लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
स्टॉक मॅनेजमेंट किंवा Inventory मॅनेजमेंट हि व्यवसायात आवश्यक असलेली प्रक्रिया आहे. आपल्याला व्यवस्याकात असताना आपल्या स्टॉक कडे नेहमीच लक्ष ठेवावे लागते. पण यासंबंधीचा अनुभव कमी असताना स्टॉक मॅनेजमेंटमधे बऱ्याच गोंधळ होतो. कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर व्यवसाय असताना तर स्टॉक मॅनेजमेंट खूप महत्वाचे ठरते. याचा आपल्याला व्यवसायातही चांगला फायदा होतो. आर्थिक रोटेशन सुरळीत राहते, पैसे अडकून पडत नाहीत, नुकसान होत नाही, अनावश्यक खर्च वाढत नाही असे बरेच फायदे स्टॉक मॅनेजमेंटमुळे होतात. म्हणून स्टॉक मॅनेज कसा करावा, हॅन्डल कसा करावा यासंबंधी काही टिप्स देत आहे.
स्टॉक मेनेजमेंट संबंधी उपयुक्त टिप्स.
- आपल्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या मालाची पूर्ण माहिती लिहून ठेवा. यासाठी सॉफ्टवेअर असल्यास उत्तम. लहान व्हावयास सॉफ्टवेअरची गरज नसते, वहीवर जरी अपडेट घेत राहिलात तरी चालते. मोठ्या व्यवसायांसाठी सॉफ्टवेअर कधीही फायद्याचेच ठरते.
- मालाची विभागणी करा. कॅटेगरीनुसार मालाची विभागणी करा, आणि त्यानुसारच डेटा मेंटेन करा आणि कॅटेगरीनुसारच माल साठवणुकीची रचना ठेवा.
- प्रोडक्शनसंबंधी सर्व माहिती सतत तपासा, त्याप्रमाणात मालाची उपलब्धता तपासत रहा.
- प्रत्येक महिन्याला किंवा आठवड्याला संपूर्ण स्टॉक चे ऑडिट करा. आलेला माल, गेलेला माल, उपलब्ध माल, तयार झालेली बिले, त्यानुसार उपलब्ध आणि गेलेला माल या सर्वच ताळमेळ जुळला पाहिजे.
- जर तुमचे दुकान असेल तर दर आठवड्याला किंवा महिन्याला मालाचे ऑडिट करा. लहान दुकानात दर आठवड्याने मालाचे ऑडिट करावे.
- कोणताही माल एकदम संपेपर्यंत थांबू नये. मालाची एक डेडलाईन ठरवून ठेवावी. त्याखाली संख्या येणार नाही याची काळजी घ्या.
- माल ऑर्डर केल्यानंतर किती दिवसात येतो, आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला माल संपण्यासाठी किती दिवस लागतात याचा विचार करून डेडस्टॉक कोणत्या पातळीवर असावा आणि किती दिवस आधी ऑर्डर केली पाहिजे याचा अंदाज घ्या.
- कोणताही माल जास्त दिवस पडून राहणार नाही याची काळजी घ्या. स्टॉक रोटेशन चांगले ठेवा. तसेच कोणताही माल धूळ खात पडू देऊ नका.
- एखादा माल जास्त दिवस सांभाळावा लागणे म्हणजे त्यासाठी जास्त खर्च करणे, त्यामुळे उगाच मालाचा स्टॉक करून ठेऊ नका.
- मालाचा अतिरिक्त स्टॉक करू नका, पण जर मालाच्या दरात चढउतार होत असेल तर कमी दर असताना जास्त मालाची खरेदी करण्याचे नियोजन करा. पण ते करताना तो माल किती दिवस साठवून ठेवावा लागेल, त्यात घट होत असेल तर त्याचे प्रमाण किती असेल, त्याला सांभाळण्यासाठी किती खच येईल याचा हिशोब करून तो स्वस्तात घेऊन खर्चात वाढणार नाही याचेही नियोजन करावे लागते.
- कोणता माल किती वेळा लागतो, कधी लागतो, किती प्रमाणात लागतो, तो स्टोअर पासून प्रोसेसिंग लाईन पर्यंत किंवा दुकानाच्या काउंटरपर्यंत नेण्यासाठी कशी प्रक्रिया करावी लागते, अशा सर्व बाबींचा विचार करून कोणता माल कुठे ठेवायचा याचे नियोजन करा.
- डेडस्टॉक जास्त काळ सांभाळून ठेऊ नका. डेडस्टॉक लवकरात लवकर मोकळा करावा. त्यात पैसा अडकून पडतो आणि स्टॉक संभाळण्याचाही खर्च वेगळा येतो. त्यापेक्षा थोडासा तोटा झाला तरी चालतो पण त्यातून बाहेर पडा. डेड स्टॉक मध्ये अडकलेला पैसे मार्केटमधे फिरायला लागला कि झालेले नुकसान सहज भरून निघते आणि व्यवसायासाठी पैसे उपलब्ध झाल्यामुळे व्यवसायात वाढ होते.
या काही स्टॉक मॅनेजमेंट संबंधी कामाच्या टिप्स आहेत. यांचा वापर व्यवसायात केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील