उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

Promoted
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
Share
 • 217
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  217
  Shares


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

उद्योगजगताचा विकास होण्यासाठी दळणवळण व्यवस्था उत्तम असणे आवश्यक असते. आणि यासाठी राजकीयनेतृत्व दूरदृष्टीचे असणे आवश्यक असते. बहुतेक लघुद्योग स्थानिक स्तरापुरते मर्यादित असतात, पण काही उद्योगांना वाहतुकीची गरज पडतेच. मोठ्या उद्योगांची वाहतूक लांबवरच होत असते. अशावेळी वाहतूक जेवढी वेगवान होईल तेवढा वेळ, खर्च वाचतो. जिथे उद्योगांना वेगवान कनेक्टिव्हीटी मिळते तिथे उद्योगांची चांगली वाढ झाल्याचे दिसून येते.

पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवे हे एक वेगवान वाहतुकीचे चांगले उदाहरण आहे. हा रास्ता झाला तेव्हा आशियातला सर्वोत्तम रास्ता म्हणून गणला गेला होता. या रस्त्यामुळे पुणे, चिंचवड हि मोठी शहरे मुंबईच्या जवळ आली. यासोबतच चाकण सारख्या ठिकाणच्या इंडस्ट्रिअल एरियांना सुद्धा फायदा झाला. हा संपूर्ण पट्टाच या हायवेमुळे डेव्हलप झाला. त्यावेळी हा रास्ता होणे शक्य नाही असेच काही तज्ज्ञांनी आणि विरोधकांनी सांगितले होते, आणि तुम्ही नाही म्हणताय मग आम्ही करूनच दाखवणार या हट्टाने तेव्हाच्या सरकारने हा रास्ता यशस्वीपणे पूर्ण करून दाखवला होता. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते.

उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

स्व. अटलबिहारी वाजपेयीनीं त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुवर्ण चौकोन (चतुष्कोण) या नावाने दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता या चार शहरांना जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पामुळे देशातील १० पेक्षा जास्त राज्ये एकमेकांशी जोडली गेली. या प्रकल्पामुळे देशातील चार महानगरे एकमेकांशी वेगवान दळणवळण व्यवस्थेने जोडली गेलीच पण या प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेली कितीतरी शहरे या महानगरांच्या संपर्कात आली. यातून या प्रकल्पाच्या आजूबाजूची सगळीच शहरे मोठी झाली. महानगरांना चांगली कनेक्टिव्हीटी मिळाल्यामुळे सगळ्याच शहरांत उद्योगांची भरभराट झाली. आपल्याकडे कोल्हापूरपर्यंत कनेक्टिव्हीटी निर्माण झाली. हा प्रकल्प देशाच्या उद्योग जगताच्या विकासात एक मोलाचा टप्पा ठरला. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हा प्रकल्प सुद्धा असाच महत्वाचा होता. प्रत्येक गावापर्यंत डांबरी रास्ता असावा हे तोपर्यंत कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते.

उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योगांच्या एका परिषदेला गेले होते. तिथे महाराष्ट्रामधे गुंतवणूक कारण्यासंबंधी त्यांनी तेथील उद्योगांना प्रपोजल दिले. त्यात मुख्यत्त्वे मुंबई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या गुंतवनुकीसंबंधी प्रपोजल होते. पण सगळ्यांनीच ते प्रपोजल नाकारले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले कि पुणे वगळता महाराष्ट्र एकही असा रास्ता नाहीये जो आमच्या वाहनांना वेगाने मुंबईला पोर्ट पर्यंत पोचवू शकेल. अशावेळी इतर ठिकाणी गुंतवणूक म्हणजे आमचे नुकसानच… विलासरावांनी महाराष्ट्रात आल्यांनर लगेच पहिला प्रकल्प हाती घेतला तो पुणे शिरूर रस्त्याचा. पुणे शिरूर रस्ता वेगाने चौपदरी करून घेतला. यामुळे रांजणगाव MIDC चांगली वाढली. या रस्त्यानंतर लगेच नगर-औरंगाबाद आणि जालना-औरंगाबाद या दोन रस्त्यांना मनावर घेतले. आणि त्यानंतर नगर शिरूर रास्ता झाला. यामुळे जालन्यापासून मुंबईपर्यंत वाहतूसाठी चांगला ट्रॅक उपलब्ध झाला. जालना MIDC पूर्वीपासून मोठी होतीच पण यामुळे जालना, औरंगाबाद परिसरातील उद्योग क्षेत्रे विकसित झाली, नगरमधील सूप MIDC मध्ये तर चांगलीच वाढ झाली.

READ  युवा उद्योजकांनो, लग्नाचे नियोजन करताना या गोष्टी विचारात घ्या.
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

कालांतराने कल्याण विशाखापट्टणम नॅशनल हायवेमुळे कल्याण नगर मार्गे नांदेडपर्यंत कनेक्टिव्हीटी वाढली.
पुणे सोलापूर हायवेमुळे लातूर पर्यंतचा परिसर मुंबईशी वेगवान वाहतुकीने जोडला गेला.
धुळे औरंगाबाद सोलापूर हायवे बराच काळ खराब होता, पण आता तोही चांगला झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यातील जवळजवळ सगळीच शहरे मुंबईशी चांगल्या रस्त्यांनी जोडली गेली, आणि या सर्वच भागात उद्योगांना वाढीसाठी संधी उपलब्ध झाली.

Promoted
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

कोकणकडे आजपर्यंत सर्वच सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. मुंबईपासून दक्षिणेकडे जाणारा एकमात्र हायवे अजूनही एखाद्या ऑफरोडींग सर्कस पेक्षा वेगळा नाही. पण तरीही कोकण मुंबईशी बऱ्यापैकी जोडले गेले आहे. कोकणात इंडस्ट्रिअल क्षेत्राला जास्त संधी नसल्यामुळे कोणत्याही सरकारला अजूनही इथे चांगले रस्ते देण्याचे सुचले नसावे. हायवेचे काम चालू आहे. काही ठिकाणी रास्ता चांगला झाला आहे पण तरीही अपेक्षित वेगाने काम होत नाहीये. मुंबई गोवा हायवे लावकारात लवकर होणे आवश्यक आहे. यामुळे सिंधुदुर्ग पर्यंतच्या पर्यटन व्यवसायाला चांगल्या संधी निर्माण होतील.

या सगळ्यांमधे विदर्भ मात्र पूर्णपणे दुर्लक्षित होता. खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वेगवान रस्त्यांनी जोडले गेल्यामुळे या प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रिअल क्षेत्राला उभे राहण्यासाठी मदत मिळाली. पण विदर्भाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. विदर्भात जिल्हा व तालुक्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते चांगले आहेत, पण या संपूर्ण विभागाला मुंबईशी जोडणारा एकही चांगला रास्ता उपलब्ध नव्हता. यामुळे मोठ्या उद्योगांना इथे सेट व्हायला समस्या येत होत्या. आणि यामुळे इथे खूप मोठे औद्योगिक क्षेत्रे पाहायला मिळत नाहीत.

मात्र मागील सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाकडे लक्ष दिले. त्यांचा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्प हा विदर्भाचे भाग्य बदलावणारा ठरणार आहे. सहा सात तासांमधे तुम्ही खाजगी वाहनाने नागपूरपासून मुंबईपर्यंत पोहोचू शकाल, आणि दहा ते बारा तासात ट्रान्सपोर्ट वाहने मुंबईपर्यंत पोहोचू शकतील अशा प्रकारचे या हायवेचे नियोजन आहे. यामुळे बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर हे सगळेच जिल्हे मुंबईशी वेगवान वाहतुकीने जोडली जातील. याचा फायदा प्रत्येक ठिकाणच्या उद्योग क्षेत्राला होणार आहे. यासोबतच हायवेच्या बाजूने प्रत्येकी शंभर किलोमीटरवर मेगा फूडपार्क सारखे प्रकल्पांमुळे स्थानिक कृषी उत्पादकांना फायदा होईल. हायवेच्या बाजूने असणारी ५०-१०० किलोमीटरवरील शहरे हायवेला जोडली जातील. ज्यामुळे खूप मोठा परिसर या प्रोजेक्ट ला जोडला जाणार आहे. हा प्रकल्प विदर्भाला समृद्ध करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे.

उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

समृद्धी महामार्गानंतर असाच प्रकल्प मुंबई लातूर करण्याचाही जुन्या सरकारचा मानस होता, नव्या सरकारने हा प्रकल लवकरात लवकर हाती घ्यावा अशी अपेक्षा असेल.

औद्योगिक क्षेत्रासाठी मुंबईशी कनेक्टिव्हीटी खूप महत्वाची आहे. निर्यातीसाठी मुंबई हेच सर्वोत्तम ठिकाण आहे. आणि जवळजवळ सर्वच मोठ्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईमध्ये आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्हे आता मुंबईशी वेगवान वाहतुकीने जोडले जात आहेत. याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रालाच होणार आहे. येत्या काळात लहान लहान शहरांच्या परिसरातसुद्धा मोठ्या इंडस्ट्री उभ्या राहिलेल्या दिसून येतील.

या गोष्टी घडत राहतात, पण आपल्या लक्षात येत नाही. कदाचित हे वाचल्यानंतर कित्येकांच्या लक्षात आले नसेल कि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा चांगल्या हायवेने मुंबईशी जोडण्यासाठी काय नियोजन चालू आहे. या गोष्टी पडद्यामागे चालू असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या समोर येईलच असे नाही. किंवा त्यामागचे उद्दिष्ट आपल्यासमोर येईलच असे नाही. पण हा विकासाचा रथ सतत पुढे जात असतो. सरकारे बदलल्याने यात आडकाठी येत नाही.

Promoted
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

रस्त्यांसोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक गुंडांचा, खंडणीखोरांचा. या विषयावर मी आधीही खूप वेळा लिहिलं आहे. हा विषय सर्वानीच बाजूला ठेवलेला आहे, कारण इथे सर्वच राजकीय पक्षांचे हित गुंतलेले आहे. कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपन्या सुरक्षित नाहीत. स्थानिकांची दडपशाही, दहशत सर्वानाच नकोशी झाली आहे. पण अजूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आपल्या राजकीय क्षेत्राने ज्या दूरदृष्टीने आजपर्यंत इथल्या औद्योगिक क्षेत्राची भरभराट केली आहे त्याच दूरदृष्टीने खंबीरपणे औद्योगिक क्षेत्रातील दहशत नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे.

उद्योगांना आणखी काही गोष्टींची आवश्यकता आहेच. सोप्या प्रोसिजर, किचकट प्रक्रियांपासून मुक्ती, लायसन्स राज पासून मुक्ती, सरकारी अधिकाऱ्यांच्या छळापासून मुक्ती, औद्योगिक क्षेत्रे वगळता इतर भागातही कायम स्वरूपी वीज, निर्यातीसाठी चांगले वातावरण अशा गोष्टींची आवश्यकता उद्योगांना असतेच. यासाठीही सरकारने आक्रमकपणे धोरण आखणे महत्वाचे असते.

राजकीय दूरदृष्टी उद्योग क्षेत्रांच्या भरभराटीसाठी खूप महत्वाची आहे. वेगवान आणि सुखकर दळणवळण हा देशाच्या विकासासाठी महत्वाचा भाग आहे. दळणवळण जेवढे वेगवान तेवढा देशाचा विकास वेगवान असतो. आपल्याला अजून खड्ड्यांपासून मुक्ती मिळालेली नाही, पण तरीही जे आहे तेही पूर्वीपेक्षा चांगले चालू आहे असे आपण म्हणू शकतो. आजतरी आपल्या महाराष्ट्रातील सर्व शहरे मुंबईशी वेगवान दळणवळण व्यवस्थेने जोडण्याच्या प्रक्रियेत आहेत. लवकरच हि प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याचा फायदा बघायला मिळेल.

READ  रागाची किंमत काय ?

_

Promoted
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 217
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  217
  Shares
 • 217
  Shares

  व्यावसायिकांसाठी वाचनीय पुस्तके

उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी आवश्यक असते वेगवान दळणवळण आणि राजकीय दृष्टिकोन…
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!