मार्केटमधे अतिशय कल्पकतेने उभा राहिलेला ब्रँड, “मोती साबण”



‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

दिवाळीची चाहूल लागते मोती साबणाच्या जाहिरातीने

उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हि जाहिरात जवळजवळ प्रत्येकाचीच तोंडपाठ आहे. मागच्या दहा पंधरा वर्षात दिवाळीच्या एक महिना आधीपासून सुरु होणाऱ्या या जाहिरातीची इतकी सवय झाली आहे कि आता दिवाळीची चाहूल थंडीने नाही तर या जाहिरातीने लागते. ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहिरात टीव्हीवर दिसायला लागली कि आपण नकळतपणे दिवाळी जवळ अली वाटतं असं म्हणतोच. हि जाहिरात आपल्याला दिवाळीची कामे करायला सुरुवात करा असंच सांगते असं वाटतं, इतकी हि जाहिरात आपल्या सवयीची झाली आहे.

मोती साबण हि तिच्या सुरुवातीच्या काळात एक प्रतिष्ठतीत ब्रँड म्हणून नावारूपालाआला होता. मार्केट चांगल्यापैकी पकडलं होतं. हा ब्रँड सुरुवातीला टाटा ऑइल कंपनीच्या मालकीचा होता. १९९३ ला हिंदुस्थान युनिलिव्हर ने हि कंपनी विकत घेतली आणि मोती साबण HUL ह्या मालकीचा झाला. यानंतरही मोती साबणाचे मार्केट चांगले होते. कंपनीने मोती साबणाला खास सणासुदीलाच वापरायचा साबण अशाच प्रकारे प्रमोट केले होते. कंपनीने हिंदू संस्कृतीमधील सणांशी, परंपरेशी या साबणाला खूप विचारपूर्वक जोडले होते. या ब्रँड ला एक स्टेटस प्राप्त झाले होते. पण कलालांतराने मार्केटमधे बरेच ब्रँड आले, इतर मोठ्या कंपन्यांनी आपले ब्रँड आक्रमक पद्धतीने मार्केटमधे उतरवले आणि नव्याकडे आकर्षित होण्याचा मनुष्याचा स्वभाव पाहता जे व्हायचं तेच झालं, या स्पर्धेत मोती साबण मागे पडला. काही काळ या साबणाची चर्चा बंद झाल्यासारखीच झाली. मार्केटमधून हा साबण एकदम बाहेर फेकल्यासारखा झाला. तरीही कंपनीकडून जाहिराती चालूच होत्या, पण “मोती” ब्रँड आपली ओळख गमवत चालला होता.

२०१३ मधे हि जाहिरात लाँच झाली. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. हि जाहिरात अल्पावधीतच तुफान लोकप्रिय झाली. या कॅम्पेनमुळे “मोती” ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आला. कंपनीने मग हे कॅम्पेन असेच पुढे सुरु ठेवले. पण फक्त दिवाळीसाठी. कदाचित, मार्केटमधे आधीच भरपूर ब्रँड झाले असताना आणि प्रत्येकजण आपापले गुणधर्म सांगत असताना मोती साबणाकडे वेगळं सांगण्यासारखं असं काही नव्हतं, म्हणून कंपनीने या साबणाला फक्त आणि फक्त दिवाळीपुरतेच मर्यादित ठेवण्याचे ठरवले आसवे. पण जाहिरात दिवाळीपुरती नुसती मर्यादित ठेवली नाही तर दिवाळीला एक तरी मोती साबण घेतला गेलाच पाहिजे असा प्रत्येक जण विचार करेल अशा प्रकारे हि जाहिरात आपल्यासमोर सतत आणली गेली.

दिवाळीचं स्लोगन असल्यासारखी हि जाहिरात कंपनीने वापरली.

कंपनीने स्वतःहूनच आपल्याला हा साबण फक्त दिवाळीसाठी आहे हे सांगितलं आहे, कंपनीला इतर सिझन मधे तो विकण्यात इंटरेस्टसुद्धा नाही. कंपनीने आपले प्रोडक्ट एका ठराविक काळासाठी, ग्राहकांसाठी तयार करून ठेवलेले आहे आणि फक्त तेवढ्यापुरतेच प्रमोशन केले जाते. इतर सिझन साठी कंपनीचे साबणाचे आणखी बरेच ब्रँड्स आहेत. तिथे मोती साबणाला आणून त्या साबणाची ओळख संपवू इच्छित नाहीत. कंपनीने मोती साबणाची एक जागा निश्चित केली आणि त्या जागेवर सर्वोत्तम बनण्यासाठी अतिशय आक्रमकपणे आपले प्रमोशन चालू ठेवले.

मागच्या १७ वर्षात कंपनीने आपली जाहिरात बदलली नाही. कंपनीने नवीन जाहिरात बनवण्यावर रुपयाचासुद्धा खर्च केलेला नाही. खर्च फक्त जाहिरात दाखवण्यावर केला जातो. एकच जाहिरात दरवर्षी दाखवली जाते, आणि त्यातूनच ब्रॅण्डिंग सुरु होते. आता हा ब्रँड ब्रॅण्डिंगच्याही पुढे गेला आहे. हि जाहिरात आता मोती साबण खरेदी करण्याची वेळी आली आहे एवढंच आपल्याला सांगते. उलट या जाहिरातीची आपल्याला इतकी सवय झाली आहे कि एखाद्या वर्षी जाहिरात दिसली नाही तर काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. जसं एखादं पारंपरिक गाणं, कविता एखाद्या घटनेसाठी, समाजासाठी, कार्यक्रमासाठी जोडलं जात तसंच हि जाहिरात आता दिवाळीच्या परंपरेचा भाग असल्यासारखी झाली आहे.

काही ब्रँड्स खूप कल्पकरित्या मार्केटमधे सेट केलेले असतात. त्यांना धक्का देणं हे कामच अशक्य कोटीतलं वाटतं. “मोती साबण” हा एक असाच ब्रँड.

मागच्या काही दिवसांपासून जाहिरात दिसत आहे म्हणजेच आपल्याला दिवाळीच्या कमला लागायचं आहे हा संदेश मिळाला आहे. ७-८ महिन्यांपासून कोरोना संकटामुळे चालू असलेल्या लॉकडाऊन मुळे मार्केटला बरीच मरगळ आलेली आहे, काही दिवसांपासून मार्केट सुरळीत होताना दिसत आहे. दिवाळीचा सिझन कदाचित मार्केटला पूर्णपणे रुळावर आणण्यासाठी फायद्याचा ठरू शकेल अशी अशा आहे. लोकांना आठ महिन्यांपासून हरवलेली जीवनशैली पुन्हा सुरु करण्यासाठी एका इव्हेन्ट ची गरज आहे. दिवाळीला ती संधी साधली जाईल अशी अपेक्षा आहे. तुम्हा सर्वांना हि दिवाळी भरपूर उलाढालीची, व्यग्रतेची, समाधानाची, तणावमुक्तीची, कौटुंबिक सुखसमृध्दीची जाओ हीच अपेक्षा आणि दिवाळीच्या शुभेच्छा…

उठा उठा दिवाळी आली, आपल्या व्यवसायाला नव्याने सजवण्याची वेळ झाली.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!