अमेरिकेचे माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांची ‘यशप्राप्तीची दहा सूत्रे’


……………………………..

अमेरिकेचे माजी अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यशप्राप्तीसाठी दहा सूत्रे निश्चित केली होती. त्यांचे संपूर्ण कॅम्पेन या सूत्रांना केंद्रस्थानी ठेऊनच झाले होते. याच दहा सूत्रांनी त्यांना निवडणुकीत यश मिळवून दिले होते.

ती दहा सूत्रे…

१. लोकांची नावं लक्षात ठेवण्यास शिका. याबाबतीत चुकारपणा केल्यास तुम्हाला लोकांमध्ये फारसा रस नाही असे त्यांना वाटू शकेल

२. तुमच्या सहवासात कोणावर ताण येणार नाही अशी सुखद व्यक्ती बाणा. लोकांना आपल्या नित्य परिचयाचा वाटणारा माणूस बना

३. शांतपणा आणि गडबडून न जाणं, हे गुण आत्मसात करा म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही विचलित होणार नाही

४. अहंभाव सोडून द्या. तुम्हाला सगळं काही कळतं अशी तुमची प्रतिमा तयार होण्यापासून सावध रहा

५. तुमच्या संगतीत लोकांना काहीतरी चांगले मिळेल, अशी गुणसंपन्न व्यक्ती बना

६. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असलेल्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांचा यांचा अभ्यास करा

७. तुमच्यात पूर्वी व आत्ता असलेला एकूणएक गैरसमज दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्हाला खुपत असतील व जखमांसारख्या ठसठसत असतील त्यांचे निराकरण करा

८. लोकांची खरी आवड निर्माण होईपर्यंत, त्यांना आवडून घेण्याचा सराव करा

९. कुणीही काहीही साध्य केलं किंवा त्याला वा तिला कुठल्याही प्रकारचं यश मिळालं, तर त्यांचं अभिनंदन करण्याची संधी सोडू नका. तसेच कुणाच्याही दुःखाच्या व निराशेच्या प्रसंगी त्यांचे सांत्वन करायला त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करायला विसरू नका.

१०. लोकांना आत्मिक बळ द्या म्हणजे त्यांचे खरे प्रेम तुम्हाला मिळेल

_

संकलन
उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!