‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
परिस्थिती ओळखून योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपण अंगी बाणवायला हवी. यासाठी स्वतःलाच प्रशिक्षित करणे आवश्यक असते. याचबरोबर शिकले पाहिजे. नाहीतर आपण काहीच साध्य करू शकणार नाही. ज्याच्याजवळ रचनात्मक व होकारात्मक विचार आहेत त्यालाच त्वरित व तरीही शहाणपणाचा निर्णय घेता येतो, व तो अंतिम असतो. त्यासाठी परिस्थितीचे संपूर्ण आकलन असणे आवश्यक आहे.
‘हे करू कि ते करू’ अशा विवंचनेत कधीही सापडू नका. चलबिचल वृत्तीमुळे आपली वाटचाल डळमळीत होते, किंबहुना थांबतेच…
परिस्थितीचे नीट आकलन करा, सर्व बाजूंनी विचार करा, योग्य अयोग्य, संधी, शक्यता अशा सर्व बाजूंचा विचार करा, एक ठाम निर्णय घ्या, आणि मोक्याच्या क्षणी पहिला ठोकाच अचूक मारा. पहिलाच निशाणा अचूक साधलात तर कार्यात पुढे यश मिळण्यात कसलीच अडचण येणार नाही.
निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश व अतिरिक्त लेखन श्रीकांत आव्हाड…)
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील