कमी गुंतवणुकीचे व्यवसाय (२)… टाईपिंग सर्व्हिस

कमी गुंतवणुकीचे व्यवसाय (२)… टाईपिंग सर्व्हिस

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

टाइपिंग व्यवसाय निरंतर चालणारा आहे. कोणतेही कागदपत्र, शासकीय कागदपत्र, माहिती, अग्रीमेंट, व्यवसायिकांची कागदपत्रे इत्यादी टाईप करून देणे असे सर्व काही यात समाविष्ट आहे. उत्पन्न सुद्धा चांगले मिळते. साध्याच ३० रुपये प्रति पण टाईपिंग चार्जेस आहेत. कित्येक टाइपिंग इंटर्स मधे दिवसाला शे-दोनशे पाने किमान टाईप केले जातात. व्यवसायाचे ठिकाण सरकारी कार्यालय किंवा न्यायालयांजवळ तर ग्राहक वेटिंग ला असतात.

यासाठी तुम्हाला टाइपिंग चा कोर्स करणे आवश्यक आहे. वेगात टाईप करता येणे आवश्यक आहे. स्थानिक परिसरात टाइपिंग क्लासेस असतील तेथून कोर्स करून घ्यावा.

घरी किंवा ऑफिसवर जाऊन ग्राहकाला हवा असलेला मॅटर टाइप करून देण्यासारख्या सर्व्हिस सुरु केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल. यात होम सर्व्हिस ला चांगले मार्केट आहे. कित्येक प्रोफेशनल्सना, वकिलांना ऑफिसवर येऊन हवा असलेला मॅटर टाईप करून देणारी सर्व्हिस हवी असते. यादृष्टीनेही विचार करता येईल.

गुंतवणूक – कॉम्प्युटर सेटअप साठी रु. ३०-५० हजार
शॉप सेटअप करणार असाल तर ५०-६० हजार रुपये खर्च येईल. सरकारी कार्यालयांजवळ तर कित्येक टाईपिंग सेंटर्स ५X८ च्या पत्र्याच्या शेड मधे सुरु झसलेले दिसतील. ते तर खूप स्वस्तात होतात.
घरपोच सर्व्हिस देणार असाल तर कोणतीच गुंतवणूक लागणार नाही. सुरुवातीच्या प्रमोशन ला थोडाफार खर्च येईल आणि कोर्स करण्याचा खर्च.
काही जण फिरत्या वाहनामध्ये, व्हॅनमधे लॅपटॉप प्रिंटर ठेऊन दररोज ठरलेल्या लोकेशन ला गाडी नेऊन उभी करतात. यासाठीसुद्धा एक-दीड लाखापेक्षा जास्त गुंतवणूक लागत नाही.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राही

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!