सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

Promoted
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
Share
 • 320
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  320
  Shares


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

सेल्स टीम हा प्रत्येक व्यवसायाचा एक महत्वाचा भाग असतो. विक्रीवरच सर्व काही आहे. आणि हि विक्री सदासर्वकाळ एकट्याने करणे शक्य नसते. यासाठी कार्यक्षम कर्मचारी हाताशी असणे महत्वाचे असते. परंतु हे कर्मचारी निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. लघुद्योगांमधे या सेल्स टीम चा आपल्याशी कायम संबंध येत असतो, आणि आपल्याला वैयक्तिकपणे हि टीम हॅण्डल करावी लागत असते अशावेळी कर्मचारी निवडताना काळजी घेणे महत्वाचे असते. सेल्स मधला व्यक्ती कसा असावा याचे निकष व्यवसायाच्या प्रकारानुसार बदलत असतात. त्यामुळे एकाच नियम सरसकट सर्व व्यवसायांना लागू होतील असे नाही. पण लघुद्योगांनी सेल्स टीम निवडताना काही बाबी लक्षात घेणे आवश्यक असते.

अनुभव –
सेल्स साठी इच्छुक व्यक्तीला विक्री कामाचा पुरेसा अनुभव आहे का याची माहिती घ्या. आधी कुठे कामाला होते, तिथे रिझल्ट कसा होता, काम का सोडले, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करा. अनुभवी सेल्समन व्यवसायासाठी कधीही फायद्याचाच असतो. जर संबंधित व्यक्तीला विक्री कामाचा चांगला अनुभव असेल तर पगार थोडाफार वाढवून द्यायला हरकत नसते. पण ऐकीव माहितीवर अनुभवाचा अंदाज लावू नये, पुरेशी माहिती घ्यावी.

Promoted
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

अननुभवी कर्मचारी –
पगाराचा खर्च वाचवण्यासाठी नवखे व्यावसायिक सरसकट अनुभव नसलेले कर्मचारी नियुक्त करतात. पण हि पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. सगळेच कर्मचारी अनुभव नसलेले असतील तर काम कसे चालणार? आणि प्रत्येकाला शिकवण्यात चार महिने जाणार असतील तर मार्केटकडे लक्ष कोण देणार? सेल्स मार्केटमधे अनुभव नसलेल्या लोकांचा निभाव लागत नाही. पहिले सहा सात महिने तर मार्केट नवख्या कर्मचाऱ्यांना भावच देत नाही. अशावेळी आपलेच नुकसान होत असते. त्यामुळे सरसकट सगळे कर्मचारी शिकाऊ नसावेत. दोन-तीन अननुभवी कर्मचाऱ्यांमागे किमान एक अनुभवी कर्मचारी असावा. आणि या नवख्या कर्मचाऱ्यांना अनुभवी कर्मचाऱ्याकडून प्रॅक्टिकल माहिती मिळेल याची काळजी घ्यावी.

उत्पादन क्षेत्रात, किंवा सर्व्हिस क्षेत्रात किंवा असे मार्केट जिथे विक्रीसाठी, ग्राहक जोडण्यासाठी बाहेर मार्केटमधे जाऊनच ग्राहक शोधावे लागणार असतात अशा ठिकाणी अनुभवी लोक महत्वाचे असतात. त्यांचे स्वतःचे एक मार्केट तयार झालेले असते त्याचा फायदा मिळतो, अनुभवाचा फायदा मिळतो. आणि यांच्यासोबत नवशिके जोडलेले असतील तर ते काही काळातच ते विक्री कौशल्ये शिकून मार्केटमधे स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात करू शकतात.

