एलन मस्क बनले जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार स्पेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. 49 वर्षीय एलन मस्क यांची संपत्ती 7.2 अब्ज डॉलर्सवरुन 127.9 अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे.

या वर्षी संपत्तीत 100 अब्ज डॉलर्सची वाढ
मागील एक वर्षात एलन मस्क यांच्या संपत्तीत तब्बल 100.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या एका अहवालानुसार जानेवारी महिन्यात एलन मस्क हे श्रीमंतांच्या यादीत 35 व्या स्थानी होते. आता ते दुसऱ्या स्थानी आले आहेत. या यादीत 183 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या स्थानी आहेत. तर 127.9 अब्ज डॉलर्स संपत्तीसह इलॉन मस्क आता दुसऱ्या स्थानी आले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. त्यांची संपत्ती 127.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. तसेच 105 अब्ज डॉलर संपत्तीसह बर्नार्ड अर्नाल्ड हे चौथ्या स्थानी आहेत तर 102 अब्ज डॉलर्स संपत्तीसह फेसबुकचे मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानी आहेत. काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क यांनी फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला होता.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!