लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायात आणि इतर क्षेत्रातही स्लोगन ला खूप महत्व आहे. स्लोगन, व्यवसायाला कशासाठी ओळखलं जावं हे एका ओळीत स्पष्ट करतं. सोपी भाषा, तात्काळ लक्ष वेधून घेणारी आणि लक्षात राहणारी शब्दरचना हे स्लोगन चे वैशिष्ट्य असते. आणि फक्त व्यवसायातच नाही तर राजकारण, सामाजिक कार्य, प्रोफेशन आणि अगदी धार्मिक कार्यातही स्लोगनचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, आणि प्रभावीसुद्धा ठरतो आहे.
प्रत्येक स्लोगन आपली ओळख निर्माण करत असतं
‘इंडिया कि अपनी दुकान’ हे अमेझॉन च स्लोगन आपण अमेझॉन वर कशासाठी भेट द्यायची आहे हे सांगतं.
‘बेच दे’ हे OLX चं स्लोगन आपल्याला वेबसाईट कशासाठी वापरायची आहे ते सांगतं.
अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया.
सर्फ, दाग अच्छे है.
एशियन पेंट्स, हर घर कुछ केहता है
थंडा मतलब कोका कोला
बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी
लाईफबॉय है जहाँ तंदुरुस्ती है वहा
An Idea कॅन चेंज युअर लाईफ
किटकॅट, हॅव अ ब्रेक हॅव या किट कॅट
असे कितीतरी स्लोगन आहेत ज्यांनी आपल्या ब्रँड ची ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक स्लोगन हे त्या ब्रँड ची ओळख सांगतात. संबंधीत ब्रँड आपण कशासाठी ओळखायचा आहे हे ते स्लोगन आपल्याला सांगतं. काही ब्रँड ला तर स्लोगन मुळे ओळख मिळालेली आहे. प्रत्येकाची आपली खासियत आहे. पण यात बळजबरीपणा कुठेही नाही. स्लोगन असलं पाहिजे म्हणून काहीही वाक्ये वापरली जात नाहीत. जे सांगायचं आहे तेच, पण मोजक्या आणि आकर्षक शब्दात सांगता आलं पाहिजे हे स्लोगनचं उद्दिष्ट असतं.
राजकारणातही स्लोगन ला खूप महत्व आहे. अगदी मागील शंभर वर्षांपासून कितीतरी राजकीय स्लोगन सुद्धा सुपरहिट ठरलेले आहेत. कित्येक स्लोगननी सत्ताबदल केलेत.
२०१४ मधे ‘अबकी बार मोदी सरकार’ या स्लोगन ने मोदींना प्रधानमंत्री केलं. ‘अब कि बार’ या शब्दात यावेळी कोण? या प्रश्नच उत्तर मतदारांना दिलं गेलं होतं.
Yes We Can हि ओबामांची गाजलेली ओळ. यामध्ये “आपण बदल घडवू शकतो का?” या मतदारांच्या शंकेला उत्तर दिलं होतं.
Make America Great Again या स्लोगन ने ट्रम्प यांना अमेरिकेचं राष्ट्रपती बनवलं. या वाक्याने आपण कुठेतरी मागे पडत आहोत या अमेरिकन तरुणांच्या न्यूनगंडावर फुंकर घातली गेली होती.
स्थानिक राजकारणातही बरेच स्लोगन हिट ठरलेले आहेत. पण ते स्लोगन मुख्यत्वे एखाद्या व्यक्तीला उद्देशून असतात, त्यात काहीही सांगण्याचा प्रयत्न केलेला नसतो. . म्हणून मर्यादित होतात.
स्लोगन बळजबरी वापरता येत नाही. जे सांगायचंय, तेच जर सांगता येणार नसेल तर बळजबरीच स्लोगन ब्रँडला खराब करू शकतं. स्लोगन हि दुधारी तलवार आहे. ते जेवढं फायद्याचं आहे तेवढंच घातकही ठरू शकतं. स्लोगन बनवणारे कित्येक प्रोफेशनल्स मार्केटमधे असतात. भरपूर फी घेतात. पण निशाणा अचूक साधतात.
व्यवसायासाठी स्लोगन असावं. पण ते बळजबरी चिटकवलेलं नसावं. स्लोगन नसलं म्हणून व्यवसाय लहान होत नाही, आणि असल्याने मोठाही भासत नाही. स्लोगन असतं ते आपल्या व्यवसायाला ग्राहकांनी कशासाठी ओळखावं हे एका वाक्यात सांगता यावं यासाठी. प्रत्येक स्लोगन हिट होतंच असं काही नाही. जे हिट होतं तेवढंच फक्त आपल्या लक्षात राहतं, इतकंच. दुनिया स्लोगन ची आहे. जगभरात स्लोगन ची चलती आहे. कुठेही गेलात तरी व्यवसायात, राजकारणात, प्रोफेशनमधे, समाजकारणात स्लोगनचा पुरेपूर वापर होत असल्याचे लक्षात येईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील