‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : निलेश गावडे
======================
तुम्ही जेव्हा सोशल मीडिया वर पोस्ट टाकता तेव्हा तुमचा त्या मागचा उद्देश काय असतो?
तुमची पोस्ट वाचणाऱ्या लोकांनी पोस्ट वाचल्यावर काय करावे हे तुम्ही पोस्ट टाकण्या पूर्वी ठरविले असते का?
तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या प्रत्येक पोस्ट मुळे तुमच्या व्यवसायाला काय फायदा अपेक्षित आहे?
जर तुम्ही या वर काही न ठरवता पोस्ट टाकत असाल तर तुमचे श्रम व वेळ दोन्ही व्यर्थ आहेत.
तुमच्या सोशल मिडियावरच्या पोस्ट हे एक प्रकारचे कम्युनिकेशन आहे तुमचे अथवा तुमच्या व्यवसायाचे तुमच्या प्रोस्पेक्ट्स (संभाव्य ग्राहक) सोबतचे. तुमच्या संभाव्य ग्राहकासोबतच्या प्रत्येक कम्युनिकेशनचे काही व्यावसायिक उद्धिष्ट असले पाहिजे.
न्यूरो-लिंग्विस्टीक प्रोग्रामिंग (NLP) मानवी मन, कम्युनिकेशन व बिहेवीयर या संबंधी अभ्यास करणारी एक विद्या शाखा आहे. ती सांगते की आपल्या कम्युनियकेशन ची जबाबदारी आपली स्वतःची असते. आपल्या कम्युनिकेशन मधून जे घडते उदा. समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया ही कम्युनिकेशन करणाऱ्याची जबाबदारी असते. म्हणजेच आपण कोणतेही कम्युनिकेशन करताना त्यातून आपल्याला काय आउटकम मिळणार आहे अथवा मिळवायचे आहे हे आधी ठरवून मग त्या प्रमाणे आपले कायुनिकेशन केले पाहिजे. आपण काय संवाद साधायचा आहे, कशा प्रकारे साधायचा आहे हे सर्व आपल्याला काय आउटकम अपेक्षित आहे ते ठरवून त्या प्रमाणे विचारपूर्वक केले पाहिजे. तर त्यातून आपल्याला हवा तो परिणाम साध्य होतो व आपण यशस्वी होतो.
आपल्या कम्युनिकेशनचे फलित, यश अथवा अपयश, हे आपल्या हातात असते, आपली म्हणजेच कम्युनिकेशन करणाऱ्याची जबाबदारी असते.
मग आपल्या व्यवसाया संबंधी आपण ज सोशल मीडिया मधून पोस्ट शेअर करून कम्युनिकेशन करत असतो त्याचे आऊटकम काय असायला हवे हे आपण ठरविलेले असायला पाहिजे?
नसेल तर ठरवायला हवे.
आपले प्रत्येक कम्युनिकेशन हे काही विशिष्ट फलित गृहीत धरून व ते साध्य होईल या अनुषंगाने केलेले असले पाहिजे. आपल्या प्रत्येक कम्युनिकेशनचा आपल्या व्यवसायाला फायदा झाला पाहिजे.
लक्ष्यात ठेवा निव्वळ लाईक्स व शेअर मिळाल्याने आपल्या व्यवसायाला कोणताही फायदा होत नसतो.
आपल्या व्यवसायाला फायदा ग्राहकांपासून होतो. ग्राहक मिळाले तर आपला व्यवसाय चालू शकतो, तग धरू शकतो , वाढू शकतो, यशस्वी होऊ शकतो.
कोणताही व्यवसाय हा फेसबुक वरच्या पोस्ट ला लाईक मिळाल्याने चालत नसतो, तर वाचणार्याने आपल्या व्यवसायाचा ग्राहक होण्याची तयारी दाखवल्याने अथवा आपल्या व्यवसायाशी जोडले जाण्याच्या उद्दीष्टाने आपल्या सोबत संपर्क साधल्याने होत असतो. कारण असे भावी ग्राहक आपल्याला धंदा मिळवून देऊ शकतात तसेच ते त्यांचा सारखे आणखी ग्राहक मिळवून देऊ शकतात.
