बिल गेट्स यांचे अमूल्य विचार‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, जगभरातील उद्योजकांचे आदर्श, यशस्वी उद्योजक आणि व्यक्तिमत्व बिल गेट्स यांचे अमूल्य विचार

मी अतिशय मोजक्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले हेच माझ्या यशाचे रहस्य आहे

तुमच्या असमाधानी आणि असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला खूप काही शिकण्यासारखे असते.

तुमच्या उत्पादनाशी, तुम्ही निर्माण केलेल्या निर्मितीसंबंधात उत्सुकता दाखवणाऱ्या व्यक्तीशीही सन्मानपूर्वक वर्तन करा, कदाचित तोच तुमचा उद्याचा ग्राहक असू शकेल

आमच्या यशाचे रहस्य हेच आहे कि आम्ही कमालीची स्वस्त उत्पादने तयार केली आणि कालानुरूप त्यात सुधारणा करत गेलो, तेही सातत्याने.

जर तुम्हाला तुमचे उत्पादन सर्वोत्तम बनवता येत नसेल तर किमान ते चांगले आणि आकर्षक दिसण्याची तरी काळजी घ्या.

यशाचा आनंद जरूर साजरा करा, पण अपयशातून मिळालेले धडे कधीही विसरू नका, कारण त्यातून खूप काही शिकण्यासारखे असते. यशाचा आनंद साजरा करणे जितके महत्वाचे तितकेच अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडणेही. आपण हे शिकायला हवे.

यशासारखा विचित्र शिक्षक नाही, तो महत्वाकांक्षी लोकांना आपल्या यशात मश्गुल ठेवतो.

लहान असताना पाहिलेली बरीचशी स्वप्ने पूर्ण झाली, कारण मला प्रचंड वाचनाची संधी मिळाली.

इंटरनेटपेक्षा समोरच्याच्या मानसिकतेशी अधिक संवादी राहा. अखेरीस संवाद आणि समजून घेणे जास्त महत्वाचे आहे.

लोकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत रहा, मग बघा तेच लोक पूर्वीपेक्षाही अधिक कृतिशील बनतील.

_

संकलन
उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!