‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
निर्णयशक्ती अंगी कशी बाणवायची ? त्यासाठी तुम्ही तुमच्या मनातील विचार कमीत कमी शब्दात दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करा. बोलताना मुद्दा कुठेही सोडून भरकटू नका. विचार जलद करायला शिका आणि प्रथम लहान लहान गोष्टी वर ताबडतोब निर्णय घ्या. लहान निर्णय ठामपणे घेऊ लागलात कि मोठे निर्णय घेण्याचे योग्य व त्वरित घेण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे येऊ शकेल.
एकदा निर्णय घेण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आले की त्याचे इतर फायदे तुम्हाला होऊ लागतात. पहिला फायदा म्हणजे तुमचा किमती वेळ वाया जात नाही. समजा, एखादा निर्णय चुकलाच तर त्यातूनही तुमचे दुबळेपण कोठे आहे हे तुम्हाला नक्की समजते. शिक्षण, व्यवसायाचे ज्ञान या गोष्टींबरोबरच सर्वसामान्य बुद्धी वापरून निर्णय घेण्याची शक्ती स्वतःकडे निर्माण करणे याला जीवनात फार महत्त्व आहे.
ज्या व्यक्तीला आपले आयुष्य आदर्श व यशस्वी बनवायचे आहे त्याने आपल्या निर्णयशक्तीच्या आड येणारे सर्व दोष दूर केले पाहिजेत. त्याशिवाय तुमचे प्रयत्न सफल होणार नाही. ज्याला या समाजात पुढारीपण करायचा आहे त्याने घेतलेल्या निर्णयात नंतर बदल करण्याची सवय सोडली पाहिजे. पुन्हा-पुन्हा तपासण्या, चर्चा यातून फारसे काही साध्य होत नाही.
निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…
(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश )
_
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील