‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : निलेश गावडे
======================
डॉग फूड खूप चविष्ट तयार केलं जातं असावे.
एकट्या अमेरिकेत दर वर्षी 24 बिलियन डॉलर पेक्षा जास्त खर्च डॉग फूड वर केला जातो. या प्रॉडक्ट्स च्या किमती आकाशाला भिडायला लागल्या आहेत, त्याच बरोबर वेग वेगळ्या इंगरेडियांट्स (सामग्री) असलेले डॉग फूड्स बाजरात येत आहेत.
आणि तरीही, मी एकाही कुत्र्याला त्याचा आवडीचे डॉग फुड विकत घेताना बघितलेले नाही.
ज्या प्रमाणात त्यांच्या किमती वाढत आहेत, डॉग फूड कदाचित खूप चविष्ट बनवले जात असेलही, पण त्या विषयी आपल्याला काहीच कल्पना नाही. कुत्र्यांना ते आवडते याची आपल्याला अजिबात कल्पना असण्याचे कारण नाही, कारण आपण कुत्रा नाही.
पण एक मात्र खात्रीने सांगू शकतो की कुत्र्यांचा मालकांना ते जास्त आवडते.
कारण ते बनवलेच त्यांचा साठी जाते. ते विकत घेतल्यावर त्यांना कसे वाटते, त्यांचा प्राण्याची काळजी घेतल्याचे त्यांना जे समाधान मिळते, त्यांना कुत्र्या कडून जे प्रेम, प्रामाणिकपणा मिळतो, महागडे प्रॉडक्ट विकत घेतल्यामुळे त्यांचे जे स्टेटस वाढते आणि ते वाटल्याचे औदार्य दाखवता येते, त्या साठी हे डॉग फूड तयार केलेले असते.
काही कुत्र्यांचा मालकांना डॉग फूड वर जास्त पैसे खर्च करायचे असतात, तर काहींना ग्लूटेन फ्री किंवा वेगन प्रकारातले डॉग फूड विकत घ्यायचे असते. परंतु हे सर्व इनोव्हेटिव्ह डॉग फूड्स कुत्र्यांसाठी तयार केले असतील या भ्रमात राहू नका. हे सर्व प्रोडकट्स तुमच्या आमच्या साठी बनवलेले असतात.
डॉग फूड बनवणाऱ्या व मार्केट करणाऱ्या कंपन्यांना कदाचित असे वाटेल की कुत्र्यांचे फूड जास्त चवदार बनवल्याने त्याचा खप वाढेल, पण त्यासाठी त्यांना कुत्रे कसा विचार करतात याचे ज्ञान आत्मसात करावे लागेल, जे अवघड आहे.
जास्त विक्री होईल असे डॉग फूड तयार करण्याचा योग्य फॉर्म्युला, डॉग फूड कुत्र्याच्या मालकांना कसे हवे आहे त्या प्रमाणे ते बनवणे, हा आहे.
या डॉग फूड च्या उदाहरणांचा उपयोग तुम्हाला डॉगफूड मार्केट करता यावे हा नसून, लोकं का व कसे विकत घेतात हे समजून घेणे आहे, व तुमचे मार्केटींग त्या अनुषंगाने असले पाहिजे हे तुम्हाला समजावणे हा आहे.
तुमचे प्रॉडक्ट्स, त्याचे फीचर्स कितीही चांगले असोत, तुमचा संभाव्य ग्राहक कसा आहे, तो काय विचार करतो हे नीट समजणे खूप महत्वाचे आहे. त्याच सोबत, तुमचे उत्पादन कोण वापरणार या पेक्षा कोण विकत घेणार हे पण तुम्हाला समजणे महत्वाचे आहे.
तुमचे उत्पादन, डॉग फूड सारखे, कुत्रा वापरणार म्हणून त्याला आकर्षित करणारी जाहिरात जर तुम्ही बनवाल तर तुमचे उत्पादन बाजारातून बाहेर फेकले जाल, कारण ते विकत घेणारा कुत्रा नसतो तर कुत्र्यांचा मालक असतो. त्यामुळे तुम्हला तो मालक कसा विचार करतो हे समजून, त्याचे लक्ष जाईल, तो आकर्षित होईल अशी जाहिरात बनवावी लागेल. तरच तुमच्या उत्पादनाचा खप वाढेल.
तुमचे उत्पादन कोण विकत घेणार आहे (संभाव्य ग्राहक), त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या बीलिफस काय आहेत, त्याचा जगा विषयी दृष्टिकोन काय आहे, हे तुम्हाला समजले पाहिजे. तरच तुम्ही व्यवसायात यशस्वी व्हाल.
_
निलेश गावडे
९६७३९९४९८३
ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach
www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील