निर्णयशक्ती (११)… प्रलोभने टाळा, इच्छाशक्ती वाढवा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

धरसोडवृत्ती, घेतलेला निर्णय बदलण्याची वृत्ती हा शाप असतो. या शापावर उ:शापही आहे. तुमची इच्छाशक्ती वाढवा. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पुढच्या दिवसभराच्या बारा तासात कोणकोणती कामे करायची आहेत हे नक्की व विचार करून ठरवा. व त्याप्रमाणे ती कामे पार पाडा. ठरलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल करू नका. एवढे प्रत्येकाला करता येण्यासारखे आहे. यातून तुमची इच्छा शक्ती वाढेल.

एक लहानसे उदाहरण घेऊ. तुम्ही संध्याकाळी बाजारात जाऊन काही खरेदी करायची असे सकाळी ठरवले होते. दुपारी तुमच्याकडे एक मित्र आला. तो म्हणाला, “चला, चांगला चित्रपट लागला आहे, तीनच्या खेळाला जाऊया”. तुम्ही लोभात पडता. तुम्ही म्हणता ‘चला जाऊया’. तुम्ही मित्राला असे सांगत नाही की, “माझे दुसरे काम आहे, मी येऊ शकत नाही”. इथे तुमची इच्छा शक्ती कमी पडलेली असते. पण असे जो सांगू शकतो, त्याची इच्छाशक्ती वाढीला लागते.

प्रत्येक माणसाला रोजच छोटे-छोटे निर्णय घ्यावे लागतात. ते ठामपणे घेण्यात जर तो यशस्वी झाला तर व्यवसायातील मोठे निर्णय घेणेही त्याला सोपे जाते. म्हणून तुम्ही किरकोळ प्रलोभने टाळायला शिका. ठरलेले काम सोडून सिनेमाला जाणे म्हणजे प्रलोभनाला बळी पडणेच आहे.

ज्यांच्याजवळ आत्मविश्वास नसतो, त्यांना परिस्थिती अचूक समजत नाही. यामुळे स्वतः पुढाकार घेऊन एखादे काम करणे त्यांना माहित नसते. प्रलोभनांना बळी पडल्याने अपयशाची शक्यता वाढीस लागते. यामुळे आत्मविश्वास डळमळीत व्हायला लागतो. प्रलोभने टाळणे, त्यांना बाली न पडणे आवश्यक असते. यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. आणि यातूनच आपला आत्मविश्वास वाढीस लागतो.

निर्णयक्षम व्हा…
व्यवसाय साक्षर व्हा…

(निर्णयशक्ती या पुस्तकातील सारांश व अतिरिक्त लेखन श्रीकांत आव्हाड…) 

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!