लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
आपण व्यवसायाची बरीच माहिती गोळा करतो, मार्गदर्शन घेतो, लेक्चर ऐकतो, पुस्तके वाचतो, पण आपण प्रत्यक्ष प्रोसेस मधे उतरायला नेहमीच बिचकत असतो. त्या प्रोसेस मधे उतरायला आपण नेहमीच घाबरतो. सगळं करून व्यवसाय सुरु जरी केला तरी विक्रीच्या बाबतीत गडबड होतंच असते. विक्रीचा अनुभव नसेल तर आपलं प्रोडक्ट विकायचं कसं हेच आपल्याला झेपत नाही. व्यवयात विक्री कौशल्य आवश्यक असते. ग्राहकांशी संवाद साधने, नेटवर्क तयार करणे हे सोपे काम नक्कीच नाही. पण हे नुसते ऐकून, वाचून, मार्गदर्शन घेऊन कधीच जमू शकत नाही. यासाठी प्रत्यक्ष फिल्ड वरच उताराने महत्वाचे असते.
व्यवसाय सुरु केला असेल तर सर्वात आधी काम करा ते म्हणजे विक्रीसाठी थेट मैदानात उतरा. कुणाच्या भरवश्यावर विक्रीचे अंदाज लावू नका. आपलं प्रोडक्ट आपल्यालाच विकायचंय हे लक्षात घ्या आणि थेट फिल्ड वर उतरा. गडबड होईल, चेष्टा होईल, काही काळ जमणार नाही, नकार ऐकावे लागतील, पण यातूनच पुढे तुम्ही परफेक्शनकडे जाल. सहा महिने पुरेसे आहेत सेल्स मधील बारकावे समजून घेण्यासाठी. यानंतर विक्रीसाठी तुम्हाला कुणाच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही. आणि तुमच्या सेल्स टीम ला सुद्धा तुम्ही योग्य प्रकारे हॅन्डल करू शकाल .
जर तुम्ही व्यवसाय सुरु केला नसेल, सुरु करण्याच्या विचारात असाल तर किमान ४-६ महिने कोणत्याही कंपनीकडे, डिस्ट्रिब्युटरकडे सेल्स प्रतिनिधी म्हणून काम करा. काम नाहीच मिळाले तर काही कंपन्यांना संपर्क करून त्यांचा माल कमिशन बेसिस वर विकण्यासाठी ऑफर द्या. कमिशन बेसिस वर काम द्यायला नाही कुणीच म्हणत नसतं. पण तुम्ही मात्र तिथे पगारी कामाला आहात अशा विचारानेच स्वतःसाठी टार्गेट सेट करूनच काम सुरु करा. सहा महिन्यांमधे तुम्हाला विक्रीचा पुरेपूर अनुभव मिळेल. तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमधे काही सुरुवात करायची असेल तर तिथेही हेच करावे लागते. प्रोडक्ट असो किंवा सेवा, त्याची विक्री करण्यासाठी ग्राहकांपर्यंत जावेच लागते.
फिल्ड वर उतरायला प्राधान्य द्या. कामाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. तुम्हाला विक्री शिकायची आहे. भीती वाटणे साहजिक आहे, आपल्या मागच्या कित्येक पिढ्यात कुणी व्यवसाय केला नसताना, कुणी विक्री क्षेत्रात नसताना विकायचं कसं याची आपल्याला शून्य माहिती असल्यामुळे त्याची भीती वाटणे साहजिक आहे. पण या भीतीवर मत जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत लाखाचे सेटअप उभारा किंवा कोटीचे, व्यवसाय यशस्वी होऊच शकत नाही.
व्यवसायाबद्दल कितीही माहिती वाचली, मार्गदर्शन घेतले, लेक्चर ऐकले, कितीही कोर्सेस केले तरीही जोपर्यंत तुम्ही त्या प्रोसेस मधे प्रत्यक्ष उतरत नाही तोपर्यंत व्यवसाय कसा चालवायचा याचा अंदाज येत नाही…
आपल्या प्रोडक्ट ची विक्री कशी करायची आपल्याला ऐकून, वाचून कधीच लक्षात येऊ शकत नाही.
फिल्ड वर उतरा. लोकांशी संपर्क वाढावा. लोकांना जोडायला शिका. जेवढं लवकर शक्य असेल तेवढं लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा. शिकण्याच्या प्रोसेस मधे नफ्यातोट्याचा हिशोब करायचा नसतो. शिकण्यातून होणारा फायदा अनमोल असतो.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील