लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
प्रत्येक बाजारपेठ वेगळी असते, प्रत्येक बाजारपेठेची मानसिकता वेगळी असते, प्रत्येक बाजारपेठेची व्यवहाराची पद्धत वेगळी असते. एका ठिकाणी चालणारी व्यवहाराची पद्धत दुसरीकडे योग्य असेलच असे नाही. एका बाजारपेठेचे नियम दुसऱ्या बाजारपपेठेला लागू होतील असे नाही. प्रत्येक मार्केटसोबत त्याच्या कलाप्रमाणे वागा.
आपले सध्याचे मार्केट व्यवहाराची एखादी पद्धत मान्य करते म्हणून इतर ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारे व्यवहार करता येईल असे नसते. असा आपण हट्टही धरू नये. तिथली स्टॅंडर्ड प्रॅक्टिस काय आहे याचा अंदाज घेऊनच तिथले नियोजन करावे. पेमेंट टर्म, उधारीची पद्धत, माल पुरवण्याची पद्धत, संवाद साधण्याची पद्धत, अशा विविध गोष्टींमधे प्रत्येक मार्केट वेगळे असते. आपण एखाद्या व्यवहार पद्धतीला सरावलो आहोत म्हणून इतर ठिकाणी तीच पद्धत अवलंबण्याचा अट्टाहास धरू नये. अशाने आपले ग्राहक आपल्यापासून दूर जाऊ शकतात. मुख्यत्वे जिथे रिटेल नेटवर्क हाताशी धरणे आवश्यक असते तिथे हि समस्या उद्भवते.
समोरच्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडण्यासाठी आपला ब्रँड अशा प्रकारे सेटअप झालेला असला पाहिजे कि समोरच्यांना आपली गरज भासली पाहिजे आपल्याला त्यांची नाही. पण हि वेळ येण्यासाठी खूप वेळ जातो तोपर्यंत आपल्याला मार्केटला धरून चालावेच लागते. मार्केटमधले कितीतरी मोठमोठे नामांकित ब्रँड सुद्धा स्थानिक प्रॅक्टिस तोडायच्या भानगडीत पडत नाहीत. रिटेल नेटवर्क मधे जिथे डिस्ट्रिब्युशन करायचे असते तिथे तर कुणीच रिस्क घेत नाही. कारण मार्केटने काही काळासाठी जरी हात आखडता घेतला तरी व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी प्रचंड कष्ट पडतात हे त्यांना माहित असते.
मार्केटमधे प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही हे गृहीत धरूनच चालावे. आपण एखादा प्लॅन बनवलेला असतो, पण प्रत्यक्षात मार्केटकडून वेगळाच प्रतिसाद मिळतो, अशावेळी गडबडून न जाता तिथली व्यवहाराची पद्धत आत्मसात करून व्यवहार करावा. प्रत्येक मार्केटची व्यवहाराची पद्धत वेगवेगळी असते हे गृहीत धरूनच नियोजन आखावे.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील