यशाच्या मार्गावर (२)… यशस्वी होण्याचा प्रवास


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

आपण कायम स्वतःशी, इतरांशी संवाद साधत असतो. प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती सर्व असा संवाद साधत असतात. तुम्ही मौन धारण करून किती वेळ बसू शकता? अनेक जण थोडा वेळच बसू शकतील. कारण आपण मौनात सुद्धा स्वतःशी संवाद साधत असतो. आपला माईंडसेट घडवण्यामागे आल्या भाषेचा खूप मोठा हात आहे. तसेच आपण एखाद्या कामात यशस्वी होणार की नाही हे सुद्धा आपल्या संवादावर ठरू शकते. आपण त्या कामात सहभागी असलेल्या इतरांशी कशा प्रकारचा संवाद करतो, आपण स्वतःशी संवाद (self talk) कसा करतो हे सर्व खूप महत्वाचे आहे. आपण कोणते शब्द वापरतो यावर आपण एके गोल्स साध्य करणार की नाही हे अवलंबून असते.

मागच्या पोस्ट मध्ये मी गोल्स सेट करताना कोणता शब्द टाळावा हे सांगितले. तो शब्द होता

१. Should/पाहिजे

आज आपण दुसरा कोणता शब्द वापरणे टाळावे ते समजून घेऊया.

२. Soon / लवकरच

SMART गोल सेटिंग चे गाईडलाईन्स सांगतात तुमच्या गोल्स ना तुम्हि काळ मर्यादा घातली पाहिजे. जो वर तुम्ही तुमच्या गोल्स साठी डेड लाईन सेट करत नाही, शक्यता आहे तुम्हाला तुमचे गोल्स साध्य करणे अवघड जाईल. तुम्ही शेवटचं, “करेन लवकरच किंवा थोड्या दिवसात” असे म्हंटलात आणि ते काम तुमच्या कडून पूर्ण झालंय, असे आठवते का ?

“करेन लवकरच” ऐवजी विशिष्ठ काळ मर्यादा (time line) सेट करा.

उदा.

“मी लवकरच स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करेन”
ऐवजी
“मी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करेन”

“मी लवकरच 10 ठिकाणी जॉब साठी resume पाठवेन”
ऐवजी
“मी शुक्रवार पर्यंत 10 ठिकाणी जॉब साठी resume पाठवेन”

इतर 3 असे कोणते शब्द आहेत जे तुम्ही गोल्स सेट करताना वापरणे टाळले पाहिजे, ते पुढच्या पोस्ट मध्ये.

यशाच्या मार्गावर (१)… यशस्वी होण्यासाठी काय बदल कराल?

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!