स्वभाव, वागणूक –
कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेताना त्यांच्या बोलण्याचा पद्धतीवर नेहमी लक्ष द्यावे. उग्र किंवा रागीट स्वरात बोलणारे, खूप मोठ्या आवाजात बोलणारे, लगेच प्रत्युत्तर देणारे, अडचणीच्या प्रश्नावर गडबडणारे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसणारे, सतत त्रासदायक चेहऱ्याने वावरणारे लोक शक्यतो टाळावेत. अनुभवी असतील, रिझल्ट चांगला असेल तर विचार करू शकता. अन्यथा असे लोक ग्राहक वाढण्याऐवजी कमी करण्याचे काम करतील. रिटेल क्षेत्रात तर असे कर्मचारी कधीच नसावेत.

READ  ग्राहक आपल्याकडे खरेदी करत नाही म्हणजे तो खरेदीच करत नाही असे नव्हे…

प्रत्येक माहितीवर भुलू नका –
मुलाखतीमधे अनुभवी उमेदवार बऱ्याचदा जुन्या ठिकाणी काम केल्याची माहिती देताना खूपच फुगवून सांगतात. आपण शहानिशा कारण्याच्या भानगडीत पडणार नसतो हे त्याला माहित असते. अशावेळी अवास्तव माहिती देऊन आपल्याला मोहात पाडण्याचे काम केले जाते. तुम्हाला जॉईन झालो तर एका महिन्यात अमुक एवढे मार्केट तयार करून देईल, एवढा रेव्हिन्यू देईल, इतके कलेक्शन करून देईल असे काही मोठमोठे आकडे सांगून भुलवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सावध राहा. अशा लोकांशी थोडी जास्त चर्चा करा. तो सांगतोय ती महती खरी आहे कि उगाचच काहीतरी बोलतोय याची शहानिशा करा.

Promoted
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

अज्ञान दाखवू नका –
सेल्स साठी मुलाखती घेताना उमेदवारांसमोर आणि आपल्या सेल्स टीम समोर अज्ञान दाखवू नका. मुलाखत घेताना, कर्मचाऱ्यांसमोर चर्चा करताना आपल्याला सेल्स मधली सगळी माहिती आहे अशाचप्रकारे वर्तणूक ठेवा. शिकण्याची वृत्ती आणि मला यातला काही कळत नाही या दोन गोष्टींमधे फरक आहे.

पगार, इन्सेन्टिव्ह
पगार ठरवताना संदिग्ध भाषा वापरू नका. किंवा उमेदवाराला पगाराची अपेक्षा विचारताना स्पष्टपणे विचारा. बरेच उमेदवार जुन्या ठिकाणी किती पगार होता आता किती पाहिजे अशा प्रकारे सांगतात, पण त्यांना जुन्या ठिकाणी किती पगार होता याचा आपल्याशी संबंध नसतो. आपल्याला त्यांना किती पगारात ठेवणे परवडणार आहे हे महत्वाचे असते. त्यामुळे जुन्या कामाच्या पगाराच्या प्रभावात जाऊ नका. तो आपल्याला किती रेव्हिन्यू देऊ शकतो, आणि आपणत्याबदल्यात आपण त्याला किती पगार देऊ शकतो याची आकडेमोड आधीच करून ठेवा. इन्सेन्टिव्ह सारख्या बाबी आधीच सांगून ठेवा.

आपल्यालाच बिजनेस शिकवणारे कर्मचारी टाळा –
बरेच कर्मचारी आपल्याला व्यवसाय कसा करायचा हे शिकविण्याचा प्रयत्न करतात. काहीजण तर मुलाखतीमधेच आपल्याला बीजनेसमध्ये काय बदल करावे लागतील याचे सल्ले द्यायला सुरुवात करतात, असे कर्मचारी टाळावेत. असे कर्मचारी त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी आपल्या बिजनेस मॉडेललाच जबाबदार धरण्याचे काम करत असतात. आपल्याला काहीतरी शिकावण्याच्या निमित्ताने आपल्यावर वरचढ होऊन टीम वर दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. लघुद्योगांमधे असे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यात जर कर्मचारी एखाद्या मोठ्या कंपनीतून आपल्याकडे आला असेल तर तो आपल्यालाच खाली दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. अशांना तात्काळ दूर करा. खूप क्वचित कर्मचारी असतात जे त्यांचा अनुभव आपल्यासोबत शेअर करून व्यवसाय वाढवायला मदत करतात. अशांना मात्र कधीही अंतर देऊ नका.

Promoted
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

रिटेल क्षेत्रातील काउंटरवरील कर्मचारी –
रिटेल क्षेत्रामधे काउंटरवर असणारा कर्मचारी हा थेट ग्राहकांशी संबंध येणार असतो. अशावेळी तो प्रसन्न चेहऱ्याचा, प्रसन्नपणे बोलणारा, समोरच्याला आदर देणारा, उलट उत्तर न देणारा असावा. रिटेल क्षेत्रामधे ग्राहकांना पुन्हापुन्हा समजावण्याची संधी नसते. एखाद्या चुकीमुळे ग्राहक निघून गेला तर पुन्हा येत नसतो. अशावेळी तो कायमचा आपल्या हातून निसटतो.

READ  चुकत चाललेले डिस्काउंट पॅटर्न...

मार्केटमधून माहिती –
आपण मार्केटमधे सेट असण्याच्या परिस्थितीमधे सेल्स कर्मचाऱ्यांच्या च्या शोधात असू तर अशावेळी मुलाखतीला येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मार्केटमधूनच मिळविण्याचा प्रयत्न करावा. कोणता कर्मचारी कसा आहे हे मार्केटमधून लगेच कळू शकते. संबंधित व्यक्ती पेमेंटच्या बाबतीत कसा आहे, ऑर्डर घेण्याच्या बाबतीत कसा आहे, कम्युनिकेशन कसे आहे अशी मार्केटमधून मिळवता येऊ शकते.

चेहरा वाचा –
मुलाखत घेताना इच्छुक व्यक्तीचा चेहरा वाचण्याचा नेहमी प्रयत्न करा. त्यांच्या डोळ्यात डोले घालून बोला. त्यांचे हावभाव, डोळे यावरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. माणूस कितीही निगरगट्ट असला त्याचे डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव थोडेतरी बोलतातच. ती भाषा माहित करून घेण्याचा प्रयत्न करा.

चांगली सेल्स टीम तयार करणे, टीम कडून काम करून घेणे, सेल्स वाढवणे या अनुभवाने येणाऱ्या गोष्टी आहेत. याचे प्रशिक्षण कुठेही मिळू शकत नाही. पण हा अनुभव येताना आपल्या हाती चांगले विक्री कर्मचारी असणेही महत्वाचे असते. सुरुवातीचा काही काळ आपण स्वतः सेल्स मधे काम करणे यासाठी महत्वाचे असते. यामुळे आपल्याला आपल्या सेल्स टीम ला कसे हॅण्डल करायचे आहे याचा पुरेपूर अंदाज येत असतो.

या काही बेसिक टिप्स आहेत सेल्स कर्मचारी नियुक्त करण्यासाठी. हि काहीपरिपूर्ण माहिती आहे असं मी म्हणू शकत नाही. पण या टिप्स कडे आपण कोणत्याही व्यवसायासाठी कर्मचारी निवडताना काय काय बेसिक टिप्स फॉलो कराव्यात या अनुषंगाने बघू शकतो. मुलाखती घेताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. चांगली माणसे लगेच मिळत नाहीत. वेळ लागतो. पाच सात जणांमधून एखादा चांगला कर्मचारी मिळतो. हळूहळू एक चांगली टीम तयार होते. या टीम कडून काम करून घेणे, यांना चांगले सांभाळणे, समाधानी ठेवणे, यांच्यावर वचक सुद्धा ठेवणे अशी सर्व कामे आपल्याला करावी लागतात. हे कौशल्य अनुभवानेच येते.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

Promoted
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 320
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  320
  Shares
 • 320
  Shares

  व्यावसायिकांसाठी वाचनीय पुस्तके

सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
सेल्स कर्मचारी निवडताना या गोष्टींची काळजी घ्या
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!