लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायातील आर्थिक गणित जुळत नाही, नफ्या तोट्याचा हिशोब लागत नाही, महिन्याच्या शेवटी हाती काहीच उरत नाही, प्रत्येक महिन्याला व्यवसायात खिशातून पैसे टाकावे लागतात अशा समस्या सांगणारे मला बरेच कॉल येतात. या प्रत्येकाला मी आधी एक प्रश्न विचारतो, दररोजचा जमा खर्च वहीवर लिहून ठेवता का? आणि बहुतांशी वेळा त्यांचं उत्तर “नाही” असंच असतं. जवळजवळ ९९% जणांचं उत्तर “नाही” असतं. कोणता हिशोबच ठेवला जात नसल्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाचे आर्थिक गणित सुटणे शक्यच नसते. आपला खर्च कुठे होतो, पैसा कुठून येतोय, उधारी वेळेवर वसूल होत आहे का, खर्च कुठे कुठे कमी करता येऊ शकतो, उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने वाढवता येऊ शकतं अशा कोणत्याच गोष्टींचा अंदाज येत नाही.
अशावेळी मग मी त्यांना एकच सांगतो कि आजपासून सर्व आर्थिक व्यवहार, दररोजचे जमा खर्च वहीवर लिहायला सुरुवात करा, आणि दर महिन्याच्या शेवटी आपल्या व्यवसायाचे ताळेबंद तपासा… जर एवढं करूनही प्रॉब्लेम सुटत नसेल तर मला तीन महिन्यांनी पुन्हा कॉल करा….
मला तीन-चार महिन्यांनी कॉल येतात, पण समस्या सुटल्याचे कॉल येतात. आमचं काय आणि कुठे चुकत होतं हे आमच्या लक्षात आलं हे सांगण्यासाठी कॉल येतात. म्हणजे त्यांची समस्या त्यांनीच सोडवलेली असते, फक्त ती सोडवण्याचा मार्ग माहित नव्हता म्हणून ती समस्या जास्त मोठी झालेली असते.
व्यवसाय कधीच चुकत नसतो… आपलं नियोजन कुठेतरी कमी पडत असतं….
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खूप छान माझ्यासारख्या कित्येक भरकटलेल्या लोकांना आपल्या मार्गदर्शनाचा नाव होत आहे उद्योजक मित्रा चे मनापासून खूप खूप आभार