‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : निलेश गावडे
======================
आपल्या पैकी अनेकांना आपले गोल्स साध्य करता येत नाहीत. त्याचे कारण आपण अपयशी आहोत असे नसून, खरे कारण आपल्यापैकी अनेकांना गोल्स कसे सेट करायचे हे समजले नाही हे आहे. जर तुम्हाला तुमच्या गोल्स वर काम करण्यात सातत्य हवे असेल, गोल्स बदलणार नाहीत, ते साध्य होतील असे वाटत असेल तर गोल्स सेट करताना तुम्ही योग्य शब्द वापरणे गरजेचे आहे. आपण नेहमी कोणत्या न कोणत्या माध्यमातून स्वतःशी व इतरांशी कम्युनिकेट करत असतो. मौनाची सुद्धा भाषा असते. त्यामुळे आपण शब्द कसे नि कोणते वापरतो याचा आपल्या यश/अपयशात खुप मोठा वाटा आहे.
तुम्ही SMART गोल सेटिंच्या पद्धती विषयी माहिती घेतली असेल. SMART गोल सेट करणे हे फक्त कोड्याचा एक भाग आहे. तुम्ही तुमचे गोल SMART फ्रेमवर्क प्रमाणे सेट केलेले असू शकते आणि तरी तुम्हाला ते साध्य करण्या साठी मोटिवेशन मिळत नसेल, तर त्याचे कारण तुम्ही तुमचे गोल्स सकारात्मक भाषेत सेट न करता नकारात्मक भाषेत सेट केलेले असू शकते.
जर तुम्हाला रोजची To-do लिस्ट पूर्ण करण्याचे काम करण्याऐवजी तुमच्या गोल्स पर्यंत पोचायचे असेल तर गोल्स सेट करताना खालील 5 नकारात्मक / demotivational शब्द वापरणे टाळा.
1. Should / पाहिजे :
तुम्हाला सांगता येईल का तुम्हाला उत्साह कधी वाटला होता जेव्हा तुम्ही तुमचे वाक्य “I should really __.” / “मला खरेच ____ पाहिजे” असे उच्चारले होते.
Should/पाहिजे आपल्यात अपराधीपणाची भावना निर्माण करते. आपल्याला कृती करण्यास उत्साहित करत नाही. ते आपल्या मनात त्या कमिटमेंट्स समोर आणते जे आपण पूर्ण करू शकलो नाही, किंवा त्या जबाबदार्या विषयी जाणीव करून देते ज्या आपण पूर्ण करू शकलो नाही.
I should ऐवजी i will म्हणा. “मला पाहिजे” ऐवजी “मी करेन” असे म्हणा.
उदा.
या महिना अखेरी पर्यंत मला क्रेडिट कार्ड चे कर्ज फेडले पाहिजे
ऐवजी
या महिना अखेरी पर्यंत मी क्रेडिट कार्डचे कर्ज फेडेन.
इतर 4 असे कोणते शब्द आहेत जे तुम्ही गोल्स सेट करताना वापरणे टाळले पाहिजे, ते पुढच्या पोस्ट मध्ये.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील