लोगोमुळे व्यवसाय यशस्वी होत नसतो, व्यवसाय यशस्वी झाल्यामुळे लोगो आकर्षक वाटत असतो.


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

खूप जणांचा नवीन व्यवसायाचा लोगो बनवताना प्रॉब्लेम होतो तो, लोगो कसा असावा याबद्दल. बहुतेकांना ते ज्या क्षेत्रात व्यवसाय करणार किंवा करत आहेत त्यातीलच एखाद्या प्रसिद्ध ब्रॅण्डसारखा लोगो बनवायचा असतो. त्यांना असं वाटत कि आपण त्यांच्यासारखा लोगो बनवला तर आपलाही व्यवसाय फेमस होईल, आपलाही ब्रँड एकदम मोठा वाटायला लागेल. बनवतात लोगो, कुणाकडून तरी बनवून घेतात. पण तो लोगो लोकांना चांगला वाटण्यापेक्षा कॉपीच वाटतो. आणि तिथेच व्यावसाय फसतो. व्यवसायाचं स्वतंत्र अस्तित्वच संपून जातं.

यशस्वी गोष्ट नेहमी आकर्षक वाटत असते. लोगो आकर्षक नसतो, तर तो व्यवसाय यशस्वी असल्यामुळे आपल्याला लोगोही आकर्षक वाटत असतो. तो कसाही असला तरी चांगलाच वाटतो. ‘कोका कोला’ चा लोगो हे फक्त नाव आहे, तो एक फॉन्ट आहे. त्यात कोणतीही डिझाईन नाहीये, पण तरीही आकर्षक वाटतोच ना? होंडा च्या लोगोमधे असं काय विशेष आहे? पण तरीही आकर्षक वाटतोच ना? फोर्ड चा लोगो, टाटा चा लोगो, रिलायन्स चा लोगो, महिन्द्राचा लोगो… हे सगळे लोगो आकर्षक दिसावेत म्हणून बनवलेले नाहीत. एक तर ते त्यांचं फक्त नाव लोगोसाठी वापरतात किंवा त्यांचा व्यवसाय कशासाठी आहे, ते ग्राहकांना काय देऊ इच्छित आहेत हे त्या लोगोमधून प्रतीत होत असतं. या कंपन्यांचं यश त्यांच्या लोगोला आकर्षक बनवत असतात. त्यांच्या लोगोच्या एखाद्या पॅटर्न मुळे त्यांना यश मिळालेलं असतं असा गैरसमज करून घेऊ नका.

लोगो व्यवसायाला साजेसा असावा, चांगला असावा, त्यातून काहीतरी प्रतीत होत असेल तर उत्तम, आकर्षक असावा, पण तो एखाद्या प्रसिद्ध ब्रॅण्डसारखाच असावा, त्याच पॅटर्नमधे असावा असा अट्टाहास व्यवसायच स्वतंत्र अस्तित्व हिरावून घेऊ शकतो.

लोगोमुळे व्यवसाय नसतो, व्यवसायामुळे लोगो असतो…
लोगोला महत्व आहे, पण तो कुणासारखा तरी नसावा, तर आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवणारा असावा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!