निर्णयशक्ती (७)… वाट पाहत बसाल तर संधी निसटून जाईल.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

अनेक लोकांना कोणतेही काम अंग चोरून करायची सवय असते. ते त्या कामात स्वतःला झोकून देत नाहीत. त्यांच्याकडे नेहमी जर-तरची भाषा असते. आपला निर्णय बदलला यावा यासाठी ते नेहमीच कुठेतरी कच्चेपणा ठेवतात. अशी जी हात राखून काम करणारी माणसे असतात, ती निराश होऊन मध्येच काम सोडतात व मागे राहतात. आपण गाडून उभे राहून हे काम केले पाहिजे, असे त्यांना वाटत नाही. या कामातून पळून जाण्यासाठी पळवाट ते नेहमी ठेवतात. आपल्या मागचे दोर कापून टाकले आहेत, अशी परिस्थिती त्यांना धोक्याची वाटते. परतीच्या वाटेवरचे दोर ते कायम ठेवू इच्छितात.

जो माणूस सतत आपल्या निर्णयावर विचार करीत बसतो आणि त्या कामाची सतत योग्य-अयोग्यता तपासत बसतो, त्याची ताकद नक्कीच विकसित होत नाही. जो आपल्या निश्चयाला घट्ट चिटकून राहत नाही, तो दुबळा राहतो. हाती घेतलेल्या कामात उलट-सुलट बाजू तपासत राहणे व निर्णयाचा फेरविचार करत बसणे यातच त्याचा वेळ जातो. आणि मग कामाची पूर्तता करायला त्याला वेळच उरत नाही.

अनेकांना वाटते “खाने मे खाना दम खाना”. पण काम उरकून न टाकता वाट बघत बसण्यामधे काह वेळा हातातील कामगिरीचं निसटून जाते. समोर आलेल्या संधी पेक्षा जास्त चांगली संधी येईल, म्हणुन जे वाट बघत बसतात आणि समोर आलेली संधी निर्णय घेऊन पकडत नाहीत त्यांना शेवटी पश्चाताप करत बसावे लागते. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. संधी मिळावी म्हणून वाट बघत असलेले अनेक जण आहेत. तुम्ही संधी सोडून दिली तर ती पकडायला अनेक जण तयार आहेत. म्हणून सध्याच्या काळात त्वरित निर्णयाची फार जरुरत आहे. जो नक्की निर्णय घेण्यास टाळाटाळ करतो, पुढे न जाता एका जागी थांबून उभा राहतो, त्याला बाजूला सारून जास्त उत्साही लोक पुढे जातात आणि याला बघतच बसावे लागते.

निश्चित निर्णय घ्या, आणि पुढे जा. जास्तीत जास्त काय होईल. यश मिळेल किंवा अपयश येईल. आणखी पुढे जाल किंवा दोन पावले मागे येण्याची वेळ येईल,पण किमान तुम्ही काहीतरी कृती केलेली असेल. खाडी का असेना प्रगती केलेली असेल. काहीतरी अनुभाव घेतले असतील. आजच्यापेक्षा कणभर का होईना प्रगती केलेली असेल. पण फक्त वाट बघत बसलात तर आहे तिथेच रहाल. ना प्रगती, ना अनुभव, ना संधी…
निश्चित निर्णय घ्यायला आणि त्यावर ठाम राहायला शिका.

निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश व अतिरिक्त लेखन श्रीकांत आव्हाड…) 

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!