लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
बऱ्याचदा आपल्याकडे ग्राहक चौकशी करतात, प्रोडक्ट पाहतात, आपल्यासोबत चर्चा करतात पण खरेदी न करताच जातात. तसं पाहता एकूण चौकशी केलेल्या ग्राहकांपैकी जास्तीत जास्त २०% ग्राहक खरेदी करत असतात. पण काहीवेळा आपल्याकडे हे प्रमाण खूपच कमी असते. ग्राहक दुकानात येतात, पुन्हा येतो म्हणून निघून जातात आणि पुन्हा येतच नाहीत.
पण ग्राहक फक्त चौकशी करतो, खरेदी करतंच नाही, याचा अर्थ तो खरेदीच करत नाही असा थोडीच होतो? तो खरेदी करतो. त्याला हवी असलेली वस्तू तो कुठेतरी खरेदी करतोच. तो आपल्याकडे खरेदी करत नाही हा खरा मुद्दा असतो. तो आपल्याकडे खरेदी न करता इतर ठिकाणी जाऊन खरेदी का करतोय याचा विचार करणे महत्वाचे असते. ग्राहकाने आपल्याला डावलण्यामागच्या कारणांचा शोध घेणे महत्वाचे असते.
- कदाचित ग्राहकाला आपल्याकडे त्याला हवी असलेली वस्तू सापडली नसेल,
- कदाचित आपल्या प्रोडक्ट मधे त्यांना नावीन्य आढळलं नसेल,
- कदाचित आपण त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात अपयशी ठरलो असू,
- किंवा ते आपल्या प्रेझेन्टेशनमुळे इम्प्रेस झाले नसतील,
- किंवा त्यांनी अजूनतरी आपल्याला शॉपिंगसाठी मुख्य ठिकाण म्हणून मान्यता दिलेली नसेल,
- कदाचित आपण त्यांना पुरेशी माहिती देण्यात कमी पडलेलो असू,
- कदाचित आपण संभाषणात कुठेतरी कमी पडलेलो असू,
- कदाचित आपल्यापेक्षा एखादा चांगली गुणवत्ता सेवा देत असेल… खूप करणे असू शकतात.
ग्राहक आपल्याकडे शॉपिंग न करता माघारी जातोय याची बरीच कारणे असू शकतात. या कारणांचा शोध घेणे महत्वाचे असते. आपल्याकडून कुठे चुका होत आहेत याचा शोध घेणे महत्वाचे असते. आपल्या चुका दुरुस्त करणे महत्वाचे असते. मार्केटला दोष देऊन फायदा नाहीये. मार्केटमधे ग्राहकांची कमीजास्त करत शॉपिंग चालूच असते, ते आपल्यापर्यंत येत नसतील तर ते का येत नाहीयेत याचा शोध घेणे महत्वाचे ठरते. काहीतरी कारण असल्याशिवाय ते माघारी जाणार नाही. ते कारण शोधण्याचा प्रयत्न करा. कारणांची यादी मोठी असेल तर वेगवेगळे प्रयोग करा. कोणत्या प्रयोगाने कसा रिझल्ट येतोय याचा अभ्यास करा. त्यातून आलेले निष्कर्ष पाहून आपल्या व्यवसायात आवश्यक त्या सुधारणा करा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील