मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.

मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.

Promoted
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
Share
 • 339
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  339
  Shares


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मार्केटिंग किंवा जाहिरातीची स्ट्रॅटेजी प्रत्येक व्यवसायासाठी कधीच एकसारखी असू शकत नाही. व्यवसायागणिक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलत असते. विक्रीचे प्राथमिक टप्पे सगळीकडे समान असतात. अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोचणे, त्यांना आपल्यापर्यंत आणणे, त्यातून त्यांना आपले ग्राहक बनवणे हे टप्पे सगळीकडे समान असतात. पण ग्राहकांपर्यंत पोचण्याचे प्रकार बरेच आहेत. व्यवसायागणिक त्यामध्ये बदल होत असतात. एखाद्या व्यवसायासाठी यशस्वी ठरलेली स्ट्रॅटेजि दुसरीकडेसुद्धा यशस्वी ठरेल असे नाही. त्यामुळे आपला व्यवसाय काय आहे, आपले आर्थिक नियोजन कसे आहे, आपला अपेक्षित ग्राहकवर्ग कोणता आहे याची माहिती घेऊन मार्केटिंग आणि जाहिरातीची स्टॅटेजी ठरवावी लागते.

मी माझ्या क्लायंटसाठी जेव्हा जाहिरात आणि मार्केटिंग संबंधी कन्सल्टिंग करतो तेव्हा मी याच गोष्टींवर लक्ष देतो. लघुद्योगांमधे सर्वात मोठा मुद्दा असतो तो आर्थिक नियोजनाचा. मार्केट, अपेक्षित ग्राहकवर्ग यासोबतच व्यावसायिक किती खर्च करू शकतो यानुसार सुद्धा आपल्याला जाहिरातीचे कसे नियोजन आखावे लागेल हे पाहावे लागते. त्यांच्या क्षमतेनुसार किती एरिया टार्गेट करायचा, पुढच्या किमान तीन महिन्यांचे आर्थिक नियोजन कसे असेल हे पाहून जाहिरातीचे नियोजन ठरवायचे असते. उपलब्ध असलेल्या फंडिंग मधे कोणकोणत्या पद्धतीने जाहिराती करायच्या अशा सर्व बाबींचा विचार करून कॅम्पेन ठरवावे लागते.

Promoted
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.

एक फर्टिलायझर आणि पेस्टीसाईड कंपनी आहे. त्या कंपनीसाठी गाव पातळीवर आणि काउंटरपातळीवर कॅम्पेन करणे हा आमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. तिथे डिजिटल कॅम्पेनिंग काही विशेष फायद्याचे नाही. मी सध्या एक चिकन कंपनीसाठी ब्रँड डेव्हलप करत आहे. ब्रॅण्डिंग, जाहिरात आणि सेल्स अशा तीनही पातळीवर काम चालू आहे. तिथे शहरी भाग लक्षात घेऊन आम्ही कॅम्पेन ठरवत आहोत. माझे एक ओळखीचे व्यावसायिक आहेत, लॉंड्री व्यवसाय आहे त्यांचा. मागच्या एक वर्षात त्यांनी त्यांच्या व्यवसायाचे प्रमोशन म्हणून फक्त पॉम्पलेट्स वाटाण्यावर भर दिलेला आहे, आणि हि पद्धत चांगलीच चांगला यशस्वी ठरली आहे. माझ्या एका क्लायंट साठी आम्ही ब्रँड मधे बदल करण्यापासून सुरुवात केली होती. माझ्या वैयक्तिक व्यवसायांसाठी सुद्धा मार्केटिंग, जाहिरातीचे कॅम्पेन वेगवेगळे केले जाते. एखादे FMCG क्षेत्रातील प्रोडक्ट असेल तर त्यासाठी वेगळी स्ट्रॅटेजी लागेल, किंवा एखादे इंडस्ट्रिअल क्षेत्रातील प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल तर तिथे वेगळे नियोजन करावे लागेल. सरसकट सर्वांसाठी एकच प्रकार लागू होत नाही.

