तुम्ही आचिव्हर आहात? यशस्वी आहात?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

आपण सतत यशस्वी होण्यासाठी झटत असतो. आपल्याला काही न काही आचिव्ह / साध्य करायचे असते. त्या साठी आपण सतत प्रयत्न करत असतो. पल्यापैकी बरेच जण यशस्वी होण्यासाठी सतत काही यशस्वी होण्याच्या क्लृप्त्या शिकत असतात. विविध मोतीवेशनल व सक्सेस वर्कशॉप्स व सेमिनाअर्सना हजेरी लावत असतात. इंटरनेट वर इतर यशस्वी व सुपर यशस्वी लोकांना फॉलो करणे, त्यांचे इडियो बघणे, त्यांच्या यशाचा फॉर्म्युला कुठं सापडतो का याचा सतत शोध सुरू असतो. हे करत असताना इतर यशस्वी माणसांचा हेवा वाटत राहतो आणि स्वतः बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. वाटत राहते आपण यशस्वी नाही यशस्वी इतर लोक आहेत जगात आणि त्यांच्या कडे यशस्वी होण्याचा सुपर फॉर्म्युला आहे जो मिळाला तरच आपण यशस्वी होऊ शकतो.

खरेच तुम्ही यशस्वी नाही आहात का? खरच तूम्ही आचिव्हर नाही आहात का?

एकदा स्वतःला हे प्रश्न विचारा बरे.

लहानपणापासूनच्या आठवनी ताज्या करा. आठवून बघा तुम्ही लहानपणा पासून किती नि काय काय आचिव्ह केले आहे ते.

पहिल्यांदा सायकल चालवलीत, दोन्ही हात सोडून सायकल चालवायला सुरवात केलीत, डबल सिट सायकल पहील्यांदा चालवलीत.
गणितातली एखादे अवघड प्रमेय कोणाची मदत न घेता सोडवता आले.
पहिल्यांदा शाळेच्या कार्यक्रमात स्टेज वर उभे राहिलात तो क्षण
मित्रांसोबत केलेली मारामारी
पहिल्यांदा दुचाकी चालवलीत तो क्षण

गाडी नवीन चालवायला शिकल्यावर स्वतः ड्राइव्ह करत पहिल्यांदा हायवेने केलेलला लांबचा प्रवास

हिम्मत करून केलेले पाहिले प्रपोज

स्वतःचा उद्योग सुरू करण्याचे केलेले धाडस, त्यासाठी स्वतः: बँकेत जाऊन केलेली बोलणी, मार्केटिंग साठीची पहिली मोठी मीटिंग.

किती गोष्टी आहेत तुम्ही आचिव्ह केलेल्या. याचाच अर्थ तुमच्या कडे यशस्वी होण्यासाठी जे लागते ते सर्व आहे, तुमच्यामध्ये आचिवमेंट ची क्षमता आहे. फक्त आता तुम्ही तुमच्या लाइफस्टाइल, बिलिफस, सवयी या मध्ये ती हरवून/झाकून ठेवली आहे.

तुमच्या पैकी काही जण म्हणतील की अरे आठवते पहिली क्लायंट मीटिंग पण ऑर्डर नव्हती मिळाली. उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला पण अपयश आले.

तर मित्रानो तुम्ही जर रिसीझल्ट म्हणजे आचिवमेंट, यश असे धरून चालला असाल तर मग गडबड आहे.

जरा आठवून बघा पाहुल्यांदा सायकल चालवायला शिकलात तेव्हा पडलात नि गुढगे फोडून घेतलेत? पण मग पुन्हा उठून सायकल चालवायला सुरवात केलीत आणि तसे पडत धडपडत सायकल चालवण्यात इतके तरबेज झालात की हात सोडून पण चालवायला लागलात.
यशस्वी होण्यासाठी, सायकल शिकताना पडल्यावर, गुढघे फुटल्यावर, पुन्हा उभे राहून सायकल चालवायची हिम्मत करण्यासाठी जी मनाची तयारी केलीत ते तुमचे यश आहे. त्याचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला जमलेली सायकल रपेट.

हा जो माईंडसेट आहे तो तुम्हाला यशस्वी किंवा अपयशी ठरवतो आणि तो आधी पासूनच तुमच्या कडे आहे हे लक्ष्यात ठेवा.

व्यायाम करताना 10व्या पुश अप ला हात थरथरायला लागले, खांदे दुखायला लागले तरी मनाचा निर्धार करून, शरीराकडे दुर्लक्ष करून आणखी 2 पुश अप मारणे म्हणजे यशस्वी होण्याचा माईंडसेट.

हा माईंडसेट तुमच्या कडे आहे. तुम्ही यशस्वी आहात, आचिव्हर आहात. फक्त तुम्हाला पुन्हा एकदा त्याची जाणीव झाली पाहिजे. यशस्वी होण्याचा फॉर्म्युला इतरांच्या आयुष्यात शोधू नाका, तुमचा स्वतःच्या आयुष्यात शोधा. तुमच्या कडे तो आहे.

तुमची तयारी आहे का यशस्वी होण्याचा प्रवास करण्याची? त्यासाठी स्वतः:मध्ये करावे लागणारे बदल करण्याची? मग चला तर सुरू करूया प्रवास.
मी मागील प्रत्येक पोस्ट मध्ये “सक्सेस जर्नल” तयार करायला सांगितले होते. लक्ष्यात नसेल तर परत सांगतो.

