यशाच्या मार्गावर (३)… यशस्वी होण्याचा प्रवास


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

आपण कायम स्वतःशी, इतरांशी संवाद साधत असतो. प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती सर्व असा संवाद साधत असतात. तुम्ही मौन धारण करून किती वेळ बसू शकता? अनेक जण थोडा वेळच बसू शकतील. कारण आपण मौनात सुद्धा स्वतःशी संवाद साधत असतो. आपला माईंडसेट घडवण्यामागे आल्या भाषेचा खूप मोठा हात आहे. तसेच आपण एखाद्या कामात यशस्वी होणार की नाही हे सुद्धा आपल्या संवादावर ठरू शकते. आपण त्या कामात सहभागी असलेल्या इतरांशी कशा प्रकारचा संवाद करतो, आपण स्वतःशी संवाद (self talk) कसा करतो हे सर्व खूप महत्वाचे आहे. आपण कोणते शब्द वापरतो यावर आपण एके गोल्स साध्य करणार की नाही हे अवलंबून असते.

मागच्या २ पोस्ट्स मध्ये मी गोल्स सेट करताना कोणते २ शब्द टाळावे हे सांगितले. ते शब्द होते

१. Should/पाहिजे

२. Soon / लवकरच

आज आपण तिसरा कोणता शब्द वापरणे टाळावे ते समजून घेऊया.

३. Quit /सोडणार

Quit / सोडणे म्हणजे पळ काढणे. जेव्हा आपण एखादी गोष्ट, सवय सोडणात म्हणतो तेव्हा आपण त्या पासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यात गम्मत अशी आहे की ज्या पासून आपण पळत असतो तेच नेमके आपल्या अंतर्मनासाठी महत्वाचे व्हायला लागते. ज्या पासून आपण पाळायचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टीचा आपण जास्त विचार करायला लागतो आणि आपण ते सोडू शकत नाही. “सोडणे” “पळ काढणे” हा यशस्वी लोकांचा शब्द नाही, मग तो आपण तरी का वापरायचा? पळ काढू नका, यशस्वी लोकांसारखे सामोरे जा.

सोडणार ऐवजी थांबवणार असे म्हणा.

उदा.

आज पासून मी सिगरेट सोडणार आहे

ऐवजी

आज पासून मी सिगरेट ओढणे थांबवेन.

इतर २ असे कोणते शब्द आहेत जे तुम्ही गोल्स सेट करताना वापरणे टाळले पाहिजे, ते पुढच्या पोस्ट मध्ये.

यशाच्या मार्गावर (१)… यशस्वी होण्यासाठी काय बदल कराल?

यशाच्या मार्गावर (२)… यशस्वी होण्याचा प्रवास

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!