काम आवडीचं असो किंवा नसो, ते पूर्ण क्षमतेने आणि समर्पण वृत्तीने करा.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मनासारखं काम असेल तर आपण ते आवडीने करतोच… पण मनासारखं काम मिळालं नाही तर?

कित्येक जण आपल्या अपयशाचं, अकार्यक्षमतेच कारण “आवडीचं काम नाही” असंच देताना दिसतात. परंतु हे सर्वथा चूक आहे. काम कोणतंही असो, ते तुम्ही पूर्ण क्षमतेनेच करणे आवश्यक असते. तुमचे १००% प्रयत्न तुम्ही कामासाठी द्यायलाच हवेत. काम तुमच्या आवडीचं आहे कि नाही हे महत्वाचे नसते, तुम्ही तुमचे काम तन्मयतेने, झोकून देऊन करता कि नाही यावर तुमचे यश-अपयशाचे सूत्र ठरत असते. यशस्वी लोक आवडीचं काम मिळालंय म्हणून यशस्वी होत नाहीत, तर त्यांच्या हाती जे काही काम असेल ते प्रामाणिकपणे, कोणतीही तक्रार ना करता, पूर्ण क्षतेने करतात, आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करतात, म्हणून ते यशाच्या शिखरावर जातात.

कामात पूर्णपणे झोकून देणारा वर्ग हा नेहमीच दुर्मिळ असतो. हाच दुर्मिळ वर्ग पुढे जाऊन नेतृत्व करतो. आपण बऱ्याचदा ऐकतो कि एखादा हमाली, रोजंदारी करता करता आज मोठा उद्योजक झाला, साधा लेबर होता आज कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे… हे का आहेत? कारण त्यांनी कधीही त्यांच्या कामाला कमी समजलेलं नसत. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे, एकाग्रपणे केलेलं असतं. त्यांची हीच एकाग्रता, समर्पण वृत्ती त्यांना हळूहळू संधी देत जाते; आणि तेही त्यांच्या बुद्धी, कष्ट, चातुर्याच्या बळावर त्या प्रत्येक संधीचे सोने करत जातात.

कोणत्याही कामाला कमी समजू नका. आवडीचंच काम मिळावं असा हट्ट धरू नका, काम तुमच्या आवडीचं आहे कि नाही हे महत्वाचे नाही, ते काम तुम्ही प्रामाणिकपणे, पूर्ण क्षमतेने करणे आवश्यक आहे. यश मिळायला लागल्यावर न आवडणारे कामही आवडीचे वाटू लागेल, आणि आवडीचे काम करण्याच्या संधी सुद्धा निर्माण होत जातील.

यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही करत असलेलं काम पूर्ण क्षमतेने करा… ते काम तुमच्या आवडीचं आहे कि नाही हे महत्वाचे नाही. तुम्ही तुमची जबाबदारी योग्य प्रकारे निभावणे आवश्यक असते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!