जाहिरात सुद्धा विचारपूर्वक बनवावी लागते. एखादे जाहिरातीचे कॅम्पेन एखाद्या ठिकाणी यशस्वी झाले म्हणून सगळीकडे यशस्वी होऊ शकत नाही. ग्राहकांच्या प्रकारानुसार जाहिरातीमधे बदल करावे लागतात. अगदी ग्राहक कोणत्या भागातील आहे ते पाहून त्यानुसार रंगसंगती ठरवावी लागते. शब्दरचना समोरचे ऐकणारे, वाचणारे कोण आहेत हे पाहून ठरवावी लागते. स्थळ, मानसिकता, वातावरण अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन जाहिराती बनवाव्या लागतात. अगदी जाहिरात कोणत्या प्लॅटफॉर्म वर दिसणार आहे त्यानुसार सुद्धा कॅम्पेन ठरवावे लागते.

विक्री साखळी ठरवताना आपल्या खालोखाल विक्रीचे किती टप्पे असतील, ग्राहक कोणकोणते असतील, ग्राहकांपर्यंत पोचण्याचे किती मार्ग असतील, विक्रीचे किती मार्ग उपलब्ध आहेत अशा विविध बाबींना ध्यानात घेऊन विक्रीचे नियोजन करावे लागते. विक्रीची साखळी जास्तीत जास्त सहज सुलभ कशी होईल, अंतिम ग्राहकांच्या हातात सहजतेने प्रोडक्ट कसे पोहोचेल याचा अभ्यास करून नियोजन ठरवावे लागते.

READ  मार्केटिंगला भुताटकी असल्यासारखं काय घाबरता ?

व्यवसायात पुस्तकी गोष्टी अभ्यासासाठी उपयुक्त आहेत. त्यातली माहिती नियोजन ठरवताना नक्कीच फायद्याची ठरते. पण प्रॅक्टिकल ज्ञान खूप महत्वाचे आहे. आपण कागदावर कितीही मोठी आकडेवारी मांडली तरी प्रत्यक्षात फिल्ड वर काम करताना बऱ्याच गोष्टी अशा समोर येतात ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते. हे अनुभव आपल्याला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी कामी येतात. त्यामुळे नेहमी प्रयोगशील राहणे महत्वाचे आहे.

Promoted
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.

जाहिरात, मार्केटिंग कॅम्पेन करताना कॉपी करू नका. प्रत्येक व्यवसायाचे स्वतःचे अस्तित्व आहे, प्रत्येक व्यवसायाचे स्वतःचे मार्ग आहेत, प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र स्ट्रॅटेजी आहे. वेगवेगळ्या जाहिरातींचा, स्ट्रॅटेजींचा, कॅम्पेनचा अभ्यास करून आपल्या व्यवसायासाठी काय योग्य आहे याचा विचार करा. आपले स्वतःचे नियोजन तयार करा. त्याला सपोर्ट म्हणून आणखी एक स्ट्रॅटेजी तयार ठेवा. जर व्यवसायात नवीनच असाल तर आधी काही प्रयोग करावेच लागतात. जुन्या व्यवसायातही काहीवेळा प्रयोग करावे लागतात. या प्रयोगांतून काही चांगल्या स्ट्रॅटेजी हाती लागतात. त्यावर लक्ष केंद्रित करून पुढची स्ट्रॅटेजी ठरवा. पण स्ट्रॅटेजीची कॉपी बिलकुल करू नका.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Promoted
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 339
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  339
  Shares
 • 339
  Shares

  व्यावसायिकांसाठी वाचनीय पुस्तके

मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
मार्केटिंग, जाहिरात आणि विक्रीची स्ट्रॅटेजी व्यवसायागणिक बदलत असते.
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!