‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
एखादी उत्पादन क्षेत्रातील कंपनी सुरु करण्यासाठी मशिनरी आवश्यक असतातच. पण आपण या क्षेत्रात नवीन असू तर खात्रीशीर मशिनरी विक्रेते आपल्याला माहित नसतात. मशिनरी कुणाकडे मिळतील, त्यांच्या किमती कशा आहेत, चांगली मशिनरी कशी शोधावी, खात्रीशीर विक्रेते कसे मिळतील असे अनेक प्रश्न पडतात. चांगले मशिनरी विक्रेते शोधणे हे तसे थोडे कष्टाचेच काम आहे.
चांगले मशिनरी विक्रेते शोधण्यासाठी या काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला कामी येतील.
- इंटरनेटवर मशिनरी विक्रेत्यांची माहिती गोळा करा.
- ओळखीच्या उद्योजकांकडून विक्रेत्यांची माहिती मिळवा.
- स्थानिक शहरातील विक्रेते शोधा.
- प्रत्येक विक्रेत्याला संपर्क करून कोटेशन मागवून घ्या
- प्रत्येक कोटेशन मधील मशिनरींची माहिती काळजीपूर्वक वाचा
- मशीनची क्षमता, गुणवत्ता, त्यात वापरलेले मटेरियल, मेंटेनन्स, एकूण किंमत अशी माहिती काळजीपूर्वक वाचा
- विक्रेत्याची वेबसाइट असेल तर वेबसाईट वर माहिती घ्या
- सर्व कोटेशन्स आणि इतर माहिती घेऊन योग्य वाटतील असे विक्रेते बाजूला काढा (फिल्टर करा)
- या सर्वांना प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिसवर, उत्पादन युनिटवर जाऊन भेट द्या
- विक्रेते ट्रेडर आहेत, कि मशिनरी स्वतः बनवतात याची माहिती घ्या
- ट्रेडर असतील तर सर्व्हिस कशी मिळणार,
- तज्ज्ञ उपलब्ध आहेत का याची माहिती घ्या.
- स्वतः बनवत असतील तर तज्ज्ञ कंपनीकडे उपलब्ध असतात.
- सध्याचे ग्राहक कोण आहेत याची माहिती घ्या. संबंधितांना संपर्क करून त्यांच्या कंपनीवर भेट देता येईल का पहा. किंवा संपर्क करून किमान मशिनरी विक्रेत्यांची गुणवत्ता, विक्रीपश्चात सेवा कशी आहे याची माहिती घ्या.
- विक्रेत्यांची पेमेंट टर्म कशी आहे, मशिनरी वेळेवर पुरवितात कि नाही, आर्थिक व्यवहारांत त्यांचे नाव कसे आहे, विश्वासार्हता कितपत आहे अशी माहिती गोळा करा
मशिनरी निवडताना काय पाहावे ?
- मशीनचा रिजेक्शन रेशो कमीत कमी असावा. जास्त रिजेक्शन रेशोमुळे प्रोडक्शन कॉस्ट वाढते.
- मशीन कोणत्या मटेरियल ने बनवले आहे पाहावे. चांगले मटेरियल मशिनरींचे आयुष्य वाढवते.
- मेंटेनन्स कालावधी आणि खर्च कमीत कमी असावा.
- विक्रेत्याची विक्रीपश्चात सेवा चांगली असावी.
- विक्रेत्याकडे स्वतःची तज्ज्ञांची टीम असल्यास उत्तम
- विक्रेत्याचा पोर्टफोलिओ पाहावा. सध्याचे ग्राहक कोणकोण आहेत याची माहिती घ्यावी.
- माहितीतील एखाद्या कंपनीत हव्या असलेल्या मशिनरी सप्लाय केलेल्या विक्रेत्याला प्राधान्य द्यायला हरकत नाही.
- आपण GST नोंदणी केलेली असेल तर GST नोंदणीकृत असणाऱ्या विक्रेत्याला प्राधान्य द्यावे. टॅक्स बेनिफिट घेता येतो.
मिळणाऱ्या प्रत्येक माहितीनंतर फिल्टर प्रोसेस वापरून दोन- तीन विक्रेत्यांना फायनल करा, आणि त्यातून एका विक्रेत्याची निवड करा.
- पेमेंट टर्म आधी ठरवून घ्या
- मशीन डिलिव्हर कधी होणार हे ठरवून घ्या
- सर्व व्यवहार कागदोपत्री करा
- विक्रेत्याकडून कोटेशन घ्या, त्याला अधिकृत PO द्या.
- PO मधे सर्व नियम अटींचा उल्लेख करा
- पेमेंट केल्याचा पुरावा हाती ठेवा. म्हणजे ऑनलाईन, पेमेंट, चेक पेमेंट, RTGS इत्यादी. कॅश पेमेंट शक्यतो करू नका. केल्यास त्याची रिसिप्ट घ्या.
मशिनरी विक्रेते शोधण्यासाठी, चांगली मशीन शोधण्यासाठी, काळजीपूर्वक व्यवहार करण्यासाठी या काही टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील