ग्राहकांचे सरसकटीकरण करू नका… सगळेच एकसारखे नसतात


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

क्षेत्र कोणतेही असो, विषय कोणताही असो, शंभरातील ५ जण नमुनेच असतात…
व्यवसायातसुद्धा असं होतंच. आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांपैकी २-५% ग्राहक विक्षिप्त, विचित्र, आडमुठे किंवा अप्रामाणिक असतातच. पण आपण त्या ५% लोकांनाच संपूर्ण ग्राहक वर्गाचे प्रतिनिधी समजतो. प्रत्यक्षात बाकीचे ९५% ‘आम्ही असे कधी वागलो’ याच विचारात असतात…

आपण त्या ५% लोकांनाच प्रतिनिधित्व देतो कारण ते आपल्या डोक्यात घर करून बसलेले असतात. त्यांची चुकीची कृती आपल्याला छळत असते, त्रास देत असते, पण याचवेळी चांगल्या ग्राहकांची कोणतीही कृती आपल्याला त्रासदायक नसल्यामुळे त्यांचे वागणे आपल्याकडून दुर्लक्षित होते. साहजिकच सतत डोक्यात चाललेल्या या चुकीच्या ग्राहकांच्या विचारामुळे आपण त्यांनाच समस्त ग्राहक वर्गाचा प्रतिनिधी बनवून टाकतो. खरं तर ते ग्राहकांचे प्रतिनिधित्व करत नसतात, त्यांच्या पलीकडेही खूप सारे ग्राहक असतात ज्यांच्याशी आपले चांगले संबंध असतात, पण आपण नकळतपणे ते दृष्टीआड काढतो.

ग्राहकांविषयी नकारात्मक बोलणाऱ्या बहुतेकांचा दृष्टिकोन अशाच प्रकारे विकसित झालेला दिसून येतो…
जर कुणी म्हणत असेल कि सरसकट सगळेच ग्राहक वाईट असतात, तर अशांना एकंच सांगणं असेल… भाऊ, व्यवसाय तुझं क्षेत्र नाही.

सतत ग्राहकांना शिव्या घालणारे सुद्धा व्यवसायिक असतातच. पण तेही २-५% पेक्षा जास्त नसतात.
जर यांच्या व्यवसायाकडे पाहिलं तर लक्ष येईल कि त्यांचा व्यवसायही काही विशेष चालत नसतो. त्यामुळे त्यांचा ग्राहकांवर राग दिवसेंदिवस वाढत असतो. आणि त्यासोबत व्यवसायाचा आलेख दिवसेंदिवस खाली येत असतो. कारण त्यांच्याकडून ग्राहकांना जोडून ठेवू शकेल अशी कोणतीही सकारात्मक कृती, असा कोणताही सकारात्मक विचार, अशी कोणतीही सकारात्मक ऊर्जा ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही…

ग्राहकांचे सरसकटीकरण करू नका. प्रत्येकजण वेगळा असतो. चांगले वाईट सगळीकडेच असतात. चांगले विसरले जातात, वाईट लक्षात राहतात, पण म्हणून वाईटांनाच सगळ्यांचे प्रतिनिधी समजायची गरज नाही. या सरसकटीकरणामुळे आपल्याच ग्राहकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खराब करू नका. यामुळे ग्राहकांचे नुकसान काहीच होत नाही, आपलेच काय ते नुकसान होणार असते. प्रत्येक जण वेगळ्या विचाराचा, मानसिकतेचा, वृत्तीचा असतो; प्रत्येकाला त्याप्रमाणेच हँडल करायचे कौशल्य आत्मसात करा.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Share
  • 407
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
    407
    Shares
  • 407
    Shares
Avatar

Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!