पण बहुसंख्य व्यावसायिक, त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना असे काही विचार न करता अथवा प्लॅन न करता पोस्ट टाकत असतात, जो की व्यर्थ उद्योग आहे. जर तुमच्या पोस्ट तुमच्या प्रॉस्पेक्ट ना तुमच्या उद्योगा विषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करत नसेल, तसेच तुमच्या व्यवसायाशी जोडले जाण्याची कृती करण्यास उद्युक्त करत नसेल तर तुम्ही या पोस्ट तयार करण्यासाठी व त्या शेअर करण्यासाठी केलेले श्रम व त्यासाठी खर्च केलेला वेळ व पैसे हे सर्व व्यर्थ आहे.
लक्ष्यात घ्या, निव्वळ तुमच्या व्यवसाया विषयी लोकांना समजावे म्हणजे ज्याला सोशल मीडिया मार्केटिंग वाले Reach असे म्हणतात, ते सर्व व्यर्थ उद्योग आहे. कारण असे reach वाढल्याने व्यवसाय वाढत नसतो, सोशल मीडिया वर तरी. याचे कारण, लोकांची असलेली शॉर्ट टर्म मेमरी. सोशल मीडिया वर इतके प्रचंड प्रमाणात distraction आहे की आपण कोणत्या पोस्ट ला लाईक केले आहे हे लोक अर्धा-एक तासानंतर विसरून देखील जातात.
तुम्हाला माहिती आहे का, टीव्ही वर ज्या बातम्या दाखवतात त्या सारख्या रिपीट का कराव्या लागतात? बातमी देताना काही चुकले तरी ही मंडळी कधी माफी मागत नाहीत अथवा खुलासा करण्याचा भानगडीत पडत नाहीत? कारण लोकांची या विषयीची असलेली शॉर्ट टर्म मेमरी. ती इतकी कमी आहे कारण, टीव्ही वर सतत नव नवीन बातम्या व ब्रेकिंग न्यूज चा भडिमार होत असतो आणि त्या गदारोळात आपण अर्ध्या तासा पुर्वी काय बघितलं हे विसरून देखील जातो.
आता याच स्केल वर सोशल मीडिया चा विचार करा. सकाळी उठल्या पासून whatsapp, फेसबुक, इंस्टाग्राम इ अशा अनेक माध्यमातून इतक्या पोस्ट शेअर होत असतात, इतक्या पोस्ट समोर येत असतात, आपण इतक्या पोस्ट्स ना लाईक करत असतो आणि शेअर करत असतो की अर्ध्या तासा पूर्वी आपण कोणत्या पोस्ट ना लाईक केले होते हे विसरून देखील जातो.
अहो पोस्ट तर खूप दूरची गोष्ट राहिली, तुमच्या फ्रेंड लिस्ट मधल्या सर्व लोकांची तुम्हाला नावे सांगता येतील का? शक्य नाही कारण आपण विसरून पण गेलो आपण काल कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली होती ती.
मग तुमच्या व्यावसायिक पोस्ट ना 1 लाख लाईक मिळाले असतील ही, त्याचे कौतुक वाटून घेऊ नका. स्वतःला विचारा, तुमची पोस्ट लाईक केल्यानंतर अर्ध्या तासाने, तुमची पोस्ट कितो जणांच्या लक्ष्यात देखील असेल??
सांगू शकताय खात्रीने?? नाही ना…
तुमची सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी अथवा तुम्ही स्वतः करत असाल तुमचे सोशल मीडिया मार्केटिंग आणि तुम्हाला जर इतक्या लोकांपर्यंत तुमची पोस्ट वायरल झाली आणि इतक्या हजार लोकांनी पोस्ट बघितली असे सांगून समाधान वाटत असेल तर ते सगळे फसवे समाधान करणारे आकडे आहेत हे लक्ष्यात घ्या.
नुसत्या लाईक्स ने आणि लोकांनी बघितल्याने तुमच्या व्यवसायाला काहीच फायदा नाही. किती जणांनी तुमच्या व्यवसायासोबत जोडले जाण्याची इच्छा दाखवली अथवा किती जणांनी त्या दृष्टीने प्रयत्न केला त्या वर तुमच्या व्यवसायाचे सोशल मीडिया कॅम्पेग्न चे यश ठरते. आणि तुमच्या व्यवासाय विषयक प्रत्येक पोस्टचा उद्धेश हा सुरवाती पासूनच असाच ठरवून, तुमच्या पोस्ट्स त्या प्रमाणे तयार करायला पाहिजेत.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
thanks for valuable lessons. I don’t know you did intentionally or not but somehow right click on computer or long press on mobile not working for all links. I checked both devices.