‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
काल एकाचा कॉल आला होता.
भाजीपाल्याचा व्यवसाय सुरु केला. गुरुवार शुक्रवार चांगला धंदा झाला, पण शनिवार रविवार एकदम कमी झाला. म्हणून सोमवारपासून व्यवसाय बंद करून पुन्हा नोकरी जॉईन केली.भयंकर आहे कि नाही?
दोन वर्षांपूर्वी अशाच एका डॉक्टरचा कॉल आला होता. नगरमधे त्यांनी होमिओपॅथी क्लिनिक सुरु केलं, आठवडाभरात एकही पेशंट आलं नाही म्हणून क्लिनिक बंद करून नगर सोडून थेट गावाकडे शिफ्ट झाले.
वर्षभरापूर्वी एक कॉल आला होता. एकाने व्यवसाय सुरु केला, म्हणजे फक्त सेटअप उभा केला पण आता विक्री झेपणार नाही या टेन्शनने पहिल्याच दिवसापासून त्याने अंथरून पकडलं होतं. आजारी पडला होता. माझ्याच्याने व्यवसाय शक्य नाही म्हणायचा.
वर्ष दोन वर्षात चार पाच व्यवसाय केलेल्यांचे तर नेहमीच कॉल येतात. प्रत्येक जण म्हणतो व्यवसाय चालला नाही. पण हा आरोप योग्य नाही. आपल्याला व्यवसाय करता आला नाही असे म्हणावे. कारण व्यवसाय सुरु व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेत आपण चार व्यवसाय सुरु करून बंद करतो, आठ दहा दिवसात व्यवसाय बंद करतो अशावेळी आपल्याला व्यवसाय जमलेला नसतो हेच सत्य असते, त्यात व्यवसायाचा काही दोष नसतो.
पहिल्या सहा महिन्यात, वर्षभरात जिथे तुम्ही पैशाचा, नफ्याचा हिशोब करायला सुरुवात करता, कुणाच्यातरी उत्पन्नाशी तुलना करता, तिथे तुम्ही व्यवसायाला अपयशाकडे ढकलून दिलेलं असतं.
संयम जर नसेल तर व्यवसाय होऊ शकत नाही.
पहिल्याच दिवसापासून फिक्स उत्पन्न हवं असेल तर व्यवसाय होऊ शकत नाही.
नुसता पैसा गुंतवला म्हणून व्यवसाय सुरु झाला आता फक्त आराम करायचा असा विचार करत असाल तर व्यवसाय होऊ शकत नाही.
मोठा सेटअप उभा केला म्हणून व्यवसाय चालणार असा विचार करत असाल तर व्यवसाय होऊ शकत नाही.
चार माणसं हाताखाली नेमली कि व्यवसाय चालतो असा विचार करत असाल तर व्यवसाय होऊ शकत नाही.
व्यवसाय त्याचवेळी होतो
ज्यावेळी तुम्ही त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देता.
व्यवसायासाठी संयम हवा असतो,
समर्पण वृत्ती हवी असते,
झोकून देण्याची मानसिकता हवी असते,
लाज न बाळगता कोणताही काम करण्याची तयारी हवी असते…
तरच व्यवसाय होऊ शकतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राही
सर, मी सोलापुरातील रहिवाशी आहे. आपण जी माहिती देता ते वाचून वाचून स्वतः एक व्यवसाय करण्याची जिद्द तयार होऊ लागते.. कृपया तुम्ही दर 2 किंवा 3 दिवसाआड असे पोस्ट टाकत चला, जेणेकरून मनात नेहमी ती ज्योत पेटती राहील आणि कधीतरी त्याचा लख्ख प्रकाश पडेल. मलाही व्यवसाय आवडतो पण मी नौकरी करतो आणि कामानिमित्त मी 3 ते 6 महिने बाहेरगावी जावे लागते. सोलापुरात असलो तरी फार झाले 3/4 महिने पण…
माझ्यासाठी काही सुचत असेल तर कृपया मार्गदर्शन करावे. मला शेंगा चटणी चा व्यवसाय सुरू करावा, असे वाटते.
किराणा मालाशी संबंधित कोणताही व्यवसाय कधीही चांगलाच आहे. मग ते किराणा दुकान सुरु करणं असो किंवा किराणा दुकानात देता येतील असे प्रोडक्ट बनवणं असो, दोनीही परिस्थितीत चांगला व्यवसाय होऊ शकतो. स्थानिक मार्केट जरी पकडलं तरी चांगला व्यवसाय होतो. फक्त तुम्ही जे काही निवडाल त्याची सध्याची स्थानिक चैन कशी काम करते ते पाहून घ्या. लोकांचा प्रतिसाद कोणत्या प्रकाराला असतो, दुकानदार कशा प्रकारे काम करतात, विक्री साखळी कशी आहे याची माहिती घेऊन काम सुरु करा