म्युच्युअल फंडातून परत मिळवा आपल्या घरकर्जाचे EMI


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश तावडे
======================

आपण नोकरीला लागलो कि आपलं पहिलं स्वप्न असतं , ते म्हणजे शक्य तितके लवकर आपले स्वतःचे घर विकत घेण्याचे. अशावेळी नोकरीच्या सुरवातीच्या काळात पैशाची थोडीफार जमवाजमव केल्यानंतरही , प्रत्येकालाच गृह कर्ज घेण्याची गरज भासतेच. काही जण गृह कर्जाच्या मोठाल्या मासिक हप्त्याने घाबरतात. माझा स्वतःचा अनुभव आहे कि आपण घर कर्ज घेऊन आपले स्वप्न पूर्ण करावे कारण ८.१५ ते ८.४० % इतक्या कमी व्याजाने, तेही अगदी २०-२५ वर्षे मुदतीचे गृह कर्ज, गृहनिर्माण कर्ज कंपनी आपल्याला देते. २०-२५ वर्ष इतक्या दीर्घ मुदतीमध्ये भरावयाचा कर्जाचा हप्ता नक्कीच आपल्याला तणावाखाली ठेवतो. बऱ्याच वेळा असे होते कि आपण तणावाखाली फक्त घराचे हप्ते भरत राहतो व आपल्याकडून आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणजेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा आपल्या निवृत्ती नियोजनासाठी आपल्याकडून काहीच बचत होत नाही. असे होते कि २० वर्षात आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता तयार झाली मात्र तणावामुळे इतर काहीच बचत न झाल्याने इतर काही संपत्ती निर्माण करण्यात मागे पडलो. आता आपल्या उतार वयात थोडीफार संप्पती बनवण्यासाठी म्हणा किंवा आपण घर कर्जावर भरलेले व्याज परत मिळवण्याकरिता आपल्याला जीवन विमा कंपन्या व म्युच्युअल फंड मदत करतात. कसे ते आपण जाणून घेऊ.

Private File - Access Forbidden

गृह कर्ज घेतल्यानंतर पहिला तणाव म्हणजे, आपल्याला काही झाल्यास कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील , गृह निर्माण कर्ज कंपनी घराचा ताबा घेऊन आपल्या कुटुंबावर आपत्ती ओढवेल का हि भीती निर्माण होते. हि भीती घालवण्याकरिता ताबडतोब गृह कर्ज रकमेच्या साधारण दुपटीपेक्षा जास्त रकमेचा मुदतीचा विमा घ्यावा. मुदतीच्या विमा मध्ये विम्याचा हप्ता खूप कमी असतो मात्र सुरक्षा कवच खूप मोठे असते. आपल्याला काही वाईट झाले तरी आपल्या पश्चात विमा कंपनी आपल्या गृह कर्ज हप्त्यांची काळजी घेईल तसेच उर्वरित विमा रकमेतून आपल्या कुटुंबाच्या इतर घर खर्चाची व्यवस्था होऊन जाईल.

आता आपण पाहू म्युच्युअल फंड कसे आपल्याला मदत करतील. समझा आपण २५ लाखाचे २० वर्ष मुदतीचे कर्ज घेतले जे आपल्याला गृहनिर्माण कर्ज कंपनी ने ८.२०% व्याजाने दिले. आपण आपला मासिक हप्ता पहिला तर तो साधारण रु २१,२२३ असेल. आता आपण पुढील २० वर्षात गृहनिर्माण कर्ज कंपनी ला मुद्दलाचे रु.२५ लाख व व्याजाचे रु. १३ लाख असे एकूण रु. ३८ लाख परत करणार. आपण काय करायचे तर आपला जो गृह कर्जाचा हप्ता आहे त्याच्या १० टक्के म्हणजेच फक्त रु २,१०० ची इक्विटी म्युच्युअल फंडात एस आई पी चालू करायची व ती घरकर्जाची मुदत संपे पर्यंत म्हणजेच पुढील २० वर्ष चालू ठेवायची. म्युच्युअल फंडाचा मागील इतिहास पहिला तर इक्विटी फंडातील एस आई पी ने अगदी १५% ते १८% किंवा त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपण जरी येणाऱ्या काळात मुद्दाम कमी असा १२% परतावा गृहीत धरला तरी आपल्या छोट्याशा रु. २,१०० च्या एस आई पी ची रक्कम २० वर्षात वाढून रु १९ लाख होऊ शकते. म्हणजेच आपल्याला गृह कर्जावर भरलेले व्याज परत मिळवल्याचे समाधान व आपल्या हाती काही संपत्ती निर्माण करू शकल्याचे अधिक समाधान. दीर्घकालीन एस आई पी मध्ये आपल्याला चक्रवाढ वाढीचा फायदा अधिक होतो.

Private File - Access Forbidden

समझा आपण आपले गृह कर्ज २० वर्ष मुदतीचे केले तर आपला गृह कर्जाचा मासिक हप्ता साधारण रु. १९,६३८ होईल , आपण आपली रु. २१०० ची एस आई पी २५ वर्ष चालू ठेवली तर एस आई पी तील वाढ रु. ३५ लाख होईल. म्हणजेच गृह कर्जावरील मुद्दल व व्याज दोन्ही आपण परत मिळवू शकतो. तसेच आपल्या उतार वयात चांगली संपत्तीही निर्माण झालेली असेल.

आपण जर का शिस्तबद्ध पद्धतीने थोडा आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन घेतला म्हणजेच , आपले उत्पन्न हे दरवर्षी वाढत असते त्या प्रमाणात जर आपण एस आई पी ची रक्कमही वाढवली तर. आजकाल म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अप एस आई पी ची सेवा देतात. रु २१०० ने चालू केलेली एस आई पी आपण दर वर्षी ठराविक रकमेने वाढवू शकतो. जर आपण आपली एस आई पी ची रक्कम दरवर्षी किमान रु ५०० ने वाढविली आणि पुढील २० वर्षात म्युच्युअल फंडाचा १२ % परतावा गृहीत धरला तर आपली एस आई पी ची रक्कम वाढून रु. ५० लाख होऊ शकते. म्हणजेच मुलांचे उच्च शिक्षण, लग्न , निवृत्ती नियोजन अशी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चांगली संपत्ती निर्माण केल्याचे समाधान.

Private File - Access Forbidden

इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे कि आपला देश जेव्हा आर्थिक महासत्ता होईल त्यानंतर मिळणार परतावा हा थोडा कमी होईल. त्यामुळे वरील आकडेवारी फक्त ढोबळ अंदाज बांधण्यासाठी वापरावा. आपल्या आर्थिक सल्लागाराकडून आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार व्यवस्थित नियोजन करून घ्यावे.
आपले स्वतःचे तणावमुक्त गृह कर्जाने , मालकी हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा.

धन्यवाद.

निलेश तावडे

लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत होते सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत
[email protected]
९३२४५४३८३२
www.nileshtawde.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 1782 - Today Page Visits: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!