कोरोनासारख्या साथीच्या आजारांच्या काळात व्यावसायिकांनी काय काळजी घ्यावी?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसेल तर तिला सामोरे कसे जायचे याचे नियोजन करणेच आवश्यक ठरते. कोरोनामुळे मार्केटमधे अचानक मोठ्या ब्रेकडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी व्यावसायिकांनी आपले व्यावसायिक, आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक ठरते. तसेच शारीरिक काळजी घेणेही महत्वाचे आहे.

कोरोनासारख्या साथीच्या आजारांच्या काळात व्यावसायिकांनी काय काळजी घ्यावी यासंबंधी थोडक्यात टिपण…

१. दिवसभरात व्यावसायिकांचा संपर्क खूप लोकांशी येतो. अशावेळी इन्फेक्शन होण्याचा सर्वात जास्त धोका व्यावसायिकांनाच असतो. मुख्यत्वे रिटेल कानदारांना. त्यामुळे ग्राहकांसमोर असताना व्यावसायिकांनी शक्यतो मास्क वापरावेत. सोबत सॅनिटायझर ठेवावेत. दर अर्ध्या तासाने सॅनिटायझर ने हात धुवावेत. तसेच समोरील डेस्क सुद्धा साफ करावा.

२. सर्वात जास्त प्रदूषित असते चलनी नोट आणि कॉईन्स. हजारो लोकांच्या हातातून फिरून हे चलन आपल्यापर्यंत आलेले असते. अशावेळी इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.या काळात व्यावसायिकांनी शक्यतो डिजिटल करन्सी वर भर द्यावा. डिजिटल पेमेंट साठी आता भरपूर ऑप्शन आहेत आणि बहुतेक ग्राहक याचा वापर करतात. त्यामुळे ग्राहकांकडे शक्यतो डिजिटल पेमेंट साठी आग्रह धरावा. (उद्योजक मित्र)

३. कोणतेही व्हायरल इन्फेक्शन असल्यास आपली व आपल्या कर्मचाऱ्यांची मेडिकल तपासणी करून घ्यावी. थोडी जरी शंका असेल तर कर्मचाऱ्यांवर तात्काळ उपचार सुरु करावेत स्वतःला काही इन्फेक्शन वाटले तरी लगेच डॉक्टरांशी संपर्क करावा. आजार बळजबरी अंगावर काढू नका. स्वच्छता पाळा, तसेच कामावरील कर्मचाऱ्यांना सुद्धा स्वच्छतेचे नियम पाळण्याची सक्ती करावी.

४. कामाच्या ठिकाणच्या आसपास कचरा साठू देऊ नका. आसपासचे कुणी कचरा टाकत असतील तर त्यांना प्रतिबंध करावा. मेडिकल शी निगडित सामान, औषधे यांचा कचरा आसपास साठू देऊ नका. असा कचरा दिसल्यास तात्काळ आरोग्य विभागाकडे संपर्क करावा. (उद्योजक मित्र)

५. अशा मोठ्या साथींच्या काळात मंदीचे प्रमाण वाढते. मार्केट मंदावते. त्यामुळे व्यावसायिकांनी मंदीची मानसिक आणि आर्थिक तयारी करून घ्यावी. खर्च कमी करावा, शिल्लक वाढवावी. शेअर मार्केटमधे गुंतवणूक असेल तर कंपनीची माहिती न घेता घाईगडबडीत त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू नये. वर्ष दोन वर्षात मार्केट पुन्हा पहिल्या स्तरावर येत असते. नुकसान करून घेऊ नका. चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. कंपनीची स्थितीच खराब असले तर मात्र काही नुकसानकारक निर्णय घ्यावे लागू शकतात. कारण मंदीमधे अशा कंपन्या संपून जात असतात.

६. व्यवसाय ठप्प झाल्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पुढच्या सिझन मधे काय काय करता येईल याचे नियोजन आत्तापासूनच करायला सुरुवात करा. जाहिराती थांबवू नका. जाहिरात करत राहा. महिना दोन महिने मार्केट शांत राहिलं तरी त्यांनतर पुन्हा ग्राहक घराबाहेर पडणारच आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या विस्मृतीत जाल असे काही करू नका. पुढच्या सिझनच्या हिशोबाने आत्तापासूनच थोड्याफार जाहिराती सुरु करा. (उद्योजक मित्र)

७. या मंदीच्या काळात उधारीचे नवीन ग्राहक शक्यतो पकडू नका. मंदीच्या कारणाखाली या ग्राहकांकडून पेमेंट लांबले तर व्यवसायाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून पडेल. शिल्लक रक्कम, येणारे पेमेंट, नफ्याचे प्रमाण याचा अंदाज घेऊन उधारीचे ग्राहक वाढवायचे कि नाही याचा निर्णय घ्या. शिल्लक बऱ्यापैकी असेल तर उधारीचे ग्राहक वाढवायला हरकत नसते. (उद्योजक मित्र)

८. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरू नका. मार्केट मंदावलेलं आहे, मंदी मोठी आहे हे जरी खरं असलं, तरी कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. त्यामुळे अशावेळी मनावर आर्थिक दडपण येऊ देऊ नका. कुटुंबियांशी आर्थिक परिस्थितीची, मंदीची चर्चा करा. परिस्थिती समजावून सांगा. त्यांनाही खर्चावर नियंत्रण ठेवायला सांगा. किमान तीन महिन्याचा इमर्जन्सी फंड हाती असावा अशी आर्थिक रचना करा.

व्यवसाय साक्षर व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राही

Total Page Visits: 1347 - Today Page Visits: 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!