एक नवीन वही / डायरी घ्या. त्याला “माय सक्सेस जर्नल” असे नाव द्या.

तुम्हाला तुमच्या लहानपणापासूनच्या तुमच्या स्वतःच्या आचिव्हमेंटस त्यात लिहून काढायच्या आहेत. अगदी तारीख वार नसल्या तरी चालतील. पण प्रत्येक छोटी-मोठी आचिव्हमेंट तुमच्या सक्सेस जर्नल मध्ये लिहून काढा.

आता त्या लिहिलेल्या आचिव्हमेंट्स चे काय करायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आता एक करा तुमच्या या सर्व आचिव्हेंट्स सेलिब्रेट करा. ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात तुमच्या या अशाच छोट्या छोट्या आचिव्हमेंट्स तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि त्या प्रवासात टिकून राहण्यासाठी, तुम्ही मोटिव्हटेड राहण्यासाठी या अशा छोट्या छोट्या आचिव्हमेंट्स सेलिब्रेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे सेलिब्रेशन का गरजेचे आहे ते समजून घेऊया.

आपल्या मेंदू मध्ये डोपामाईन ( Dopamine ) या नावाचे हार्मोन व न्यूरॉट्रान्समीटर असते. हे एक प्रकारचे केमिकल असते. यालाच रिवार्ड केमिकल ( Reward Chemical ) असे सुद्धा म्हणतात. हे एक प्रकारचे न्यूरोट्रान्समिटर – केमिकल असते जे न्यूरॉन्स तयार करतात, इतर न्यूरॉन्स मध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी. आपल्या मेंदू मध्ये अशा संदेश देवाणघेवाणीच्या अनेक डोपामाईन वाटा असतात आणि यातील एक ” रिवार्ड-मोटेव्हेटेड बिहेवीअर ” मधील महत्वाच्या मोटिव्हेशनल कम्पोनंट साठी अत्यंत महत्वाचे असते.

हे रिवार्ड सिस्टम आपल्या मेंदूतील न्यूरल स्ट्रक्चरचा ग्रुप असतो जो “मोटिव्हेशन आणि पाहिजे” अथवा “बक्षिसाची तल्लफ” या साठी जबाबदार असतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपल्याला काही केल्याने बक्षीस मिळणार असेल तर आपल्याला त्या बक्षिसाची तल्लफ लागते आणि त्या बक्षिसासाठी आपण कृती करायला सुरवात करतो. ही प्रक्रिया मेंदूत घडत असते डोपामाईन मूळे.
म्हणजेच नजर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे काही करावे लागणार असेल, ते कितीही कंटाळवाणे काम असले तरी बक्षीस मिळणार आहे म्हणून तुमचे मन ते करायला तयार असेल व पूर्ण करेल. कारण त्याला त्या बक्षिसा मुळे मिळणाऱ्या सुखाची (pleasure) तल्लफ लागली आहे.

याच्या उपयोगाचे खालील उदाहरणे देता येतील
१. आपण लहान मुलांना शिस्त लावताना, त्यांना ना आवडणारे काम करायला लावताना त्यांना काही वस्तूचे/खेळण्याचे/चॉकलेट इ चे अमिश दाखवतो. आणि जर तुम्ही याचे रिवार्ड सिस्टम तयार केले तर तुम्ही मुलांना कोणत्याही सवयी/शिस्त लावू शकता अथवा एखादे वैशिष्ट वर्तणूक बदल घडवून आणू शकता.
२. पाळीव कुत्र्यांना शिकवताना ट्रेनर्स या पद्धतीचा अवलंब करतात. विशिष्ट आज्ञा पाळली की रिवार्ड द्यायचे.

उद्योगात कामगारांकडून आणखी चांगली कामगिरी करून घेण्यासाठी इंसेंटिव्ह अथवा बोनस च्या स्वरूपात हे केले जाते. तुम्ही जर कामगार असाल/नोकरी करत असाल तर तुमच्या बाबतीत तुमच्या कंपनीने हे अनेक वेळा केले असणार आहे.

आपल्याला या रिवार्ड-मोटिव्हटेड पद्धतीचे ज्ञान नवीन नाही. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत याचा उपयोग करत आलो आहोत. पण खेदाची गोष्ट अशी आहे की नेमके स्वतःच्या बाबतीत आपण याचा उपयोग करायला वीसरतो. आपण आपल्या आचिव्हमेंट्स साठी स्वतःला बक्षीस द्यायचे विसरतो, स्वतःचे कौतुक करायचे विसरतो.

अनेक वेळा फक्त आपल्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप देखील पुरेशी असते आपल्याला आणखी चांगली कामगिरी पार पाडण्यासाठी, त्यासाठी मेहनत करण्यासाठी.

तेव्हा जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःचे छोटे यश सेलिब्रेट करा. तुमच्या स्वतःसाठी एक रिवार्ड सिस्टम तयार करा.

तुम्ही स्वतःच्या लहणपणापासूनच्या यशोगाथा (small small achievements) ज्या लिहून ठेवल्या आहेत त्या सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे.
आणि आता यशस्वी होण्याच्या तुमच्या पुढील प्रवासात तुमच्या “सक्सेस जर्नल” मध्ये तुमची प्रत्येक अशी छोटी-मोठी आचिव्हेंट जी तुम्हाला तुमच्या गोल्स च्या दिशेने घेऊन जाणार आहे ती लिहून काढा, त्याची नोंद करा आणि ती आचिव्हमेंट सेलिब्रेट करायला विसरू नका.

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!