लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
ज्या ग्राहकवर्गाला आपल्याला जोडायचं आहे आपल्याला त्याच वर्गाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. तुम्हाला ग्रामीण भागातील ग्राहक जोडायचा असेल, किंवा शहरातील, किंवा शहरातील एखाद्या ठराविक परिसरातील, किंवा एरियाची मर्यादा नसेल पण एका ठराविक प्रकारातील किंवा ठरविक वयोगटातील… तुम्हाला जो ग्राहक वर्ग टार्गेट करायचा आहे त्याच्याच दृष्टिकोनातून विचार करावा लागतो.
एक साधं उदाहरण पहा… जर आपल्याला जाहिरातीचे पोस्टर्स किंवा ब्रोशर्स छापायचे आहेत. ते ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील ग्राहकांसाठी असतील. अशावेळी ग्रामीण भागासाठी थोडे भडक रंगाचे आणि शहरी भागासाठी थोडे सौम्य रंगाचे पोस्टर्स किंवा ब्रोशर्स असतील तर चांगले ठरते. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या आसपासच्या शांत सौम्य वातावरणामुळे भडक रंग जास्त आवडतात तर शहरी भागातील लोकांना शहरात सगळीकडे भडकपणालाच तोंड द्यावे लागत असल्यामुळे सौम्य रंग आकर्षित करतात. हा लहानसा फरकसुद्धा बऱ्याचदा लक्षात घेतला जात नाही. आणि मग आपल्या जाहिरातीला प्रतिसाद का मिळत नाही असा प्रश्न पडतो. मला सौम्य रंग जास्त आवडत असतील म्हणून मी ग्रामीण भागात करण्याच्या जाहिरातीसाठी आग्रहाने सौम्य रंगाचीच रंगसंगती करण्यात काहीच लॉजिक नाही. मला काय आवडतं यापेक्षा मला जो ग्राहकवर्ग लक्ष्य करायचा आहे त्याला काय आवडतं हे पाहणेच माझ्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.
लहान लहान फरक सुद्धा खूप मोठा परिणाम करत असतात. आपला ग्राहकवर्ग कोणता आहे ते शोधणे यामुळेच महत्वाचे ठरते. अगदी १५ ते २०, २० ते २५, २५ ते ३०, ३० ते ४० अशा वयोगटांमध्येसुद्धा मानसिकतेमधे फरक असतो. सगळ्यांना एकाच वेळी टार्गेट करायचं असेल तर त्यानुसार कॅम्पेन राबवावे लागत. जर ठराविक वर्गालाच टार्गेट करायचं असेल तर त्यानुसार कॅम्पेन वेगळं लागत.
वॉशिंग पावडरच्या जाहिरातींमधे दाखवली जाणारी गृहिणी ५-७ वर्षांच्या लहान मुलांचीच आई आणि ३०-३२ वयाचीच का दाखवली जाते? कारण ती त्या वयाच्या गृहिणींना लक्ष्य करते. या वयाची गृहिणी संसाराच्या क्षेत्रामधे आत्ताआत्ता आलेली असते. ति निवडस्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करते. पार्याय वापरून पहाते. आणि इथे तिला जे प्रोडक्ट आवडणार आहे ते शेवटपर्यंत ती वापरणार असते. ४०-४५ वयाच्या गृहिणी पावडरच्या जाहिरातींमधे कधीच लक्ष्य केलेल्या नसतात कारण त्यांनी त्यांचा ब्रँड १५-२० वर्षांआधीच निवडलेला असतो. त्या त्यावर कायम असतात. क्वचित एखाद टक्का वर्ग दुसरा एखादा ब्रँड वापरण्याचा विचार करतात.
या लहान लहान गोष्टींचा विचार करणे व्यवसायासाठी कधीही महत्वाचेच ठरते. सगळीकडे आणि सगळ्यांकडे एकच नियम लागू होऊ शकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वर्गासाठी स्ट्रॅटेजिमधे बदल करावेच लागतात.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील