचार करतात.

ज्यांची मने खंबीर नाहीत तेच सर्व गोष्टी खुंटीला टांगून ठेवत असतात

अनेक जणांचा विचार नकारात्मक असतो. काय चांगले होईल यापेक्षा काय वाईट होईल याचा विचार करतात व त्यामुळे निर्णय घ्यायला कचरतात. निर्णय घेण्याची ताकद यावी यासाठी यासाठी नकारात्मक व अडचणींचा विचार सोडून द्यावा आणि आपल्या मनात नेहमी इष्ट ते घडेलच, भले होईल असा विचार बनवावा. या विचारामुळे तात्काळ निर्णय घेण्याचे धाडस येईल

निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश…)

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!