उघुद्योजकांनी Delegation of Work चा अंमल कसा करावा अन त्यातल्या खाचाखोचा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश अभंग
======================

अनेक proprietory firms वा partnership firms शून्यातून कारभार सुरू करतात. कंपनी अगदीच लहान असेल अन तो व्यवसाय करणारे पहिल्यांदा बिझनेस करत असतील, तर छोटी-छोटी कामेही स्वतःलाच पार पाडावी लागतात. म्हणजे ऑफिस उघडणे, झाडू मारणे, लादी पुसणे, बँकेत पैसे deposit करणे, stationary आणणे, Electricity bill, water bill, society maintenance bill भरणे, गाडी चालवणे, गाडीत पेट्रोल भरणे, गाडी दुरुस्त करणे, product packing, product delievery, Documentation Delivery इत्यादी इत्यादी.

ह्या कामांची यादी हनुमानाच्या शेपटासारखी लांबत जाते. अन मग Entrepreneur चे जे महत्वाचे काम असते, म्हणजे Product Design, Product Order, Market Research अँड Development करणे, सेवा क्षेत्रात असाल तर नवनवीन सेवांचा अभ्यास करणे, त्या ग्राहकांना कशा देता येईल याचा अभ्यास करणे, त्याचे मार्केट शोधून काढणे, त्याचा मार्केटिंग plan बनवणे, मग Product मार्केटिंग करणे अन Sales मिळवणे, ही महत्वाची अन थेट Revenue Generate करणारी कामे करायला कमी वेळ मिळतो.

जर आपण बिझनेसमध्ये अगदीच नवखे असाल तर Delegation of Work ह्या संकल्पनेबद्दलही अनभिज्ञ असण्याची शक्यता अधिक असते. तेव्हा मग आपण ऑफिसमध्ये झाडू मारणे, लादी पुसणे, बँकेत जाणे इत्यादी इत्यादी कामे करू लागतो अन आपला बराचसा वेळ अशा कामांमध्ये जातो, जे काम सहज दुसऱ्या व्यक्तीला करता येईल. मात्र त्यात Rocket Science वगैरे काही नसूनही हे काम करण्यात आपण व्यस्त होऊन जातो. वर नमूद केलेली सारी कामे करायला तुम्हाला एखादा ऑफिस बॉय पुरेसा असतो. ती कामे जर तो करू लागला तर तुमचा पुष्कळ वेळ ज्या कामात तुमची अधिक गरज आहे, त्या कामांना देता येईल अन आपला बिझनेस वाढवता येईल.

अगदी सेवा क्षेत्रातील व्यवसायिकांनी Operation साठी माणसे ठेवली तर त्यांना नवनवीन सेवा शोधणे अन Sales वाढवण्याकडे लक्ष देता येईल अन बिझनेसमध्ये Growth करता येईल.

फक्त सेवा क्षेत्रातील व्यवसायिकांनी Employee Appoint करतांना अन जबाबदाऱ्या देताना विशेष खबरदारी बाळगली पाहिजे. तुमचा बिझनेस सहज Copy करता येण्यासारखा असेल आणि त्याला भांडवलाची फारशी गरज नसेल तर माणसं Appoint करताना विशेष काळजी घ्या, कारण त्याला तुम्ही ट्रेनिंग देणार, धंदा शिकवणार, पगार देणार, तुमच्या ग्राहकांशी Interact करायला वाव देणार. उद्या तो तुमचा बिझनेस Copy करणार अन तुमचेच Customers पळवणार. ही जमात बांडगुळासारखी असते, ज्या झाडाने पोसले त्याच झाडाच्या मुळावर घाव घालणारी असते. अन ही जमात अतिशय बेभरवशाची असते. तेव्हा माणसं शक्यतो घरातीलच घ्या. अन बाहेरून घेतली तरी सांगकामी लोकं घ्या. थोडा त्रास होईल, पण भविष्यातील धोका टळेल. ऐकायला कसंसं वाटेल, पण फार महत्वाची टीप आहे. चुकूनही दुर्लक्ष करू नका.

यामध्ये CA, Advocate, Doctors अशा सेवा क्षेत्रातील Professionals ना फारसा धोका नसतो, कारण त्यांचा बिझनेसच असा आहे की त्याला विशिष्ट डिग्री लागते, तितके शिक्षण घ्यावे लागते. त्याशिवाय त्यांचा बिझनेस कॉपी करता येत नाही.

तेव्हा छोट्या व्यवसायिकांनी Delegation of Work आणि Appointment of new Employee करताना आंधळेपणाने न करता डोळसपणे करावी. अनेक ट्रेनर व्यवसाय वाढवण्यासाठी पहिले कामातून Free व्हा, स्वतःला मोकळं करा, माणसं Appoint करा, असा तुम्हाला धोशा लावतील, अगदी त्याचा सुरुवातीला उपयोगही होईल, बिझनेस बऱ्यापैकी वाढेलही. मात्र भविष्यात नेमलेली माणसंच तो डोलारा पूर्ण कोसळवून टाकू शकतात, तेव्हा याबद्दल चुकूनही गाफील राहू नका.

कामाचे Delegation करताना Proper Training द्यावे, त्यासाठी Standard Operationg Process बनवावी. (लिहून काढावी) अगदी छोट्या छोट्या बाबींचा त्या SOP मध्ये उल्लेख करावा.

नव्याने Appoint केलेल्या Employee ला पहिले एखादे काम करून दाखवावे, अन त्याला निरीक्षण करायला सांगावे, मग त्याला करायला सांगावे अन आपण निरीक्षण करून योग्य पद्धतीने करतोय की नाही, याचा पडताळा करावा, नसेल करत तर दुरुस्ती सुचवावी, त्याला जोवर अगदी योग्य पध्दतीने काम येत नाही, तोवर त्याला दुरुस्त करत राहावे, रागावू नये, समजून सांगावे. चार-पाच Attempt मध्ये जमू लागते, मग ते काम त्यालाच सोपवून द्यावे, असे एकेका कामातून मुक्ती मिळवावी अन तो वेळ अधिक Productive अन Revenue Generate करणाऱ्या कामात गुंतवावा.

__

निलेश अभंग
८९७६६२५६९५

लेखक कल्याण (ठाणे जिल्हा) स्थित व्यावसायिक आहेत.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “उघुद्योजकांनी Delegation of Work चा अंमल कसा करावा अन त्यातल्या खाचाखोचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!