ऑनलाईन फॉर्म फाईलींग व्यवसाय कधीही कुठेही चालणार व्यवसाय आहे. कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून देणे. यात नोकरीचे अर्ज, शाळांचे अर्ज, शासकीय अर्ज, नोंदणीचे अर्ज ई प्रकारचे सर्व फॉर्म्स येतात. हे सर्व फॉर्म ऑनलाईन भरणे आता सक्तीचे झालेले आहे. लोकांना फॉर्म भरण्याचे नेहमीच कंटाळा येतो तसेच फॉर्म चुकण्याची भीतीही असते. त्यामुळे फॉर्म शक्यतो माहितगाराकडूनच भरून घेतले जातात. ग्रामीण भागात नोकरीसाठी फॉर्म भरण्याचे प्रमाण खूप आहे, तसेच शहरात इविध परीक्षांचे फॉर्म भरण्याची कामे भरपूर असतात. निवडणुकीच्या काळात सुद्धा कामे खूप मिळतात. वर्षभर बऱ्यापैकी चालणार हा व्यवसाय आहे.
वेगवेगळे प्रकारचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. त्यामुळे यातील ज्याची माहिती असेल त्यातच सुरुवात करावी. काही माध्यमांतून फॉर्म भारण्यासंबंधी माहिती मिळते, तेथूनही माहिती घ्यावी. आधी स्वतः डेमो फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा. त्यात परफेक्शन आल्यानंतरच इतरांना सेवा द्यावी.
यासाठी कॉम्प्युटर सेटअप, इंटरनेट आवश्यक आहे. एक लहानसे शॉप सुद्धा पुरेसे आहे. तसेच इंग्रजीचे ज्ञान चांगले असावे. ९०% फॉर्म्स इंग्लिश भाषेतच असतात.
आवश्यक गुंतवणूक
किमान रु. शॉप सेटअप रु. ३० ते ५० हजार
कॉम्प्युटर इंटरनेट १५,०००/-, इतर ५,०००/-
जर सुरुवातीला शॉप ची गुंतवणूक शक्य नसेल तर घरातूनही सुरु करू शकता. लोकांना तुमची सेवा माहित होणे आणि तुमच्यापर्यंत पोहोचणे सोपे होणे महत्वाचे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
या व्यवसायासंबंधी काही मार्गदर्शन हवे असल्यास जवळच्या उद्योजक मित्र शाखेमध्ये संपर्क साधावा
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
Dear sir I am from latur maharashtra i want real {jenun}form filling job work please
आपले सरकार केंद्र व आधार केंद्र सुरू करावयाचे आहे मार्गदर्शन करावे ही विनंती.