कोणता व्यवसाय करू ?


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कोणता व्यवसाय करू असा प्रश्न इतरांना विचारण्यापेक्षा मी काय व्यवसाय करू शकतो असा स्वतःलाच प्रश्न विचारा.

तुम्ही काय विकू शकता याचा शोध घ्या. मार्केटला काय हवंय याचा शोध घ्या. तुम्हाला स्वतःला संकल्पना सुचल्या पाहिजेत. व्यवसाय करायचा म्हणजे नवीनच संकल्पना असली पाहिजे असं काहीच नाहीये. जुन्या संकल्पना सुद्धा भरपूर यश देतात. तुम्हाला फक्त मार्केटची गरज ओळखता आली पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे इतरांकडून घेतलेल्या व्यवसायांच्या आयडिया यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी असते. जी संकल्पना तुम्हाला सुचलेली नाही, त्या संकल्पनेवर तुमचा मेंदू काम करू शकत नाही. तुम्ही फक्त सांगकाम्यासारखे काम करता. ज्या संकल्पनेत तुमचा मेंदू सहभागीच नाहीये त्यात तो पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही साहजिकच ती संकल्पना कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

मला बरेच कॉल येतात… तुमच्याकडे कोणते बिझनेस आहेत? मी सरळ सांगतो माझ्याकडे कोणताही बिझनेस नाहीये. मी बिझनेस कसा करायचा सांगतो, कोणता करायचा तुम्ही ठरवायचं. झालंच तर किमान आठ दहा संकल्पना समोर ठेवा, त्यातल्या तुमच्यासाठी बेस्ट तीन कोणत्या असतील मी सांगू शकतो. पण मला व्यवसायाची यादी मागू नका. ती देऊन मी तुमचं नुकसान करू शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला व्यवसाय निवडण्यातच अपयश येत असेल तर व्यवसाय चालवणे हि फार दूरही गोष्ट आहे.

लोकांना व्यवसायाची यादी मागण्यात खूप इंटरेस्ट असतो. पण व्यवसाय निवड हि काही हॉटेलमधे मेनूकार्ड पाहून एखादा पदार्थ ऑर्डर करण्यासारखी प्रोसेस नाहीये. आणि यादी किती होईल याचा अंदाज आहे? मार्केटमधे दोन पाच हजार व्यवसायाच्या संकल्पना सापडतील. ते सगळे चालू आहेत म्हणजे त्याला स्कोप आहे. हजारो प्रोडक्ट आपल्या समोर आहेत. आपल्याला मिळणारे प्रत्येक प्रोडक्ट कुणीतरी बनवतंय, ते बनवताहेत कारण त्यांना त्यात नफा मिळतोय. मग यादी पाहून चांगला व्यवसाय कसा शोधायचा? खरं तर सगळेच व्यवसाय चांगले असतात, आपल्याला आपल्यासाठी चांगला कोणता आहे हे शोधायचे असते.

त्यामुळे इतर कुणालातरी व्यवसायाच्या याद्या मागण्यापेक्षा स्वतः काय करू शकता ते शोधा… तुम्ही काय विकू शकता ते शोधा कोणता व्यवसाय करू याच उत्तर तुम्हाला आपोआपच सापडून जाईल. तुमच्या मार्केटची गरज शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय जमू शकतं याचा शोध घ्या. तुमचा कशात अनुभव आहे का याचा अंदाज घ्या. तुमचा जनसंपर्क कशात कामी येऊ शकतो याचा शोध घ्या. किंवा अगदी तुम्ही आत्ता जिथे कुठे असाल तिथे जागेवर गोल चक्कर जरी मारली तरी तुम्हाला किमान २०-२५ व्यवसाय सापडतील. २०-२५ सोडा, तुम्हाला किमान दोन पाच व्यवसाय संकल्पना तरी सुचल्यात पाहिजेत. जर तेही सुचू शकत नसेल तर तुम्ही उद्योजकतेच्या पहिल्याच पायरीवर नापास झालेला आहात, पुढे जायला काही स्कोपच नाही.

इतरांना कोणता व्यवसाय करू असा प्रश्न विचारण्यापेक्षा, मी काय करू शकतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. मी काय विकू शकतो या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या शेकडो संकल्पना सापडतील…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant

www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!