लोकांना तुमची जी कमतरता वाटते, बऱ्याचदा तीच तुमची ताकद असते.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

अमिताभ बच्चन… आवाज योग्य नाही म्हणून ऑल इंडिया रेडिओ मधे नोकरी नाकारली गेली होती. आज अमिताभ बच्चन यांची ओळख त्यांचा आवाजच आहे.
वॉल्ट डिजने… क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता) नाही म्हणून नोकरी नाकारली गेली होती. याच वॉल्ट डिजनेंच्या संकल्पनेतून जगभरात प्रसिद्ध असलेले कित्येक कार्टून्स अवतरले. आजही वॉल्ट डिजने कंपनी कल्पनांच्या जगातील बादशहा आहे.
मी. बिन, म्हणजेच रॉन अॅटकिन्सन… शब्दोच्चार ठीक नाहीत म्हणून कला क्षेत्रात काम मिळत नाहते. त्याच अस्पष्ट शब्दोच्चारांना अॅटकिन्सन यांनी आपल्या कलेची ताकद बनवलं.

आपल्या आसपास अशी बरीच उदाहरणे सापडतील. लोकांनी त्यांच्यामधे ज्या कमतरता शोधल्या त्याच कमतरतांना त्यांनी त्यांची ताकद बनवलेलं दिसून येईल. एखादा खूपच शांत, कमी बोलणारा व्यक्ती असेल पण त्याची शांतताच त्याला एखाद्या क्षेत्रात यश मिळवून देते. एखादा उंचीने कमी असेल, त्याला बुटका म्हटलं जात असेल, पण तीच उंची त्याला त्याची ओळख निर्माण करण्यासाठी कमी आलेली दिसून येते. एखादा खूपच जाड असेल, आपण त्याला ढोल्या म्हणत असू पण त्याची तब्येतच त्याला एखाद्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करताना दिसून येते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्या आसपास आहेत. आपण त्यांना त्यांच्यातील कमतरता सतत सांगत असतो, आणि ते त्या कंटाळतेला त्यांची ताकद बनवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात.

आपल्यातील बऱ्याच जणांमधे आपल्या काही गुणधर्मांविषयी न्यूनगंड असतो. हा न्यूनगंड बऱ्याचदा आपल्या लहानपणापासून आपल्या आसपासच्या किंवा आपल्या घरातील लोकांनी आपल्याविषयी केलेल्या चर्चेतून निर्माण झालेला असतो किंवा आपल्यावर काही गोष्टी लादण्यातून निर्माण झालेला असतो. याचा परिणाम असा होतो कि आपण आपल्यातली क्षमता ओळखायला कमी पडतो, किंवा आपल्याला आपली क्षमता माहित असते पण तिचा वापर करण्याची आपली हिम्मतच होत नसते.

बच्चन, डिजने, अॅटकिन्सन यांच्या असामान्यत्वाचं कारणच हे आहे कि त्यांनी त्यांच्या या कमजोरीलाच त्यांची ताकद बनवलं. जी गोष्ट त्यांना मागे खेचू शकत होती तिलाच त्यांनी त्यांच्या यशाचं साधन बनवलं. न्यूनगंड म्हणजे काय असतो? आपण कुठेतरी कमी आहोत, आपण हे करूच शकत नाहीत, आपली क्षमता नाही, मला जमणार नाही हे आपण स्वतःला सांगत असतो. यातूनच न्यूनगंड वाढत जातो.

पण याच्या विरुद्ध जर विचार केला तर?

मी कुठेतरी कमी पडतोय… हरकत नाही, त्या कमतरतेला दूर करण्याचा प्रयत्न करू.
मी हे करू शकत नाही… पण प्रयत्न तर करून पाहू शकतो ना?
माझ्यात तेवढी क्षमता नाही… पण मी क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.
मला जमणार नाही.. पण एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

एकाच पॉईंट वर दोन्ही बाजूंनी विचार केला जाऊ शकतो. एक आपल्यातील न्यूनगंड वाढवतो दुसरा आपल्याला पुढे जाण्यासाठी साहाय्यकारी ठरतो.

ठरवलं तर, आपल्यात कमजोरी काहीच नसते. जी लोकांना आपली कमजोरी वाटते तिलाच आपली ताकद बनवण्याचा प्रयत्न करा. यामुळे एक महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. ज्याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते, जे आपल्याला आवाक्याबाहेरचं वाटतं तेच केल्याने इतर इतर कोणत्याही प्रकारची भीती आपल्या मनात रहातच नाही. प्रत्येक गोष्टीला आपण पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जायला तयार होतो. याचा आणखी एक चांगला फायदा होतो, जे लोकांना तुमच्याकडून अपेक्षितच नसत, तेच तुम्ही केल्याने तुमच्या यशाला एक वेगळीच झळाळी मिळते.

बघा.. जर तुम्हाला स्वतःमध्ये काही कमी जाणवत असेल, किंवा लोकांकडून तुमच्यातील काही असल्या-नसलेल्या कमतरता तुमच्या लादण्याचा करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर थोडा वेगळा विचार करून पहा. त्यांना जी गोष्ट तुमची कमतरता वाटते तिलाच तुमची ताकद बनवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमचं भविष्य तुम्ही विचारही केला नसेल इतकं वेगळं असू शकेल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!