
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक व चित्रकार : जयेश फडणीस
======================
एन. आर. नारायण मूर्ती-Narayan Murthy हे सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि उत्तराधिकारी आहेत.
1981 मध्ये, नारायण मूर्ती यांनी आपल्या काही मित्रांसह इन्फोसिसची स्थापना केली होती, आणि पाहता पाहता हि कंपनी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात एक अग्रणी कंपनी म्हणून नावारूपास आली. 1981 ते 2002 पर्यंत ते इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आणि त्यांच्या नेतृत्वात कंपनी अश्या काही कंपन्यांच्या रांगेत जाऊन बसली ज्याचा कोणी विचार हि केला नव्हता. ते केवळ भारतीय सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे आद्य मार्गदर्शक झाले नाहीत तर विदेशात मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी भारतीय कंपन्यासाठी प्रेरणास्त्रोत हि बनले.
फॉर्च्युन मासिकाने त्यांना जगातील 12 महान उद्योजकांच्या यादीत स्थान दिले आणि टाईम मासिकाने त्यांना ‘भारतीय आयटी’ उद्योगाचे जनक असे सम्बोधले. देश आणि समाजातील त्यांचे योगदान पाहून भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मान केला.
इन्फोसिस सुरू करण्यासाठी त्याने पत्नीकडून 10,000 रुपये कर्ज घेतले. 1981 ते 2002 या काळात मूर्ती मूर्ती इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) होते आणि त्यांच्या नेतृत्वात एक छोटी सॉफ्टवेअर कंपनी असलेली इन्फोसिस हि कंपनी जगातील बड्या कंपन्यांच्या रांगेत जाऊन बसली.
नारायणमूर्ती नंतर, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन निलेकणी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. 2002 ते 2006 या काळात ते मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते कंपनीचे मुख्य मेंटर झाले. 2011 मध्ये त्यांनी इन्फोसिसमधून कंपनीचे सेवानिवृत्त अध्यक्ष म्हणून रजा घेतली.
इन्फोसिस व्यतिरिक्त त्यांनी बर्याच मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये स्वतंत्र निदेशक भूमिकाही निभावली. ते एचएसबीसी कॉर्पोरेट बोर्डावर स्वतंत्र संचालक आणि डी.बी.एस. बँका, युनिलिव्हर, आयसीआयसीआय आणि एनडीटीव्ही आदिमध्ये निदेशक होते. सल्लागार मंडळ आणि अनेक शैक्षणिक आणि परोपकारी संस्थांच्या समित्यांचे सदस्यही आहेत. यामध्ये कॉर्नेल युनिव्हर्सिटी, फोर्ड फाऊंडेशन, यू.एन. फाउंडेशन, इंडो-ब्रिटिश भागीदारी, एशियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इनसेड, ईएसएसईसी. ते पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते. त्यांनी ब्रिटीश टेलिकम्युनिकेशनच्या एशिया पॅसिफिक सल्लागार मंडळावरही काम केले आहेत. 2005 मध्ये त्यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे सह-अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलेला.
एन. आर. नारायणमूर्तींचे अमूल्य विचार
1. कधीही हार मानू नका … कधीही नाही!
2. मॅरेथॉन धावपटू व्हा …
3. आयुष्याप्रमाणे व्यवसायात पारदर्शकतेचा आदर करा
4. उदार व्हा
5. कितीही साध्य केलात तरी साधेपणा बाळगा
6. नेहमी शिकत रहा!
7. श्रीमंती मिळवा पण प्रामाणिकपणे
__
लेखन, माहिती संकलन व चित्र
जयेश फडणीस
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील