ग्राहकाला हवे ते द्या, किंवा त्यांना जे हवंय तेच आपल्याकडे आहे हे पटवून द्या.



लेखक : श्रीकांत आव्हाड

======================

बऱ्याचदा आपल्याकडून आपल्या ग्राहकांना काय हवं आहे हे समजून घेण्यात गल्लत होते.
आपण आपल्या दृष्टिकोनातून ग्राहकाला काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ग्राहकाचा दृष्टिकोन वेगळाच असतो.
तो जे शोधात असतो ते आपण देण्यात कमी पडत असतो किंवा ते आपल्याकडे उपलब्ध आहे हे आपण त्याला सांगण्यात कुठेतरी कमी पडत असतो.
काही वेळेस ग्राहकाला काय हवं आहे हे नीट समजून न घेताच आपले प्रोडक्ट त्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो.
किंवा काही वेळेस एखादा विचार त्यांना बळजबरी पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
काहीवेळेस तर ग्राहकाचा विचारच चुकीचा आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

यातून बऱ्याचदा विसंवादाची परिस्थिती उद्भवते.
या विसंवादातून बऱ्याचदा ग्राहकाच्या मनात आपल्याविषयी नकारात्मक विचार निर्माण होतो, किंवा आपल्याकडे त्याला हव्या असलेल्या वस्तू मिळत नाहीत असा ग्रह होतो.

ग्राहकाला नक्की काय हवं आहे हे आधी समजून घेणे असते महत्वाचे असते. यानंतर ग्राहकाची विचारसरणी कशी आहे हे पाहणे आवश्यक असते. उदा. एखाद्याला त्या प्रोडक्टमधे गुणवत्ता आवडू शकते, एखाद्याला त्या प्रॉडक्टची किंमत समाधानकारक वाटत असेल, एखाद्याला त्याच्या रंगात स्वारस्य असेल, एखाद्याला त्या प्रोडक्टच्या डिझाईनच आकर्षण असेल. किंवा या गोष्टी ग्राहकाला प्रोडक्टमधे हव्या असतील. एकाच प्रोडक्टकडे वेगवेगळे ग्राहक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात. ते त्या प्रोडक्टकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर त्यांना ते प्रोडक्ट त्यांच्यासाठी कसे योग्य आहे हे पटवून देणे आपल्याला सोपे जाते. जर एखादा ग्राहक गुणवत्तेवर भर देतोय आणि तुम्ही सतत किंमत कमी असल्याची कॅसेट सुरु ठेवली असे तर ग्राहकाला असे वाटू शकते कि या प्रोडक्टमधे त्याला हवी असलेली गुणवत्ता नाहीये म्हणून विक्रेता किमतीवर भर देतोय. साहजिकच तो दुसरीकडे जाऊ शकतो.

ग्राहकाच्या अंगावर एकदम धावून जाण्याची गरज नाही. थोडा वेळ घ्या. ग्राहकाला सविस्तर बोलू द्या. प्रश्न विचारता विचारता त्यांना नक्की काय हवं आहे याचा अंदाज घ्या. त्यांना हवं असलेल्या फीचर्सचं प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध असेल तर उत्तम. त्या प्रोडक्टमधे त्यांना हवे असलेले फीचर्स त्यांना दाखवून द्या, किंवा जर तसे प्रोडक्ट आपल्याकडे नसेल तर किमान आपल्याकडे असलेले प्रोडक्ट त्यांना हव्या असलेल्या फीचर्सनुसार योग्य आहे हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.

व्यवसाय साक्षर व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!