इतरांचे गुंतवणुकीचे, उत्पन्नाचे आकडे पाहून आपले हिशोब मांडू नका, सुरुवात करण्याला प्राधान्य द्या.


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

व्यवसायात गुंतवणुक कितीही कमी असली किंवा जास्त असली, तरी व्यवसायातुन मिळणाऱ्या परताव्याचा रेशो टक्केवारीमधे सारखाच असतो. फक्त आकडेवारीत फरक दिसतो. मोठ्या रकमेवर टक्तेवारीमधे होणारी लहानशी वाढ सुद्धा आकड्यांमधे खुप मोठी वाटते, पण प्रत्यक्षात‌‌ जर त्यातील गुंतवणुकीच्या‌ प्रमाणात आकडेवारी‌ पाहीली तर परतावा सारखाच दिसेल.

दोन प्लाॅट आहेत. एक आहे १ गुंठ्याचा, दुसरा आहे १० गुंठ्याचा. १० लाख रुपये गुंठा भाव आहे. आपली क्षमता १० लाख रुपये गुंतवण्याची आहे, दुसऱ्याची क्षमता १ कोटी रुपये गुंतवण्याची. आपण १ गुंठा प्लाॅट घेतला, दुसऱ्याने १० गुंठे.

३ वर्षांनी प्लाॅटचे भव दुप्पट झाले. दोघांनी आपापले प्लाॅट विकले. आपल्याला १० लाख चे २० लाख मिळाले, त्याला १ कोटीचे २ कोटी मिळाले.

(ईथे आपण एखाद्या व्यवसायाला समोर ठेवूनसुद्धा आकडेवारी मांडू शकतो, पण स्थावर मालमत्तेसंदर्भात उदाहरण लवकर लक्षात येईल हा उद्देश आहे)

आता त्याला आपल्यापेक्षा जास्त पैसे मिळाले असे आकडेवारीवरुन वाटू शकेल, पण त्यासाठी त्याची त्यातली गुंतवणुकही तेवढी‌ जास्त‌ होती हेही आपण पहायला पाहीजे ना? जेवढे गुंतवले त्याच्याच प्रमाणात‌ परतावा मिळाला.‌ आपण आपल्या‌ क्षमतेनुसार गुंतवले, त्याने त्याच्या क्षमतोनुसार…

ईथे जर आपण त्याच्याशी तुलना करत राहीलो तर आपण मागे पडल्याची भावना निर्माण होईल, पण जर तुलना न करता आपल्या आत्ता हाती असले‌ल्या क्षमतेमधे आपण काय‌ उत्तम करु शकतो याचा अभ्यास केला आणि पुढचे नियोजन आखले तर ते टार्गेट आपण पुढच्या ६-७ वर्षात पुर्ण करु शकतो हे लक्षात‌ येईल. आणि त्यापुढे लहानश्या टक्केवारीतही वाढणारे उत्पन्नाचे प्रमाण आकडेवारीच्या हिशोबत मोठे उत्पन्न देते हेही लक्षात‌ येईल.

खरं तर ६-७ वर्षांनंतर व्यवसायात कुणाशीतरी तुलना करायची नसते हे आपोआपच लक्षात यायला लागलेले असेल.

आपण व्यवसायासाठी किती गुंतवणुक लागेल याचा हिशोब नेहमीच ईतरांचे सेटअप पाहून करतो… तो व्यवसाय सुरु करण्यासाठी किती गुंतवणुक लागेल याचा हिशोब न करता त्याने किती गुंतवलेत तेवढे आपल्याला गुंतवायचेत असा आपला हिशेब असतो.

समजा एखादे स्नॅक सेंटर सुरु करायचे असेल, आपल्याकडे २०-२५ हजार रुपये असतील, तर त्यात लहानश्या गाडीवरही‌ स्नॅक सेंटर सुरु होऊ शकते, पण आपण त्यासाठी शाॅप पाहिजे, किचन सेटअप पाहिजे, चार कर्मचारी पाहिजे, शाॅप डिझाईनींग करावी लागेल अशा विचारात स्नॅक सेंटर सुरु करण्यासाठी ६-७ लाख रुपये लागणारच अशा विचाराला घट्ट पकडून बसतो, पण तेवढे पैसे हातात नसतात, ते येतील या आशेवर काहीच न करता महीनोनमहीने अगदी काही‌ वर्षेही वाया घातले जातात. सोबतच कुणी फंडींग करत नाही‌ म्हणुन मला व्यवसाय सुरु करता येत नाहीये, किंवा व्यवसायासाठी खुप पैसे लागतात म्हणुन मला व्यवसाय करता आला नाही असे आकतांडव करतो.

याऐवजी जर हाती असलेल्या पैशात जमेल तसा‌ सेटअप सुरु केला, छानपैकी चालवला तर ज्या सेटअपसाठी पैसे जुळत नाहीत असे वाटत असते ते पैसे दोन तीन वर्षात त्या व्यवसायातुनच उभे राहू शकतात आणि त्यातुन मोठा‌ सेटअप उभा करता येऊ शकतो. म्हणजे त्या मोठ्या सेटअपपासुनच सुरुवात‌ करायची या अट्टहासात कुठुनतरी बळजबरीने पैसे उचलुन त्याच्या परतफेडीच्या दडपणात करीअरच्या सुरुवातीलाच अडकुन पडण्यापेक्षा तोच पैसा व्यवसायातुनच दोन तीन वर्षात ऊभा राहू शकतो. आणि त्याच्या जळवाजुळवसाठी वाया गेलेला वेळ वेगळाच.

तो जवळजवळ तेवढाच वेळ असेल जेवढा वेळ तिथपर्यंत जाण्यासाठी २५ हजार गुंतवणुकीच्या व्यवसायाने घेतलेला असेल, उलट कोणताही अनुभव नसताना मोठी रक्कम उचलुन तिचे दडपणच वाढते, तो पैसा कसा हाताळायचा, त्यातुन उभ राहीलेला सेटअप कसा हाताळायचा याचा अंदाज येणे अवघड असते, यातुन अपयशाची शक्यता वाढते, परतफेडीमधे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागू शकतो, याऊलट दोन तीन वर्षात तो लहानसा व्यवसाय कितीतरी अनुभव देतो कुणाला काही देण्याचे दडपण नसल्यामुळे पुर्ण लक्ष व्यवसायावर केंद्रीत करता येते आणि तुम्हाला कितीही मोठा सेटअप हाताळण्यासाठी सक्षम बनवतो….

तुम्हाला जर खरंच व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही पैशावाचुन अडू शकत नाही, तुमच्याकडे काय रिसोर्सेस उपलब्ध आहेत‌ त्याची यादी करा, आणि त्यातुन व्यवसाय कसा ऊभा करता येईल याचे वर्कींग करा. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यात उर्जा आणि वेळ वाया घालवू नका, काय आहे याचा विचार करा, आणि त्यातुन कसा व्यवसाय ऊभा करता येईल याचा अभ्यास करुन सुरुवात करा. तुम्ही ज्या सेटअपचा विचार करत आहात‌ तो कधीनाकधी साध्य होणारच आहे हे लक्षात घ्या…

पक्ष्याचं लहानसं पिल्लू पंख फुटल्यावर मला उंचच उडायचंय नाहीतर मी उडणारच नाही असं म्हणुन घरट्यातच बसुन रहात नाही, ते उडण्याला प्राधान्य देतं…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!