प्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांचे अमूल्य विचार


……………………………..

व्यवसायाची सुरुवात करताना मी कधीच अकाउंटंट वा अन्य कोणाचा सल्ला घेतला नाही, माझा नेहमीच माझ्या आतल्या आवाजावर भर असतो.

व्यवसायाने हा नेहमीच स्वतःसकट इतरांना भारून टाकणारा असायला हवा. मुख्य म्हणजे तो करताना त्यातून आनंद आकाराला आला पाहिजे. इतकेच नव्हे तर आपल्या सृजनशीलतेला विलक्षण वाव मिळायला हवा.

मी सर्वार्थाने स्वतंत्र व स्वयंप्रकाशी असावे असे माझ्या आईला खूप वाटत होते. तसे संस्कार तिने माझ्यावर केले आणि तशी मोकळीक दिली. मला आठवतंय, एकदा आईने घरापासून काही मेल अंतरावर गाडी थांबवली आणि मला एकट्यालाच घर शोधात यायला सांगितलं. मी रस्ता शोधत अगदी असहाय्यपणे घरी पोहोचलो. आपल्या विश्रांती स्थळावर पोहोचण्यासाठी नवनव्या वाटा शोधत राहणे मला नेहमीच आवडते.

आमचे प्रोडक्ट हे विलक्षण चैतन्यशाली व सर्वार्थाने उपयुक्त आहेत. पुढे ते चालेल वा न चालेल पण सर्वोत्कृष्ट आणि अत्याधुनिक प्रोडक्टस बनविण्याचे आमचे नेहमीच ध्येय्य राहिले आहे आणि पुढेही ते तसेच राहील.

मी खऱ्या अर्थाने मुक्त जीवन जगत आहे. वर्तमानातील प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगण्याला आणि त्यातील अर्थ व शहाणपणा टिपायला मला नेहमीच आवडते. निराशा दूर सारत मी नेहमीच पुढे जात राहणे पसंत करतो.

नवनवीन प्रोडक्ट बनवणे आणि सातत्याने प्रयोग करीत राहणे मला नेहमीच आवडते. अर्थात प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेलच असे नाही पण प्रयोग करीत राहणे हीच माझ्या जीवनाची रीत बनून गेली आहे.

मी जे काही करतो त्यावर माझा पूर्ण विश्वास असतो.

बोर्ड मिटिंग मध्ये मी अनंत वेळा गेलो आहे पण मला अजूनही नेट आणि ग्रॉस यातला फरक नीटसा कळलेला नाहीये. नुसती आकडेमोड पाहून वा मांडून माझे समाधान होत नाही. तेव्हा माझ्या मित्राने मला एकदा सांगितले की जेव्हा आपण सागरात मासेमारीसाठी जातो तेव्हा जाळ्यात जे येते तो नफा. या जाळ्यातून जे मासे चतुराईने सुटतात ते आपले अज्ञान समजावे. अनेकदा आपल्याला हवे तितके मासे मिळाले नाहीत म्हणून जे होते ते दुःख तो एक प्रकारचा तोटाच असतो.

अपयशापासून शिका. जर तुम्ही नवउद्योजक असाल आणि तुमचा पहिला व्यवसाय अपयशी ठरला असेल तर आमच्या (अपयश पाहिलेल्या लोकांच्या) समूहात तुमचे स्वागत आहे…

माझ्या यशस्वी व्याख्या ? आपण आपल्या व्यवसायात जेवढे सक्रिय आणि गुंतलेले असू तेवढे आपल्या आपण यशस्वी असल्याचे जाणवत राहील.

_

संकलन
उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!