लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
ग्राहक समाधानासाठी काही उपयुक्त टिप्स
१. ग्राहकांना तुमच्याशी चर्चा करताना समाधान वाटले पाहिजे अशा प्रकारे चर्चा करा. चर्चा कंटाळवाणी, नकारात्मक होणार नाही याची काळजी घ्या. वातावरण प्रसन्न आणि हसतंखेळतं राहील याची काळजी घ्या. पण तरीही वागण्याबोलण्यात योग्य शिष्टाचार असला पाहिजे.
२. ग्राहकांना पुरेसे पर्याय द्या. ग्राहकांना पर्याय निवडीचे स्वातंत्र्य हवे असते. हे पर्याय देताना त्यांना योग्य निवडीसाठी मार्गदर्शनही करा. ग्राहक गोंधळणार नाहीत याची काळजी घ्या. गोंधळलेला ग्राहक लगेच खरेदी करणे टाळू शकतो.
३. ग्राहकांना किचकट प्रोसेस मध्ये अडकवू नका. अनावश्यक गोष्टींमधे ग्राहकांना अडकवून ठेऊ नका. त्रासदायक वाटणाऱ्या पद्धती दूर करा.
४. अनावश्यक चौकश्या करू नका. अनावश्यक गप्पा मारू नका. अनावश्यक हावभाव दाखवू नका. प्रत्येक गोष्ट एका मर्यादेपर्यंत चांगली वाटते, ती मर्यादा कधीही ओलांडू नका.
५. ग्राहकांचे काही अभिप्राय (Feedback) असतील तर त्यावर वेळेत कार्यवाही करा, आणि संबंधित ग्राहकाला त्याची माहिती द्या. ‘माझ्या मताला किंमत आहे’ हि जाणीव कुणालाही सुखावून जाते. ग्राहकांकडून नेहमी अभिप्राय घेत रहा, त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या प्रयत्न करा.
६. वागण्याबोलण्यात, हावभावात नैसर्गिकता ठेवा. कृत्रिमता जास्त काळ सहन केली जात नाही आणि ग्राहकाला तुमच्याशी जोडूही शकत नाही.
7. आभार व्यक्त करण्यात कधीही कमी पडू नका. आदर सन्मान करण्यात कमी पडू नका. इतरांचा सन्मान करणे हा सन्मान मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
8. ग्राहकांना आव्हान देऊ नका. विनाकारण विरोधक निर्माण करू नका.
9. ग्राहकांना तुमच्याकडून फक्त चांगलेच अनुभव मिळतील याची काळजी घ्या.
10. नियमित ग्राहकांना भेटवस्तू, सणासुदीच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा गोष्टींनी ग्राहकांना आनंदी अनुभव देण्याचा प्रयत्न करा.
१1. ग्राहक समाधानासाठी तुम्ही नेहमीच कटीबद्द असता असे ग्राहकांना नेहमीच जाणवले पाहिजे अशा प्रकारे वर्तणूक ठेवा.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील