स्वच्छ व्यवहार व तत्वे, बारकाईने व काळजीपूर्वक प्रत्येक घटकांकडे लक्ष देत थेट संवाद साधण्याची कला आणि प्रत्येक संधीचे सोने करीत प्रतिकूलतेवर मात करण्याचे धाडस प्रत्येक भारतीयाने दाखवणे गरजेचे आहे
समाजाची उन्नती व विकास साधणे प्रत्येकाला शक्य आहे आणि ते आवश्यकही आहे. एकूणच लोककल्याणाची सवय प्रत्येक उद्योगपतीने आत्मसात करणे गरजेचे आहे.
समाजाचा, देशाचा विकास अनासक्तपणे आपल्याला करता आला पाहिजे. खरे तर त्येकातील चैतन्याला ऊर्जेला मोकळी वाट करून द्या आणि मग बघा काय होते ते. यातून चमत्कार घडेल आणि राष्ट्राची खऱ्या अर्थाने उन्नती होईल
व्यक्तीने स्वतःच्या स्वातंत्र्याबरोबरच इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. स्वातंत्र्यासोबतच सहजीवन… तरच देश प्रगती करू शकतो
प्रगतिशील,अत्याधुनिक यंत्र तंत्र प्रणाली व उद्योग व्यवसायाची भरभराट झाली पाहिजे, त्यातच देशाचा विकास दडलेला आहे
आपला व्यवसाय व आपले अस्तित्व हे या समाजातूनच आकाराला आले आहे हे मी कसा विसरेन? म्हणूनच मी माझ्या समाजाचे काही देणे लागतो. ते देणे हे माझे पवित्र कर्तव्य आहे
आपला व्यवसाय व आपले अस्तित्व हे या समाजातूनच आकाराला आले आहे हे मी कसा विसरेन? म्हणूनच मी माझ्या समाजाचे काही देणे लागतो. ते देणे हे माझे पवित्र कर्तव्य आहे
स्वार्थ हा कुणालाच चुकलेला नाही. प्रपंच आला की स्वार्थ आलाच. पण आपल्याला त्या “स्व” च्या पलीकडे जाता आले पाहिजे तरच आपण आपला (पर्यायाने समाजाचा) विकास साधू शकतो. कारण तुम्ही म्हणजेच हा देश आहात.
स्वच्छ व सरळ व्यवहार आणि व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकाचा सर्वार्थाने विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, मग ते कर्मचारी, कामगार असो वा गुंतवणूकदार
जमशेदजींनी मृत्युशय्येवर असताना आपल्या मुलाला एक महत्वाचा सल्ला दिला होता : तुलाच हा व्यवसाय पुढे न्यायाचा आहे आणि तो मोठा सुद्धा करायचा आहे. तो मोठा करणे शक्य नसेल तर किमान तो जीवापाड जपणे आवश्यक आहे, पण कुठल्याही परिस्थितीत तो रसातळाला जाऊ देऊ नको.
_
संकलन
उद्योजक मित्र
==========================