‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
……………………………..
प्रसिद्ध उद्योजिका, पर्यावरण रक्षक आणि मानवी हक्कांच्या पुरस्कर्त्या अनिता रॉड्डीक यांचे अमूल्य विचार :
अनेकदा आपण डास वा झुरळाप्रमाणे सरपटणारे आयुष्य जगत असतो प्रथम असे आयुष्य नाकारण्याचे धाडस दाखवा
व्यापार व व्यवसाय हा केवळ व्यवहार नसतो तर ती एक पवित्र देवघेव असते. एकूणच देण्यात आणि घेण्यात एक उच्चतमता व गुणशीलता हवी, तरच देवाण-घेवाणीत आपल्याला आनंद मिळू शकेल
अनेकदा चांगल्या कल्पना वा विचार आपल्याला सुचतात. त्या कितीह यिचांगल्या असल्या तरी त्या कल्पना या वास्तवात उतरवता आल्या पाहिजेत. तरच त्यातून एक भरीव व सखोल आयुष्य वा जीवनमान आकाराला येईल.
व्यक्तिगत तसेच व्यावसायिक जगण्यात एक अंतर्बाह्य शिस्त व सद्भावाचा बिनशर्त स्वीकार, यांची नितांत आवश्यकता असते. तसे आपण प्रत्यक्ष जगलो तरच आपल्यात परिवर्तन शक्य असते.
अखेरीस चांगुलपणाच्या जगण्यासाठी मोठे धैर्य लागते. जबाबदरी, काळजी, बांधिलकी व सद्भाव म्हणजे चांगुलपणा.
सतत आपल्या लहरीनुसार बदलणारे बिनचेहऱ्याचे मार्केट व्यक्तीला क्षणात मालामाल तरी करते किंवा चिरडतेही.
यशस्ची निश्चित काही सूत्रे वा गणिते नसतात. खरे तर यशाची गणिते व्यक्तिगणिक बदलतात. फक्त अपार कष्ट आणि स्वीकारलेल्या मार्गाने होत राहणारी सततची गतिमग्नता, आपल्या तळहातावर कधी यश ठेवेल सांगता येत नाही.
यशासाठी आपल्या ध्येय्यावर दृढ विश्वास आणि झपाटलेपणातून येणार आवेग यांची मोठी आवश्यकता असते.
एका आंतरिक रेट्यातून प्रत्येक क्षण संपूर्णपणे जगा. मग तो क्षणच तुमचे वेगळेपण सिद्ध करेल. खरे वेगळेपण अवतीभोवती उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वा साधनांचा वापर करून येत नाही. कारण मुळात तो मार्गच भिन्न असतो.
जेव्हा मागे पळायला रस्ताच शिल्लक राहत नाही, तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष काम करावेच लागते.
तुम्ही तुमचे वर्तन, तुमचे विचार तपासा. खरेदीस स्व ला सर्वार्थाने जाणणे हे बोधाचे पहिले पाऊल आहे.
कर्ममग्नतेतून मिळणार प्रचंड आनंद हा नेहमीच सृजनशीलतेचा आनंद असतो. असा आनंद बोलावून येत नाही.
झपाटलेपणातला आवेग, मोठी स्वप्ने आणि उजळलेल्या वाटा या तीन गोष्टी प्रवासासाठी पुरेश्या आहेत.
आम्ही मार्केटपेक्षा आमच्या उत्पादनावरच सारे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे उत्पादन आणि येणारा ग्राहक यांच्यापलीकडचे जग आम्हाला माहित नव्हते. पहिली सातारा वर्षे तर आमच्याकडे मार्केटिंग डिपार्टमेंट वेगळे असे नव्हतेच. आम्हाला त्याची कधी गरजही वाटली नाही. तरीसुद्धा आज आम्ही सर्वांच्या पुढे आहोत. गुणवत्ता आत वसंत असते, बाहेर नव्हे. या गुणवत्तेसह ग्राहकाशी मनापासून साधलेला अनुबंध यांनी आम्हाला आजपर्यंत शिखरावरच ठेवले आहे.
_
संकलन
उद्योजक मित्र
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
OSM