September 23, 2020
मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

मेंदुची मेमरी – सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

Share
 • 224
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  224
  Shares

मानवी मेंदू किती ताकदीचा असतो याचा अनुभव २९ ऑगस्ट रोजी आला. कारण होतं ‘न्यूरालिंक’… पहाटे ०३:३० वाजता ‘न्यूरालिंक’ कंपनीचा प्रॉडक्ट डेमो होता. कंपनीचे संस्थापक ‘एलोन मस्क’ हे स्वतः माहिती देत होते. “डेमो हा इन्व्हेस्टिंग अथवा प्रॉडक्ट मार्केटिंगसाठी नसून कंपनीला कुशाग्र अभियंत्यांची गरज आहे. त्यांनी आम्हाला जॉईन व्हावं”, असं आवाहन एलोन मस्क यांनी यावेळी केलं. कंपनीचा मुख्य उद्देश मेंदु आणि चेतासंस्थेशी निगडित असणारे अडथळे दूर करणे हा आहे.

जगात काही ठराविक कालावधीनंतर काही लोकांना मेंदूविषयक आजार होतात. जसे की अंधत्व, बहिरेपणा, स्मृतिभ्रंश, नैराश्य, व्यसन, अर्धांगवायू, निद्रानाश, काळजी, ब्रेन डॅमेज, स्ट्रोक्स. या आजाराची कल्पना या डिव्हाईसच्या माध्यमातुन मिळु शकते असा दावा मस्कनी केला. आपल्या मेंदुमध्ये माहितीची देवाण घेवाण करताना विशिष्ट विद्युत लहरी निर्माण होतात. हे सर्व न्यूरॉन्सच्या माध्यमातून होत असतं. न्यूरॉन्स मेंदुला तसे आदेश पाठवतात. या लहरींना समजुन घेण्याचं काम न्यूरालिंकच्या माध्यमातुन केलं गेलंय.

हे डिव्हाईस म्हणजे एक प्रकारचं फिटबीट की जे तुमच्या मेंदूशी जोडलेलं असेल, की ज्यामध्ये वायर्स नाहीत. या डिव्हाइसमध्ये असणाऱ्या चीपचा आकार २३ मिमी x ८ मिमी आहे. एखाद्या नाण्यासारखा…! एका लिंकद्वारे १०२४ चॅनेल्स समाविष्ट आहेत. सिक्स ऍक्सिस आयएमयु, प्रेशर, टेम्परेचर सेन्सर्स, एक दिवस कार्यक्षमता असणारी बॅटरीचा समावेश यामध्ये आहे. इंडक्टिव्ह चार्जिंगद्वारे ही चीप/डिव्हाईस चार्ज केलं जात. लो एनर्जी ब्लुटुथद्वारे या चीपशी अँपच्या माध्यमातुन संपर्क साधला जातो.

मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

एका तासात ही चीप कवटीमध्ये बसवली जाते. एका दिवसात हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज दिला जातो. संपुर्ण शस्त्रक्रिया ही स्वयंचलित आहे. त्यासाठी खास रोबोट्स कंपनीने तयार केले आहेत.

मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

न्यूरालिंकने या चीपचा प्रयोग डुक्करांवर केला आहे. यामध्ये ३ डुक्कर दाखवले गेले. एक डुक्कर (जॉईस) ज्यावर कोणतीही शस्त्रक्रिया अथवा चीप बसवली नाही. दुसरं डुक्कर (गॉत्री) की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करून चीप बसवलं आहे आणि तिसरं डुक्कर (डोर्थी) की ज्याच्यावर पूर्वी शस्त्रक्रिया करून चिप बसवली होती आणि परत ती २ महिन्यांपूर्वी काढली होती. तिन्ही डुक्करांची तब्येत छान आहे. गॉत्री ज्यावेळी फिरत असते, धडपडत असते, खात असते, ट्रेडमिलवर धावत असते त्याप्रमाणे तिच्या मेंदुत असणाऱ्या विद्युत लहरी काम करताना स्क्रीनवर दिसतात.

भविष्यात गेम्स खेळणे, मेंदूच्या आज्ञेप्रमाणे टेस्ला कार नियंत्रित करणे, एखादी नको असलेली आठवण डिलीट करणे अथवा ती सेव्ह करणे, मेमरीचा बॅकअप घेणे, गरजेप्रमाणे रिस्टोर करणे, नवीन माहिती अपलोड करणे यासारख्या गोष्टी करणं शक्य होईल.

अशा पद्धतीची चीप तयार करण्यासाठी C, C++, Python, Java अशा वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पावर अत्यंत कुशल असे चीप डिझाइनर, कॉम्युटर प्रोग्रॅमर्स, रोबोटिक एक्सपर्ट्स, ऍनिमल एक्सपर्टस, बियॉलॉजि एक्सपर्टस, न्यूरॉलॉजिस्टस, केमिस्ट, इलेक्ट्रॉनिकस इंजिनीअर्स कार्यरत आहेत. सध्या कंपनीत १००+ तज्ज्ञ लोक कार्यरत आहेत. भविष्यात अजून एक्स्पर्ट लोक या प्रकल्पावर घ्यायचे आहेत. १०,००० तज्ज्ञ असणारी कंपनी असं एलोन मस्क यांचं स्वप्न आहे. जर आपण या प्रकल्पावर काम करण्यास इच्छुक असल्यास आपला रिझ्युम [email protected] या इमेल आयडीवर पाठवा.

Promoted
मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

सध्या अशा प्रकारची चीप बसवण्याचा खर्च लाखो डॉलर्स आहे. जसजसं संशोधन होईल त्याप्रमाणे हा खर्च ५-६ लाखांच्या घरात असेल. सध्यातरी या चीपचा प्रयोग डुक्करांवर करण्यात आला आहे. जुलैमध्ये FDA कडून मान्यता मिळाली आहे. सुरक्षा बदल आणि संशोधन करून लवकरच याचा उपयोग मानवी मेंदुत केला जाणार आहे. यामध्ये तयार होणार आरोग्यविषयक डेटा सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नॅनो टेक्नॉलॉजि पासून स्पेसेक्ससारख्या बलाढ्य उर्जेवर काम करण्यात एलॉन मस्क यांच्या कंपनीचा हातखंडा आहे. मानवी मेंदूला चॅलेंज द्यायचं काम या माणसाच्या अंगी आहे. भविष्यात चंद्रावर स्पेस ट्रॅव्हल, मंगळावर लोकांची वस्ती, जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या जागी ९० मिनिटात पोहोचणे, शून्य कार्बन आधारित उद्योगांची निर्मिती करणे, इलेक्ट्रिक वेगवान कार बनवणे, सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे अशा भव्य स्वप्नांचा साठा मस्क यांच्याकडे आहे. ते भविष्याला ‘weird future’ असे संबोधतात. विज्ञान राज्य करणार याचे स्पष्ट संकेत या प्रकल्पाच्या माध्यमातुन दिसून येतात.

_

दिनेश कुडचे
Software engineer, tech enthusiast
security expert, fintech expert
writer @ दै. सकाळ, पुण्यनगरी
Director @ Technowell Web Solutions
_

Promoted
मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

संकलन
उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Promoted
मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

Share
 • 224
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  224
  Shares
 • 224
  Shares
Promoted
 • मेंदुची मेमरी - सेव्ह, डिलीट, बॅकअप, रिस्टोर, ट्रान्सफर…! ट्रान्सफर ???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!