उत्साहाने सुरुवात केल्यानंतर काही काळातच स्वतःवरचा विश्वास डळमळीत का होतो?



‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

स्वतःवर विश्वास नसणे हा बऱ्याच जणांचा मोठा प्रॉब्लेम असतो. एखाद्या कामाला, व्यवसायाला मोठ्या उत्साहात सुरुवात करतात. सगळी कौशल्ये आत्मसात करतात. चांगल्यापैकी जम बसवतात. पण दोन तीन वर्षात हा उत्साह कमी होत जातो. वर्षभर मार्केटमधे विशेष काही जम बसलेला नसतो, त्यामुळे आपले स्पर्धक कसे आहेत, मार्केट किती मोठं आहे, आपल्याला काय काय काम करावं लागणार आहे याचा अंदाज आलेला नसतो. पण दुसऱ्या वर्षांपासून या अंदाज जसजसा यायला लागतो तसतसं हे काम मला जमेल का, अपेक्षेपेक्षा काम जरा जडच वाटतंय, मला झेपणार नाही अशा शंका मनात घर करायला लागतात. आणि जिथे दोन अडीच वर्षानंतर व्यवसायाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्याची वेळ येत असते त्याच वेळी ते काम बंद करून दुसऱ्या कामाची शोधाशोध सुरु होते.

कौशल्य भरपूर असतं, क्षमता भरपूर असते, सुरुवातही धडाक्यात होते पण मोठ्या समूहासमोर उभे राहण्याची, मोठ्या समूहाला सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा पाय डगमगायला लागतात. बऱ्याच जणांची अशी अवस्था होताना दिसते.

कल्पनाविश्वात रमणाऱ्यांची अवस्था बऱ्याचदा अशी होत असते. आपल्या कल्पनेनुसार जगाची अपेक्षा करून त्यात उतरणाऱ्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. आपण नेहमी हलक्या फुलक्या, साध्यासोप्या परिस्थितीची कल्पना केलेली असते. सुरुवातीच्या टप्प्यात परिस्थिती तशी असतेही, त्यामुळे जोश टिकून असतो, पण जसजसे पुढे जातो तसतशी परिस्थिती अपेक्षेपेक्षा वेगळीच आहे याची जाणीव होते. आणि मग पाय लटपटायला लागतात.

आरशासमोर आपण भाषण करण्याची भरपूर प्रॅक्टिस करतो. दररोज जोरजोराने ओरडत भाषण करतो. आपल्या घरातल्यांना वाटतं कि आता याला भाषण जमायला लागलाय. आपलाही कॉन्फिडन्स वाढतो. दररोज स्वतःला भाषण करत आरशात पाहताना स्वतःचच कौतुक वाटत. पण जेव्हा हजारो लोकांसमोर भाषणाची वेळ येते तेव्हा घाम फुटतो. त्या परिस्थितीला सामोरं गेलं तर ठीक नाहीतर भाषणच डेअरिंगच संपून जात.

एखाद्या हौदात पोहण्याची प्रॅक्टिस केली. वर्षभर भरपूर कौशल्य आत्मसात केली, पण जेव्हा मोठया तलावात पोहण्याची वेळ येते तेव्हा त्या तलावातील पाण्याचा प्रचंड साठा पाहून धडकी भरते. मी हौदातच बरा आहे, मला एवढ्या मोठ्या पाण्यात पोहणे जमणार नाही या विचाराने माघार घेऊन जमेल का?

एखादा व्यवसाय सुरु केला. आपल्या ओळखीच्यांना ग्राहक म्हणून जोडायला सुरुवात केली. पालकांच्या ओळखीने, संपर्काने काही ग्राहक भेटले. आपल्या मित्रांकडून काही ग्राहक भेटले. आपल्याला वाटत धंदा सेट झाला. पण ग्राहकांची हि संख्या अपुरी असते. खरे ग्राहक अनोळखी मार्केटमधेच भेटतात. अशावेळी जेव्हा या अनोळखी मार्केटमधे कोणत्याही आधाराविना, पाठिंब्याविना उतारायची वेळ येते तेव्हा त्या मार्केटचा पसारा पाहून, तिथे मुरलेले मोठमोठे स्पर्धक आणि ग्राहक पाहून टेन्शन येत. एवढ्या मोठ्या मार्केटमधे, आणि कसलेल्या स्पर्धकांसमोर आपला निभाव लागणं शक्य नाही अशी भावना तयार होते. बरेच जण या टप्प्यावर गडबडतात. याच टप्प्यावर आपल्याला पुढे जायचं आहे कि माघारी फिरायचं आहे याचा निर्णय घेतला जातो.

माझ्या पाहण्यात असे काहीजण आहेत जे दार दोन तीन वर्षांनी जुने काम सोडून नवीन काहीतरी सुरु करतात. ते असे का करतात हे आपल्याला स्पष्ट सांगत नाहीत. पण त्यांच्या एकूण वागण्याबोलण्यावरून आपल्याला त्यांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. एका मर्यादेनंतर त्यांचा स्वतःवरचा विश्वास संपून जातो. माझी क्षमता इतकीच आहे असे ते स्वतःलाच सांगतात आणि थांबून घेतात.

प्रत्येक कामात एका ठराविक कालावधीनंतर अशी वेळ येते कि आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मोठं आव्हान दिसायला लागत. या टप्प्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा असतो कि या आव्हानाला सामोरं जायचं कि माघारी फिरायचं. माघारी फिरलं तर पुन्हा तेच जुनं चक्र सुरु होणार आणि पुढे गेलं तर प्रगतीची नवीन कवाडे उघडणार… निर्णय आपल्यालाच घ्यायचं असतो.

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!