जिओर्जिओ अरमानी यांचे अमूल्य विचार



‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

प्रसिद्ध फॅशन डिझायनर “जिओर्जिओ अरमानी” यांचे अमूल्य विचार

तुम्ही छोटे उद्योजक आहेत कि मोठे याच्याशी ग्राहकाला काहीच कर्तव्य नसते . येणार ग्राहक हा हँगर ला लावलेल्या व शोरूम मध्ये लटकवलेल्या ड्रेसवर आपली नजर खिळवून असतो

जग प्रचंड वेगाने बदलत आहे. त्या वेगाने आपली अभिरुची व फॅशनही बदलत चालली आहे.

तुम्ही आपल्या मूल्यांशी, तत्वांशी ठाम राहणे आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे. अनेकदा प्रतिकूलतेत वा नको त्या ठिकाणी आपण आपल्या मूल्यांशी तडजोड करतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यामुळे ग्राहकांचा तुमच्यावरच विश्वास सुद्धा उडतो.

अनेकदा नवनव्या फॅशन्स, डिझाइन्स मार्केटमध्ये खूप घाईघाईने येतात, काही काळ लोकांना आकर्षित करतात आणि जशा येतात ताशा अचानक नाहीशाही होतात. मी मात्र अशा दिखाऊ, तकलादू फॅशन पासून चार हात दूरच राहतो

ब्रँडची पुरारवृत्ती न करता एका विशिष्ट बाजारपेठेसाठी मी विशेष ब्रँड निवडतो. जेव्हा बाजारात नवनव्या फॅशनची रेलचेल वाढते तेव्हा आपोआपच ग्राहक देखील मोठ्या ब्रँड ची निवड करतो. पर्यायाने इतर जण मागे पडतात. मला मात्र सच्चेपणा, विश्वासार्हता तसेच अनेकार्थाने नवेपण व प्रायोगिकता जपायला आवडते.

काहींकडे उत्कृष्ट डिझायनर्स असतात. पण इतके पुरेसे नसल्यामुळे प्रचंड जाहिरातीही ते करतात. पण महत्वाचे आहे ते विश्वासार्हता आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान. विश्वासार्हता हि एका दिवसात आकाराला येत नाही हे लक्षात घ्या.

फॅशन, डिझाईनच्या या शोधप्रवासात मुक्कामस्थळ नाही. या प्रवासातच या प्रवासाची सांगता आहे. स्वमग्नता व संपूर्ण गाफीलपणा मुले शोधाची दिशा व इच्छा भरकटते. अशावेळी आपले स्पर्धक आपल्यावर वरचढ होतात.

अनेकदा फॅशन बदलत असते पण आपण मात्र आहे तिथेच असतो. खरे तर फॅशनबरोबर तुम्हीही अद्ययावत व प्रतिष्ठित झाले पाहिजे. हि प्रतिष्ठा आपल्या स्वकर्माच्या तन्मयतेतून व विश्वासार्हतेतून आकाराला येत असते.

आपले लहान – मोठेपण, आपला होकार वा नकार, आपले अनेक निर्णय मग ते बरोबर असो व चुकीचे ठरोत आपण या सर्वांची एक उद्योजक म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी.

माझे निर्णय मी स्वयंप्रेरणेने घेतो. माझा अटळ आवाज मला माझा रास्ता सुचवतो. मी स्वतःला डिझायनर पेक्षा उद्योजक अधिक मानतो. आपली जबाबदारी, बांधिलकी तसेच आपली समर्पण यातून आपले स्वतःचे वैष्णव आकाराला येत असते हे मला आता कळून चुकले आहे.

मी अतिशय मोजक्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले हेच माझ्या यशाचे रहस्य आहे

तुमच्या असमाधानी आणि असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला खूप काही शिकण्यासारखे असते.

तुमच्या उत्पादनाशी, तुम्ही निर्माण केलेल्या निर्मितीसंबंधात उत्सुकता दाखवणाऱ्या व्यक्तीशीही सन्मानपूर्वक वर्तन करा, कदाचित तोच तुमचा उद्याचा ग्राहक असू शकेल

आमच्या यशाचे रहस्य हेच आहे कि आम्ही कमालीची स्वस्त उत्पादने तयार केली आणि कालानुरूप त्यात सुधारणा करत गेलो, तेही सातत्याने.

जर तुम्हाला तुमचे उत्पादन सर्वोत्तम बनवता येत नसेल तर किमान ते चांगले आणि आकर्षक दिसण्याची तरी काळजी घ्या.

यशाचा आनंद जरूर साजरा करा, पण अपयशातून मिळालेले धडे कधीही विसरू नका, कारण त्यातून खूप काही शिकण्यासारखे असते. यशाचा आनंद साजरा करणे जितके महत्वाचे तितकेच अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडणेही. आपण हे शिकायला हवे.

यशासारखा विचित्र शिक्षक नाही, तो महत्वाकांक्षी लोकांना आपल्या यशात मश्गुल ठेवतो.

लहान असताना पाहिलेली बरीचशी स्वप्ने पूर्ण झाली, कारण मला प्रचंड वाचनाची संधी मिळाली.

इंटरनेटपेक्षा समोरच्याच्या मानसिकतेशी अधिक संवादी राहा. अखेरीस संवाद आणि समजून घेणे जास्त महत्वाचे आहे.

लोकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सहाय्यभूत रहा, मग बघा तेच लोक पूर्वीपेक्षाही अधिक कृतिशील बनतील.

_

संकलन
उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!