व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील

व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील

Promoted
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
Share
 • 433
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  433
  Shares


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

वकिलाचा व्यवसायाशी काय संबंध असा प्रश्न पडू शकतो. पण जिथे जिथे शब्दांचे खेळ चालतात तिथे तिथे वकील महत्वाचा असतो. व्यवसायात सुद्धा एखादा वकील सोबतीला असणे महत्वाचे असते. पण आपल्याकडे जोपर्यंत कायदेशीर प्रक्रियेत अडकत नाही तोपर्यंत वकिलाचे महत्व कळत नाही. करार, व्यवहार, कागदपत्रे अशा महत्वाच्या कामातसुद्धा बहुतेकांना वाटत कि वकील अशा छोट्याश्या कामासाठी वकिलाला का फी द्यायची, त्यापेक्षा आपण स्वतःच काम पूर्ण करून घेऊ.

Promoted
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील

व्यवसायात वकिलाची गरज बऱ्याच कामांसाठी असते. एखादा करार करायचा आहे, तर तो वकिलाच्या नजरेखालून जाणे महत्वाचे असते. एखादा व्यवहार असेल, त्याच्याशी संबंधित कागदपत्रे असतील तर अशावेळीही वकिलाकडून कागदपत्रांचे वाचन करून घेणे महत्वाचे ठरते. एकेका ओळीचे कितीतरी अर्थ निघू शकतात, एखाद्या राहून गेलेल्या स्वल्पविरामावरूनही कित्येक मोठे कायदेशीर पेचप्रसंग होऊ शकतात. एखादा कायदेशीर भाषा असणारा कागद आपल्याला कळत नाही, पण वकिलाची ती भाषा सवयीची असते त्यामुळे त्यात काय म्हटलं आहे हे त्यांच्या लगेच लक्षात येतं.

मी स्वतः वकील आहे. फ्रॅंचाईजी किंवा डिस्ट्रिब्युशन अग्रीमेंट किंवा इतर अशा प्रकारचे बिजनेस डेव्हलपमेंट मधे महत्वाचे असणारे अग्रीमेंट तयार करण्यासाठी माझ्याकडे बऱ्याच व्यवायीकांची कामे असतात. कित्येकजण एखाद्या व्यवसायाशी करावयाचा करार घेऊन माझ्याकडे येतात. त्यातल्या नियम अटी ठीक आहेत का, कशा आहेत, त्यातून काय काय समस्या उद्भवू शकतात, त्यात कायसुधारण करायला हवी अशा कामांसाठी कित्येक जण येतात.

मी माझ्या जवळच्या लोकांना सांगून ठेवलेलं आहे कि कायदेशीर करार करताना आधी किमान मला एकदा दाखवत चला. माझ्या एका जवळच्या मित्राने मला न सांगता एक करार केला होता. ज्यावेळी त्यात समस्या उद्भवली त्यावेळी त्याने मला कॉल केला. मी त्याला करारामधे आवश्यक असणाऱ्या काही बाबी आहेत का विचारले तर त्या नव्हत्या. दोन वाक्ये त्या करारामधे आवश्यक होती. ती वाक्ये नसल्यामुळे आम्हाला सहा महिने कोर्टात लढावे लागले होते. अशा घटना बऱ्याचदा घडतात. माझ्या माहितीतल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत या घटना घडलेल्या आहेत.

READ  व्यवसायातील घोडचूका (भाग १) - मोठेपण दाखवण्याचा हव्यास...

आपल्याला व्यवसाय करत असताना बऱ्याचदा करार करावे लागतात. ते करार आपल्या वकिलाच्या नजरेखालून जाणे आवश्यक असते. काही वेळेस आपल्याला व्यवसायात एखाद्या स्कीमसाठी, योजनेसाठी नियम अटींची गरज असते अशावेळीही वकिलाचा सल्ला घेणे महत्वाचे असते. अगदी एखाद्याला कामावर ठेवताना काय नियम अटी असाव्यात हेसुद्धा वकिलाच्या सल्ल्याने ठरवणे कधीही उत्तम असते. काहीवेळा व्यवसायातून काही वादविवाद उद्भवले तर त्यासाठी वकील सोबतीला असणे कधीही फायद्याचे ठरते. वकील कायदेशीर स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये माहीर असतात, ते काम स्वतः करण्याच्या भानगडीत पडू नये.

Promoted
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील

आपल्याकडे स्किलचा आणि वेळेचा पैसा देण्याची लोकांची इच्छा नसते. वकिलांना टाळण्यामागे सुद्धा हाच विचार असतो. कशाला पैसे द्यायचे?
खरं तर, एखादा कागद वाचण्यासाठी वकील कितीशी फी घेणार असतो? किंवा एखादे अग्रीमेंट करून घेण्यासाठी अशी किती फी असते? पण हे थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात जर काही चूकभूल झाली तर वकिलाला पाच-पन्नास वेळा फी द्यावी लागू शकते याचा विचार केला जात नाही, यासोबत येणारा मनस्ताप, नुकसान, वेळेचा अपव्यय या गोष्टी वेगळ्याच…

आपल्या व्यवसायासाठी एक वकील नेहमीच सोबतीला असायला हवा. व्यवसायात कायदेशीर सल्ला खूप महत्वाचा असतो. कायदेशीर बाबी आपल्याला जरी कळत असल्या तरी ते वरवरचे ज्ञान आते. आणि वरवरच्या ज्ञानावर कोणत्याही कामात हात घालायचा नसतो. त्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञच सोबतीला असावा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Promoted
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 433
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  433
  Shares
 • 433
  Shares

  व्यावसायिकांसाठी वाचनीय पुस्तके

व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
व्यवसायात तज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ५) : वकील
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!