तुमचे प्रत्येक यश सेलिब्रेट करा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

मागील लेखामधे मी तुम्हाला तुमच्या लहानपणापासूनच्या सर्व अचिव्हमेंट्स एका वहीमधे लिहून काढायला सांगितल्या होत्या. आचिव्हमेंट्स चे काय करायचे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आता एक करा तुमच्या या सर्व आचिव्हेंट्स सेलिब्रेट करा. ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात तुमच्या या अशाच छोट्या छोट्या आचिव्हमेंट्स तुम्हाला तुमच्या ध्येया पर्यंत घेऊन जाणार आहेत. आणि त्या प्रवासात टिकून राहण्यासाठी, तुम्ही मोटिव्हटेड राहण्यासाठी या अशा छोट्या छोट्या आचिव्हमेंट्स सेलिब्रेट करणे अत्यंत आवश्यक आहे.

हे सेलिब्रेशन का गरजेचे आहे ते समजून घेऊया.

आपल्या मेंदू मध्ये डोपामाईन ( Dopamine ) या नावाचे हार्मोन व न्यूरॉट्रान्समीटर असते. हे एक प्रकारचे केमिकल असते. यालाच रिवार्ड केमिकल ( Reward Chemical ) असे सुद्धा म्हणतात. हे एक प्रकारचे न्यूरोट्रान्समिटर – केमिकल असते जे न्यूरॉन्स तयार करतात, इतर न्यूरॉन्स मध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी. आपल्या मेंदू मध्ये अशा संदेश देवाणघेवाणीच्या अनेक डोपामाईन वाटा असतात आणि यातील एक ” रिवार्ड-मोटेव्हेटेड बिहेवीअर ” मधील महत्वाच्या मोटिव्हेशनल कम्पोनंट साठी अत्यंत महत्वाचे असते.

हे रिवार्ड सिस्टम आपल्या मेंदूतील न्यूरल स्ट्रक्चरचा ग्रुप असतो जो “मोटिव्हेशन आणि पाहिजे” अथवा “बक्षिसाची तल्लफ” या साठी जबाबदार असतो.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपल्याला काही केल्याने बक्षीस मिळणार असेल तर आपल्याला त्या बक्षिसाची तल्लफ लागते आणि त्या बक्षिसासाठी आपण कृती करायला सुरवात करतो. ही प्रक्रिया मेंदूत घडत असते डोपामाईन मूळे.
म्हणजेच नजर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी जे काही करावे लागणार असेल, ते कितीही कंटाळवाणे काम असले तरी बक्षीस मिळणार आहे म्हणून तुमचे मन ते करायला तयार असेल व पूर्ण करेल. कारण त्याला त्या बक्षिसा मुळे मिळणाऱ्या सुखाची (pleasure) तल्लफ लागली आहे.

याच्या उपयोगाचे खालील उदाहरणे देता येतील
१. आपण लहान मुलांना शिस्त लावताना, त्यांना ना आवडणारे काम करायला लावताना त्यांना काही वस्तूचे/खेळण्याचे/चॉकलेट इ चे अमिश दाखवतो. आणि जर तुम्ही याचे रिवार्ड सिस्टम तयार केले तर तुम्ही मुलांना कोणत्याही सवयी/शिस्त लावू शकता अथवा एखादे वैशिष्ट वर्तणूक बदल घडवून आणू शकता.
२. पाळीव कुत्र्यांना शिकवताना ट्रेनर्स या पद्धतीचा अवलंब करतात. विशिष्ट आज्ञा पाळली की रिवार्ड द्यायचे.

उद्योगात कामगारांकडून आणखी चांगली कामगिरी करून घेण्यासाठी इंसेंटिव्ह अथवा बोनस च्या स्वरूपात हे केले जाते. तुम्ही जर कामगार असाल/नोकरी करत असाल तर तुमच्या बाबतीत तुमच्या कंपनीने हे अनेक वेळा केले असणार आहे.

आपल्याला या रिवार्ड-मोटिव्हटेड पद्धतीचे ज्ञान नवीन नाही. आपण आपल्या मुलांच्या बाबतीत, कामगारांच्या बाबतीत याचा उपयोग करत आलो आहोत. पण खेदाची गोष्ट अशी आहे की नेमके स्वतःच्या बाबतीत आपण याचा उपयोग करायला वीसरतो. आपण आपल्या आचिव्हमेंट्स साठी स्वतःला बक्षीस द्यायचे विसरतो, स्वतःचे कौतुक करायचे विसरतो.

अनेक वेळा फक्त आपल्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप देखील पुरेशी असते आपल्याला आणखी चांगली कामगिरी पार पाडण्यासाठी, त्यासाठी मेहनत करण्यासाठी.

तेव्हा जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःचे छोटे यश सेलिब्रेट करा. तुमच्या स्वतःसाठी एक रिवार्ड सिस्टम तयार करा.

तुम्ही स्वतःच्या लहणपणापासूनच्या यशोगाथा (small small achievements) ज्या लिहून ठेवल्या आहेत त्या सेलिब्रेट करण्याची वेळ आली आहे.
आणि आता यशस्वी होण्याच्या तुमच्या पुढील प्रवासात तुमच्या “सक्सेस जर्नल” मध्ये तुमची प्रत्येक अशी छोटी-मोठी आचिव्हेंट जी तुम्हाला तुमच्या गोल्स च्या दिशेने घेऊन जाणार आहे ती लिहून काढा, त्याची नोंद करा आणि ती आचिव्हमेंट सेलिब्रेट करायला विसरू नका.

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!